'सलमानला जिवंत राहायचे असेल तर...', सलमानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोई टोळीची धमकी

सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, 'सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर...'

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 5, 2024, 01:11 PM IST
'सलमानला जिवंत राहायचे असेल तर...', सलमानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोई टोळीची धमकी title=

Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत जरी वाढ करण्यात आली असली तरी सलमान खानला धमक्यांपासून सूटका मिळालेली नाहीये. गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला जीवे मारण्याची धमक्या येत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावे आली आहे. वास्तविक, मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाने धमकीचा मेसेज आला आहे. 

ट्रॅफिक कंट्रोल रुमला मिळालेल्या मेसेजमध्ये लॉरेन्स बिष्णोईच्या भावाने हा धमकीचा मेसेज पाठवल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्यामध्ये त्याने म्हटलं आहे की, 'सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर त्याने आमच्या मंदिरात येऊन माफी मागावी किंवा 5 कोटी रुपये द्यावेत. जर सलमान खानने असे केले नाही तर सलमान खानला मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अजूनही आमची टोळी सक्रिय असल्याचं देखील या मेसेजमध्ये म्हटलं आहे. 

पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकीच्या मेसेजची माहिती सोमवारी रात्री मिळाली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री वाहतूक नियंत्रण कक्षात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने हा मेसेज वाचला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती समोर आली. सध्या पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. काही दिवसांआधी देखील असाच काहीसा प्रकार घडला होता. 30 ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीने मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज पाठवला होता. त्यासोबत त्यांनी दोन कोटींची देखील मागणी केली होती. सलमान खानने पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

सध्या सलमान खानला आलेल्या धमकीबाबत वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. धमकीचा मेसेज आलेल्या व्यक्तीचा देखील पोलीस सध्या शोध घेत आहेत. 

अनेक दिवसांपासून येत आहेत धमक्या 

सलमान खानचा जवळचा मित्र बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर देखील सलमान खानला धमक्या येत आहेत. सलमान खानसोबतच त्याच्या वडील सलीम खान यांना देखील धमक्या येत आहेत. लॉरेन्स बिष्णोईचे सहकारी या धमक्या आणि हल्ल्यांची जबाबदारी घेताना दिसत आहेत. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर याप्रकरणी अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x