28 Mar 2024, 09:04 वाजता
रोहित पवार यांची सुनील तटकरेंवर टीका
Rohit Pawar On Sunil Tatkare : भाजपमध्ये जाण्याची वेळ आल्यास तटकरे पहिली उडी मारतील असा खोचक टोला आमदार रोहित पवारांनी लगावलाय. मुरुडमध्ये शेकापच्या निर्धार मेळाव्यात त्यांनी ही टीका केलीय. सुनील तटकरे स्वहितासाठी इकडून तिकडे उड्या मारणार असतील तर विचार करण्याची वेळ आल्याचं रोहित पवार म्हणाले.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Mar 2024, 09:00 वाजता
नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात?
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या उमेदवारीची आज घोषणा होण्याची शक्यताय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ अखेर भाजपच्या पारड्यात पडल्याचं समजतंय. रत्नागिरी-सिंधुदुर्गातून केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असा सामना रंगणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. कालच मंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा झाली होती. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा झाली होती.. मात्र आज नारायण राणेंचं नाव समोर आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. तर राणेंना उमेदवारी मिळाल्यास विनायक राऊतांशी सामना होणार आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Mar 2024, 08:51 वाजता
माढातून मविआकडून धैर्यशील मोहितेंना उमेदवारी?
Madha Loksabha Constituency : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपातला अंतर्गत वाद काही शमायला तयार नाही. माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे नाईक-निंबाळकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.. याच पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत अशी माहिती सुत्रांनी दिलीय. धैर्यशील मोहिते-पाटलांना मविआकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Mar 2024, 07:45 वाजता
बच्चू कडू, अडसूळ काय भूमिका घेणार?
Amravati Loksabha Constituency : अमरावतीतून नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आल्यामुळे बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. उमेदवार बदली करा..अन्यथा आम्हाला महायुतीतून बाहेर पडण्याची संमती द्या.. अशी थेट भूमिका बच्चू कडूंनी घेतलीय. नवनीत राणांचं काम करणार नाही असा पवित्राही त्यांनी घेतलाय.. 4 एप्रिलला कडूंची पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बैठक पार पडणार आहे. बच्चू कडूंसोबत आनंदराव अडसूळही नाराज झालेत. बनावट जात प्रमाणपत्रावरुन अडसूळ विरुद्ध राणा असा सामना सुरु आहे. सध्या प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. त्यात राणांच्या उमेदवारीमुळे आनंदराव अडसूळांचे पुत्र अभिजित अडसूळ अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करु शकतात.. एकंदरीत नवनीत राणांच्या उमेदवारीमुळे महायुतीत टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय. कडू आणि अडसूळांची समजूत घालण्याचं मोठं आव्हान आता मुख्यमंत्री शिंदेंसमोर आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Mar 2024, 07:42 वाजता
महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद
Mahayuti Seat Sharing : आज शिंदेंच्या शिवसेनेतील आठ जागांची यादी जाहीर होऊ शकते.. या यादीत कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाचं तिकीट कापले जाणार हे स्पष्ट होईल... वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत जागावाटप संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आला. मात्र मागील काही दिवसांपासून वाद सुरू असलेल्या नाशिक यवतमाळ रायगड ठाणे मुंबई या जागांवर प्रामुख्याने लक्ष आहे.. तसेच अमरावतीतून उमेदवारी न मिळल्यानं आनंदराव अडसूळ नाराज झाले असून बैठकीनंतर ते माध्यमांशी बातचीत न करताच निघून गेले.. त्यामुळे आज ते अमरावतीच्या जागे विषयी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -