23 Dec 2023, 10:40 वाजता
आमदार बच्चू कडूंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
Bacchu Kadu met Manoj Jarang : आमदार बच्चू कडूंनी मनोज जरांगेंची भेट घेतली...इशारा सभेआधी जरांगे आणि बच्चू कडूंमध्ये चर्चा झालीय...सरकारच्या सगे सोयरे या शब्दावर जरांगे ठाम आहेत...त्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय
23 Dec 2023, 10:16 वाजता
मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक
Mumbai Railway Megablock : रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावर पनवेल- वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणारेय. रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल तर पश्चिम रेल्वे मार्गावर आज बोरिवली – भाईंदर स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणारेय. रात्री १२.३५ ते पहाटे ४.३५ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणारेय. मात्र उद्या दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसणारेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
23 Dec 2023, 09:35 वाजता
सुनील केदारांची आमदारकी रद्द होणार?
Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द होणार असल्याची सूत्रांची माहिती. नागपूर पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधीमंडळास पाठवले. केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निर्णयाकडे लक्ष. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय..
23 Dec 2023, 09:07 वाजता
'बारामती लोकसभेला योग्य उमेदवार देऊ', अजित पवारांचं वक्तव्य
Ajit Pawar : बारामती लोकसभेला योग्य उमेदवार देऊ असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय...सध्या बारामती लोकसभेच्या खासदार या सुप्रिया सुळे आहेत...त्यामुळे सुप्रिया सुळेंविरोधात योग्य उमेदवार कोण? याचीच चर्चा सुरू झालीय...
23 Dec 2023, 08:48 वाजता
लोकसभेसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा समिती स्थापन
Congress : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केलीय...या समितीत देशभरातील 16 सदस्य आहेत...मात्र, महाराष्ट्रातल्या एकाहनी नेत्याला समितीत स्थान मिळालेलं नाही...पी चिदंबरम जाहीरनामा समितीचे अध्यक्ष असून, समितीत प्रियांका गांधींनाही स्थान देण्यात आलंय...छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी एस सिंगदेव यांना समितीचे निमंत्रक बनवण्यात आलंय...
23 Dec 2023, 08:07 वाजता
मुंबईत धुलिकणांचे प्रमाण वाढले
Mumbai Air Pollution : मुंबईत धुलिकणांचं प्रमाण वाढलंय.. त्यामुळे हवेची गुणवत्ता आणखीन खालावलीये.. देवनारची हवा अतिवाईट आहे.. सायन, मालाड, बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्समधील हवाही वाईट असल्याची नोंद झालीये.. दरम्यान पुढील दोन दिवसात मुंबईत ढगाळ वातावरण असल्यानं मुंबईकरांना थंडीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे... मुंबईतील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रीम पाऊस पाडण्यात येणार आहे.. त्यासाठी निविदाही मागवण्यात आल्यात.
23 Dec 2023, 07:45 वाजता
बीडमध्ये मनोज जरांगेंची आज निर्णायक इशारा सभा
Manoj Jarange : बीडमध्ये मनोज जरांगेंची आज निर्णायक इशारा सभा होणार आहे...दुपारी 1 वाजता ही सभा होणार आहे...या सभेच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांकडून 125 मराठा आंदोलकांना नोटीसा पाठवण्यात आल्यायत...बीड बाय पासवर ही सभा होणार असून, 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर जरांगे ठाम आहेत...आता फक्त उद्याचा दिवस उरलाय...त्यामुळे आज जरांगे काय निर्णय घेणार...? आंदोलनाची पुढची दिशा काय असेल...? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
23 Dec 2023, 07:36 वाजता
देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दुप्पटीनं वाढ
Covid 19 Update : देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दुप्पटीनं वाढ झालीये.. काल दिवसभरात कोरोनाचे 640 नवे रुग्ण आढळून आलेत.. याशिवाय देशात JN.1 या नव्या व्हेरियंटचेही 22 रुग्ण आढळून आलेत.. त्यामुळे सर्वांची चिंता वाढलीये.. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे केरळमध्ये आढळतअसून काल केरळमध्ये कोरोनाचे 265 रुग्ण आढळून आलेत.. तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय... कोरोनाचा धोका वाढू लागल्यानं राज्य सरकरही अलर्ट झालंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-