Jarange on Bhujbal : बीडच्या सभेतून जरांगेंचा भुजबळांना इशारा

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Jarange on Bhujbal : बीडच्या सभेतून जरांगेंचा भुजबळांना इशारा

23 Dec 2023, 20:18 वाजता

येवल्याच्या यडपटानं मराठ्यांच्या नादी लागू नये.. जरांगेंचा भुजबळांना इशारा

 

Jarange on Bhujbal : येवल्याच्या यडपटानं मराठ्यांच्या नादी लागू नये... आरक्षण मिळूदेत कचका दाखवतो.. बीडच्या सभेतून जरागेंनी भुजबळांना इशारा दिला.. मराठा आमदार, खासदारांनी पाठीशी राहावं..  नाही तर मराठ्यांची घरं तुमच्यासाठी बंद होतील असं म्हणत जरांगेंनी
सरकारला टोला लगावला.. तर अशा कोल्हेकुईला दाद देत नाही, जरांगेंच्या जन्माआधीपासून लढत आलोय असा पलटवार भुजबळांनी केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

23 Dec 2023, 18:34 वाजता

20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार- जरांगे

 

Manoj Jarange's Announcement : बीडच्या इशार सभेतून मनोज जरांगे पाटलांनी मोठी घोषणा केलीय, 20 जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदानात उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केलीय. बीडच्या सभेतून जरांगेंनी मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवलीय. कुणीही हिंसक आंदोलन करायचं नाही, कुणी दंगा करायला लागलं तर त्याला पोलिसांकडे द्या असं आवाहानही जरांगेंनी केलंय.. तर मराठा खासदार, आमदारांनी पाठीशी राहावं, नाही तर त्यांना आमची घरं बंद होतील, असा इशाराही जरांगेंनी दिलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

23 Dec 2023, 16:59 वाजता

मराठा आरक्षणावरची सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं स्वीकारली

 

Maratha Curative Petition : मराठा आरक्षणावर सरकारनं दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर 24 जानेवारीला सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने ही तारीख दिली आहे. सुप्रीम कोर्टानं पुनर्विचार याचिका स्वीकारली असल्याची माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

23 Dec 2023, 14:27 वाजता

जम्मू-काश्मीरमध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा

 

4 Terrorists Killed in Jammu and Kashmir : भारत पाकिस्तान सीमेवर घुसखोरीचा डाव सुरक्षा दलांनी हाणून पाडलाय.. जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये काही पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करत होते.. यावेळी भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईत 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

23 Dec 2023, 13:39 वाजता

'फेब्रुवारीत महाविकास आघाडीत फूट पडेल', चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

 

Chandrashekhar Bawankule : फेब्रुवारीत महाविकास आघाडीत फूट पडेल असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय.. भाजपच्या विचारधारेवर काम करण्यास जो तयार आहे त्याचं पक्षात स्वागत होईल असंही त्यांनी यावेळी सांगीलतंय.. पाहुयात बावनकुळे नेमकं काय म्हणालेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

23 Dec 2023, 13:06 वाजता

'न्याय व्यवस्थेवर दबाव असल्यानं केवळ विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई',  संजय राऊतांचा गंभीर आरोप

 

Sanjay Raut on Sunil Kedar : भाजपच्या अनेक नेत्यांवर कारवाईची गरज आहे... मात्र न्याय व्यवस्थेवर दबाव असल्यानं केवळ विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई होत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय.. सुनिल केदारांच्या पाठीशी महाविकास आघाडी ठामपणे उभी आहे असं यावेळी राऊत म्हणालेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

23 Dec 2023, 12:44 वाजता

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अवजड वाहनांना बंदी

 

Mumbai Pune Express Highway Ban : नाताळ सणानिमित्त मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर शनिवारी ते सोमवार अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलीय. दुपारी 12 वाजेपर्यंत ही बंदी असणारेय. सलग आलेल्या सुट्ट्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईहून पुण्याकडं येणाऱ्या लेनवर बंदी घालण्यात आलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

23 Dec 2023, 12:11 वाजता

गुजरातमधील दारूबंदी हटवली?

 

Gujarat Govt Allows Liquor Sale : गुजरातच्या बिझनेस गिफ्ट सिटीतील दारूबंदी हटवण्यात आलीय...गुजरातमध्ये 63 पूर्वी करण्यात आलेल्या दारूबंदीच्या निर्णयात सरकारने बदल केलाय...राजधानी गांधीनगरजवळील बिझनेस गिफ्ट सिटीतील दारूबंदी हटवली असून, व्यावसायिक, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय...हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबमध्ये दारू पिण्याची मुभा देण्यात आली आहे. 1960 मध्ये गुजरात महाराष्ट्रातून वेगळा झाला...तेव्हापासून या राज्यात दारूबंदी आहे...काँग्रेस, भाजप सरकारनंदेखील हा निर्णय बदलला नाही...मात्र, व्यावसायाच्या पार्श्वभूमीवर दारूबंदीचा निर्णय हटवण्यात आलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

23 Dec 2023, 11:29 वाजता

'भुजबळांच्या डोक्यात मराठ्यांविषयी विष', मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना टोला

 

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : भुजबळांच्या डोक्यात मराठ्यांविषयी विष असून, भुजबळांचे विचार खालच्या दर्जाचे असल्याचं जरांगेंनी म्हटलंय...भुजबळांनी मराठ्यांच्या नादी लागू नये अशा इशारा जरांगेंनी दिलाय...सरकारने जरांगेंचं ऐकायला पाहिजे, नाहीतर जरांगे मोर्चा घेऊन येतील असा उपरोधिक टोला भुजबळांनी लगावला होता...त्यावर जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

23 Dec 2023, 11:13 वाजता

काँग्रेस नागपुरातून लोकसभेच्या प्रचाराचं बिगुल फुंकणार 

 

Congress Rally : काँग्रेस नागपुरातून लोकसभेच्या प्रचाराचं बिगुल फुंकणार आहे.. 28 डिसेंबरला काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे.. या दिवशी नागपूरमध्ये काँग्रेस पक्षानं महारॅली आयोजित केलीये.. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे या सभेला हजर राहणार आहेत.. दिघोरी नाका, उमरेड रोड येथील‎ 80 एकरांच्या मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात‎ आलंय..‎ या महारॅलीच्या ‎तयारीला फक्त पाच दिवस उरले आहेत. अवघ्या पाच‎ दिवसांत दहा लाखांची गर्दी जमवण्याचे आव्हान‎ काँग्रेससमोर आहे. भाजपविरोधातील काँग्रेसची ही सभा विक्रमी असून त्यातून कार्यकर्त्यांना दिशा मिळेल असा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-