24 Dec 2024, 20:03 वाजता
ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचं शेड्युल जाहीर
ICC Champions Trophy Schedule : पाकिस्तानमध्ये होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं शेड्युल जाहीर झालंय. 19 फेब्रुवारी ते 9 मार्च चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा रंगणार आहे.. 23 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच ही दुबईत रंगणार आहे. ग्रुप एमध्ये पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेश या टीमचा समावेश आहे तर ग्रुप बीमध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका या टीमचा समावेश आहे. टीम इंडियानं पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानं टीम इंडियाच्या सर्व मॅचेस या दुबईत खेळवल्या जाणार आहेत. 9 मार्चला चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल मुकाबला रंगणार आहे.
24 Dec 2024, 19:48 वाजता
अंजली दमानियांचा धनंजय मुंडेंना सवाल
Anjali Damaniya On Dhananjay Munde : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारला आहे. सामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण करायला तुम्हाला कार्यकर्ते लागतात का असा सवाल त्यांनी केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
24 Dec 2024, 19:39 वाजता
कैलास फडवर परळी शहर पोलिसांत गुन्हा दाखल
Beed Firing : हवेत गोळीबार करुन व्हिडिओ काढणं एकाला चांगलंच भोवलंय.. परळीच्या कनेरवाडी येथील कैलास फड याच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट केला होता. त्यानंतर परळी शहर पोलिसांनी कैलास फड याच्यावर गुन्हा दाखल केलाय.. कैलास फड हा धनंजय मुंडेंचा सहकारी असल्याची माहिती आहे...
24 Dec 2024, 19:09 वाजता
चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
Chitra Wagh On Supriya Sule : बीड, परभणीमधल्या घटनांवरुन भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी खासदारु सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय. महायुतीचं सरकार गुन्हेगारांना माफी देत नाही, मात्र तुमच्या वेळी सर्रास गुन्हेगारांना पाठीशी घातलं जायचं असा टोला चित्रा वाघ यांनी ट्विट करुन लगावलाय. गोवारी हत्याकांड, मुंबईतील ब्लास्ट ही त्याचीच उदाहरणं आहेत. यादी करायची झाली तर ती वाढतच जाईल, असा इशाराही वाघ यांनी दिला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
24 Dec 2024, 19:07 वाजता
तंबाखू दिला नाही म्हणून टोळक्यानं कोयत्यानं हल्ला
Nashik Marhan : तंबाखू दिला नाही म्हणून टोळक्यानं कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या हेडगेवार चौकात घडली. या टोळक्याजवळून पेंटर सौरभ वर्मा आणि सहकारी जात होते. त्यावेळी टोळक्यानं त्यांच्याकडे तंबाखू मागितला. मात्र तो दिला नाही म्हणून टोळक्याकडून या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. टोळक्यातील संशयित आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. तर अंबड पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असून, इतर संशयित आरोपी फरार आहेत.
24 Dec 2024, 16:47 वाजता
नाणारबाबत स्थानिकांची भूमिका महत्त्वाची - उदय सामंत
Uday Samant On Nanar : नाणार प्रकल्पाबाबत गैरसमज दूर झाल्याचं तिथल्या स्थानिकांनी सांगितलं, तर सरकार त्या प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय घेईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसंच 90 टक्के स्थानिकांनी प्रकल्पाचा पुनर्विचार व्हावा असं मत मांडलं तर ती भमिकाही आपण मुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार नारायण राणेंसमोर मांडू असं उदय सामंत म्हणाले.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
24 Dec 2024, 16:35 वाजता
बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही - फडणवीस
Devendra Fadanvis On Beed Guridan Minister : बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. तर बीडचं पालकमंत्रिपद कोणी घ्यायचं हे महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते बसून ठरवू, असंही त्यांनी सांगितलंय..
24 Dec 2024, 14:03 वाजता
NDAच्या प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक
NDA Meeting Tomorrow : NDAच्या प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक...उद्या जे पी नड्डांच्या निवासस्थानी बैठक...आंबेडकर वादासह विविध विषयावंर चर्चा...NDA घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय राखण्यास चर्चा
बातमीचा व्हिडीओ पाहा-
24 Dec 2024, 13:37 वाजता
नवी मुंबईत अवैधरित्या राहणाऱ्या 10 बांगलादेशींवर कारवाई
Bangladeshi Arrest In Navi Mumbai : नवी मुंबईत अवैधरित्या राहणा-या 10 बांगलादेशींवर कारवाई ...कोपरा गावात बांगलादेशी घुसखोरांचं बेकायदेशीर वास्तव्य ..२०२३पासून वैध कागदपत्रांशिवाय नवी मुंबईत सेक्टर-10 मध्ये वास्तव्य ..दोन पुरुष आणि आठ महिलांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कारवाई ..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
24 Dec 2024, 13:18 वाजता
महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर- संजय राऊत
Sanjay Raut on CM Fadanvis : महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर-राऊत...बीड घटनेचे संशयित आरोपी मंत्रिमंडळात-राऊत... परभणीची घटना राज्याला काळीमा फासणारी-राऊत... राज्याच्या प्रतिष्ठेला कलंक लागला-संजय राऊत... फडणवीस परभणीत जायला पाहिजे होते-राऊत....गृहमंत्री म्हणून तुम्ही गेलात का?-संजय राऊत...फडणवीस परभणीला जायला घाबरतात-राऊत.. परभणीला गेले तर सोबत सैनिक घेऊन जातील-राऊत