Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 26 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

26 Dec 2024, 12:31 वाजता

आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट?

 

MLA Balaji Kinikar : शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आल्याची माहिती आहे....याबाबत ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून २ जणांना ताब्यात घेतलं आहे

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

26 Dec 2024, 12:09 वाजता

नव्या वर्षात ठरणार पालकमंत्री?

 

Ganesh Naik : पालकमंत्रीपदाचा निर्णय नव्या वर्षात होण्याची शक्यता आहे.. एक जानेवारीनंतर पालकमंत्रिपदाचा निर्णय होणार असल्याचं मोठं विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी केलंय. पालकमंत्रिपदावरुन महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे.. दरम्यान गणेश नाईकांच्या विधानामुळे आता नव्या वर्षातच पालकमंत्री मिळतील अशी शक्यता आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

26 Dec 2024, 11:14 वाजता

कल्याणमधील अत्याचार, हत्या प्रकरणी विशाल गवळीसह पत्नीला पोलीस कोठडी

 

Cases of torture, murder in Kalyan : कल्याणमधील अत्याचार, हत्या प्रकरणी आरोपी विशाल गवळीसह पत्नीला पोलीस कोठडी...2 जानेवारीपर्यंत दोघांना पोलीस कोठडी

26 Dec 2024, 11:03 वाजता

राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार

 

A statue of Shivaji Maharaj will be erected at Rajkot fort : किल्ले राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी कामास सुरुवात...-भव्य दिव्य पुतळ्यासाठी खोदकाम सुरू...शिवरायांचा भव्य ६० फूट उंचीचा पुतळा लवकरच उभा राहणार... खोदकाम सुरू असतांना कठीण खडक सापडलाय...मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे. या कामाच्या फाउंडेशनचं खोदकाम सुरू झालंय...खोदकाम सुरू असतांना कठीण खडक सापडलाय....राज्य सरकारने याठिकाणी ६० फूट उंच पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

26 Dec 2024, 10:38 वाजता

जिल्हा परिषद शाळेतील 29 टक्के विद्यार्थ्यांना मराठी येईना

 

ZP School Students : केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मात्र राज्यातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचताच येत नाही, हे वास्तव समोर आलंय. मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषद शाळांच्या २९ टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही, अशी धक्कादायक बाब समोर आलीय.. विभागीय आयुक्त प्रशासनानं पाहणी केली. यात विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचं समोर आलंय.. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान पाहणी केली. त्यात इंग्रजी, गणित विषयांमध्येही विद्यार्थी कच्चे आहेत, असं या निष्कर्षात आढळून आलं आहे.. हा अहवाल खुद्द शिक्षकांनीच दिलाय. लातूर आणि बीडचे निष्कर्ष अद्याप यायचेत. मात्र उर्वरित मराठवाड्यातले हे निष्कर्ष धक्कादायक आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

26 Dec 2024, 10:20 वाजता

राजगुरुनगरमध्ये बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्यांची हत्या

 

Rajgurunagar Crime : राजगुरुनगरमध्ये काल दुपारी बेपत्ता झालेल्या दोन चिमुकल्यांची हत्या झालीये.. या दोघींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आलेत.. काल दुपारी दोघी घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगरुनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजुला दोघींचे मृतदेह एका टाकीत सापडले.. हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आलेत. या मुलींसोबत काय झालं याचा पोलीस तपास करत आहेत.

26 Dec 2024, 09:37 वाजता

धुरकं आणि प्रदूषणाने मुंबईकरांचा श्वास कोंडला

 

Mumbai Air Pollution : वातावरणातल्या बदलाचा मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. धुरकं आणि प्रदूषणामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडलाय. मुंबईकरांच्या आरोग्यावरही परिणाम होतोय. मुंबईतली हवा सध्या वाईट श्रेणीत नोंदवली गेलीय .देवनार, कांदिवली पश्चिम, मालाड, माझगाव, नेव्ही नगर, शिवडी आणि सिद्धार्थ नगर इथली हवा वाईट श्रेणीत आहे. तर बोरिवलीतली हवेची गुणवत्ता अति-वाईट श्रेणीत आहे. 

26 Dec 2024, 09:08 वाजता

सीएमची ठाणे पोलीस आयुक्तांची फोनवर चर्चा

 

CM Devendra Fadnavis Speaks To Thane Commissioner of Police For Kalyan Case : कल्याणमधल्या अत्याचाराच्या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली. ही घटना गंभीर आहे. विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवा,आरोपीला फाशी होईल, हे सुनिश्चित करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिस आयुक्तांना दिले. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

26 Dec 2024, 08:35 वाजता

सव्वा तीन लाख बोगस पीकविमा प्रस्ताव रद्द

 

Cancel bogus crop insurance proposal : सव्वा तीन लाख बोगस पीकविमा प्रस्ताव रद्द..-प्रत्यक्ष लागवड न करता केवळ कागदोपत्री लागवड..पीकविमा लाटण्याचा काही शेतक-यांकडून प्रयत्न...कृषी विभागाकडून तपासणी केल्यानंतर कारवाई

26 Dec 2024, 08:03 वाजता

कल्याण हत्याप्रकरणातील आरोपी कल्याण क्राईम ब्रांचच्या ताब्यात

 

Cases of torture, murder in Kalyan : कल्याण हत्याप्रकरणातील आरोपी कल्याण क्राईम ब्रांचच्या ताब्यात..मुख्य आरोपी विशाल गवळीला ठाण्यात आणलं-सूत्र..आरोपीला नौपाडा पोलीस ठाण्यात ठेवलं-सूत्र..दुपारनंतर आरोपीला कल्याण कोर्टात हजर करणार