Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

27 Jan 2024, 23:00 वाजता

मराठा आरक्षण अध्यादेश ही जनतेची दिशाभूल-  उल्हास बापट

 

Ulhas Bapat on  Manoj Jarange : मराठा आरक्षण अध्यादेश ही जनतेची दिशाभूल आहे. असं आरक्षण राज्यघटनेच्या आधारे देता येत नाही.. असं विश्लेषण घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी केलंय. पाहुयात कायदेतज्ज्ञ बापटांना आरक्षणाबद्दल काय वाटतं.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

27 Jan 2024, 22:02 वाजता

राज ठाकरेंनी टोलनाक्यावर किती पैसे मोजले?- गुणरत्न सदावर्ते

 

Gunaratna Sadavarte on MNS  : राज ठाकरेवर गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केलीय. राज ठाकरेंचं कर्तृत्व काय? त्यांनी टोलनाक्यावर किती पैसे मोजलेत?, अशी टीका सदावर्ते केलीय. तर सदावर्ते हा मूर्खांच्या नंदनवनात फिरणारा माणूस असल्याचा पलटवार मनसेनं केलाय

27 Jan 2024, 20:33 वाजता

आरक्षण कधी मिळणार ते मुख्यमंत्र्यांना विचारा- राज ठाकरे

 

Raj Thackeray on Manoj Jarange : राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन केलंय. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

27 Jan 2024, 19:16 वाजता

नितीश कुमार भाजप युतीमुळे NDAमध्ये अस्वस्थता?

 

Bihar Politics : बिहारमध्ये राजकीय वातावरण तापलंय, कारण नीतीशकुमार RJDसोबतची आघाडी सोडून उद्याच भाजपसोबत शपथविधी करणार आहेत हे जवळपास निश्चित झालंय. अमित शाहा स्वत पटनातील शपथविधीला हजर राहू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. दुसरीकडे नितीशकुमारांना लालू प्रसाद यादव आणि मल्लिकार्जुन खरगेंनी फोन केले मात्र नितीशकुमारांनी त्यांचे फोन उचलले नाहीत. नितीशकुमार यांच्या भूमिकेमुळे भाजपसोबतचे मित्रपक्ष दुखावलेत. चिराग पासवान यांनी आपण आहेत तितक्याच जागा लढवणार, एकही जागा कमी होऊ देणार नाही अशी भूमिका घेतलीय. तर आता भाजपसोबत असणा-या माजी मुख्यमंत्री जितन राम मांझीनी थेट राहुल गांधींशी फोनवरुन चर्चा केल्याचं समजतंय. राहुल गांधींनी मांझींना इंडिया आघाडीत सामील होण्याचं आमंत्रण दिलंय. त्यामुळे एकीकडे नितीश-भाजप आघाडी निश्चित झालेली असताना भाजपच्या मित्रपक्षांमध्ये मात्र अस्वस्थता आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

27 Jan 2024, 18:23 वाजता

मराठा समाजाची एकी पाहायला मिळाली- आदित्य ठाकरे

 

Aaditya Thackeray on Maratha Reservation : मराठा समाजाची एकी महत्त्वाची होती ती पहायला मिळाल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलीये...त्याचबरोबर मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर पाहिल्यानंतर वक्तव्य करणार असल्याचंही ते म्हणाले

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

27 Jan 2024, 17:57 वाजता

नेमकं मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला?- नाना पटोले

 

Nana Patole on Maratha Reservation : नेमकं कोणाच आरक्षण काढून, कोणाला दिलं, किंवा आरक्षण नेमकं कोणाला किती मिळेल?, ओबीसी समाजाला फसवलं की मराठा समाजाला फसवलं? असे सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केलेत. तसंच ऐतिहासिक निर्णय घेताना दोन उपमुख्यमंत्री का नव्हते? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

27 Jan 2024, 17:08 वाजता

 सरसकट प्रमाणपत्रांचा विषय अनुत्तरीत- अशोक चव्हाण

 

Ashok Chavan on Maratha Reservation : मराठा समाजाचा विजय झाला ही आनंदाची बाब आहे...मात्र सरसकट प्रमाणपत्रांचा विषय अद्यापही अनुत्तरीत असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणालेत...

27 Jan 2024, 16:37 वाजता

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यावरून वाद

 

Maratha Reservation : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून आता वादाला तोंड फुटलंय...मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासह अंतरवाली सराटीतील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचं पत्र दिल्याचं जरांगे म्हणाले...तर सरकार गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सरकार करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत...तर चुकीचा पायंडा पडेल, असं म्हणत भुजबळांनी मुद्द्याला विरोध दर्शवलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

27 Jan 2024, 16:03 वाजता

मराठा आंदोलनात जाळपोळ, तोडफोडीचे गुन्हे मागे नाहीत- फडणवीस

 

Devendra Fadnavis on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारने दिलं असलं तरी गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्यात येणार नाहीत असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. जाळपोळ, तोडफोड, सरकारी कार्यालयांचं नुकसान अशा स्वरूपाचे गुन्हे कोर्टाच्या आदेशानुसारच मागे घेता येतात असंही फडणवीसांनी सांगितलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

27 Jan 2024, 14:25 वाजता

मराठा आरक्षण अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार - गुणरत्न सदावर्ते

 

Gunaratna Sadavarte : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा गुणरत्न सदावर्तेंनी दिलाय.. कायद्यानुसार हे आरक्षण टिकणारं नाही असंही ते म्हणालेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा -