24 Dec 2024, 13:18 वाजता
महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर- संजय राऊत
Sanjay Raut on CM Fadanvis : महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर-राऊत...बीड घटनेचे संशयित आरोपी मंत्रिमंडळात-राऊत... परभणीची घटना राज्याला काळीमा फासणारी-राऊत... राज्याच्या प्रतिष्ठेला कलंक लागला-संजय राऊत... फडणवीस परभणीत जायला पाहिजे होते-राऊत....गृहमंत्री म्हणून तुम्ही गेलात का?-संजय राऊत...फडणवीस परभणीला जायला घाबरतात-राऊत.. परभणीला गेले तर सोबत सैनिक घेऊन जातील-राऊत
24 Dec 2024, 12:32 वाजता
राज्यात 27 ते 28 डिसेंबरदरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज
Rain Alert : 27 ते 28 डिसेंबरदरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.. उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा इशाराही देण्यात आलाय. त्यामुळे शेतक-यांनी हवामान विभागाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवून शेतीचं नियोजन करावं.. तसंच अवकाळी पावसामुळे पिकांचं होणारं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाचा सल्ला घ्यावा असं आवाहन कृषी विभागाकडून देण्यात आलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
24 Dec 2024, 12:05 वाजता
तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना धमकी
Tanaji Sawat Nephews Threatened : 'तुमचाही संतोष देशमुख केला जाईल'...तानाजी सावंतांच्या दोन पुतण्यांना धमकी...अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी...ढोकी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल
बातमीचा व्हिडीओ पाहा-
24 Dec 2024, 11:35 वाजता
'काय होतास तू आणि काय झालास तू?', सुरेश धसांचा धनंजय मुंडेंना टोला
Suresh Dhas on Dhananjay Munde : आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. धनंजय मुंडे अगोदर असे नव्हते. काय होतास तू आणि काय झालास तू ?... अशा शब्दांत धस यांनी मुंडेंवर हल्लाबोल केलाय. परळीतल्या लोकांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर पीकविमा कसा भरला? असा सवाल त्यांनी विचारलाय. याला तत्कालीन कृषीमंत्री जबाबदार आहेत. मात्र, त्या कृषीमंत्र्यांचं नाव अठवत नसल्याचं ते म्हणाले.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
24 Dec 2024, 11:15 वाजता
इक्बाल कासकरचा फ्लॅट ईडीच्या ताब्यात
Iqbal Kaskar : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा फ्लॅट ईडीच्या ताब्यात... ठाण्यातील फ्लॅट ईडीच्या ताब्यात...मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जप्त केला होता फ्लॅट... कासकरवर खंडणीतून फ्लॅट मिळवल्याचा आरोप
बातमीचा व्हिडीओ पाहा-
24 Dec 2024, 10:26 वाजता
बंगले, दालनावरून महायुतीत नाराजी-सूत्र
Mahayuti : बंगले, दालनावरून महायुतीत नाराजी-सूत्र.. वास्तूप्रमाणे दालन मिळालं नसल्यानं मंत्री नाराज?... अनेक बंगले अशुभ असल्यची तक्रार-सूत्र...अनेक बंगले बदलण्याची शक्यता
बातमीचा व्हिडीओ पाहा-
24 Dec 2024, 10:07 वाजता
उल्हासनगरमध्ये हिट अँड रन, मद्यधुंद कारचालकाने 3 वाहनांना उडवलं
Ulhasnagar Hit and run : उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना...मद्यधुंद कारचालकाने 2 ते 3 वाहनांना उडवलं.. कारच्या धडकेत 9 जण जखमी.. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4 मध्ये पहाटे 5 वाजताच्या सुमारास अपघात...कारची 2 दुचाकी आणि एक रिक्षाला धडक... जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
24 Dec 2024, 09:36 वाजता
राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला पावसाची शक्यता
Rain Alert : राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला पावसाची शक्यता..पुणे वेधशाळेचा वर्तवला पावसाचा अंदाज...उ. महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता...मुंबईतल्या वातावरणातही होणार बदल
24 Dec 2024, 09:13 वाजता
मराठवाड्यात ओला दुष्काळ?
Marathwada : मराठवाड्यात ओला दुष्काळ असल्याची माहिती समोर येतीये.. यावर्षी मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीनं थैमान घातलं होतं... या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय.. मराठवाड्यातील 8 हजार 486 गावांपैकी 6 हजार 150 गावांची अंतिम पैसेवारी 50 पैशांहून कमी आलीये.. तर 2 हजार 336 गावांची पैसेवारी 50पैशांपेक्षा अधिक असल्याचं समोर आलंय. यात परभणी,नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यातील सर्व गावांचा समावेश आहे.. अतिवृष्टीनंतर पंचनामे करुन शासनाकडे नुकसानीचा अहवाल सादर केलाय.. त्यानंतर शासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी नुकसानीपोटी 2 हजार 726 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय.. अंतिम पैसेवारी 50 पैशांहून कमी असलेल्या गावांमधील शेतक-यांचा शेतसारा तसंच विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ केली जाणार आहे.. तसंच वीज बीलातही 33 टक्के सूट मिळण्याची शक्यता आहे.
24 Dec 2024, 08:34 वाजता
पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरुच
Pune Koyta Gang : पुण्यात कोयता गँगचां धुमाकूळ सुरुच आहे.. पुण्यातील लोहगावमध्ये साठी वस्तीत दोन तरुणांनी अनेक वाहनं आणि दुकानांची तोडफोड केलीये... कोयते दाखवत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलाय. या दोघांची दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालीत.. या टोळक्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालीये. दरम्यान पोलीस या दोन्ही तरुणांचा शोध घेत आहेत..