26 Dec 2024, 19:20 वाजता
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंद - हसन मुश्रीफ
Hasan Mushrif : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास सर्वात जास्त आनंद आपल्याला होईल अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
26 Dec 2024, 18:39 वाजता
साईदरबारी बनावट पासची विक्री
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा देवस्थानमध्ये धक्कादायक प्रकार उघड झालाय. शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची दर्शन पासच्या नावाने फसवणुक झालीय. प्रकाशन विभागातील कर्मचाऱ्यानेच बनावट दर्शनाचे पास तयार केले होते. याप्रकरणी कर्मचारी सागर रमेश आव्हाडाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर बनावट पास तयार करून भक्तांसह साई संस्थानचीही फसवणूक झाल्याचं उघड झालंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
26 Dec 2024, 17:49 वाजता
धुळ्यात 2 गटांत तुंबळ हाणामारी
Dhule : धुळ्यात 2 गटांत जबर हाणामारी झाली. शेतात गुरे चारण्यावरून ठेलारी आणि चारण यांच्यात शिरपूर तालुक्यातील कळमसरेमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर तुफान मारहाणीत झालं. यात दोन्ही गटाचे 8 जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कळमसरे शिवारात राजेंद्र गुलाबसिंग गिरासे यांचं शेत कापूस उफाळून देण्याच्या मोबदल्यात मेंढ्या चारण्यासाठी ठेलारी यांनी विकत घेतलं होतं. मात्र दुस-या गटातील काही जणांनी शेतात बळजबरीने गुरे घालून चारु लागल्याने वाद झाला, याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
26 Dec 2024, 17:15 वाजता
बीडमधील कायदा-सुव्यवस्थेवर अंजली दमानियांचं ट्विट
Anjali Damania Tweet : बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा ट्विटद्वारे बोट ठेवलं आहे. बीडमधील शस्त्र परवान्यांची चौकशी लावा. तसंच विनाकष्ट पिस्तुल दाखवून पैसे कमवणं त्यांना सोपं वाटतं, अशी टीकाही त्यांनी केली. अशा रिल्सवरुन नवी पिढी काय प्रेरणा घेणार असा सवाल त्यांनी केला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
26 Dec 2024, 16:19 वाजता
सोन्याप्रमाणे चांदीलाही आता हॉलमार्क
Hallmark In Silver : आता सोन्याप्रमाणे चांदीलाही हॉलमार्क येण्याची शक्यता आहे.. सरकार लवकरच याबबात महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.. चांदीला हॉलमार्क मिळाल्यानं ग्राहकांना चांदीच्या शुद्धतेची हमी मिळेल.. तसंच वजन आणि विक्रीच्या ठिकाणाचीही माहिती मिळू शकेल...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
26 Dec 2024, 15:53 वाजता
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण
Balasaheb Thackeray Memorial : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय. टक्के काम पूर्ण झाल्याने आता जानेवारीत या टप्प्याचे लोकार्पण करून स्मारक सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे.दादर येथील महापौर निवासस्थान येथे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात महापौर निवासस्थानाचे वारसा जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संग्रहालय बांधण्यात येणार आहे. त्यानुसार येथे ‘इमर्सिव्ह म्युझियम एक्सपिरियन्स’ संग्रहालय उभारण्यात येत आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
26 Dec 2024, 14:01 वाजता
सतीश वाघ हत्याप्रकरणी पत्नीच मुख्य सूत्रधार
Satish Wagh Case : सतीश वाघ हत्या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश बलकवडेंनी पत्रकार परिषद घेत अनेक घडामोडींचा उलगडा केलाय. सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघ मुख्य सूत्रधार आहे.याप्रकरणी मोहिनी वाघला अटकही करण्यात आलीये. सतीश वाघ यांच्याकडून अनेकदा पत्नीला मारहाण केली जायची. या मारहाणीला कंटाळून पैशांचे सगळे व्यवहार आपल्य हाती घेण्यासाठी हा खून केल्याची कबुली मोहिनी वाघने दिलीये, या खूनाप्रकरणी मोहिनी वाघ आणि तिचा प्रियकर अक्षयला बेड्या ठोकण्यात आल्यात. सतीश वाघ यांच्या हत्येचा कट हा 15 दिवसांपूर्वी रचल्याची माहितीही पोलीस तपासात समोर आलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
26 Dec 2024, 13:30 वाजता
लोणावळ्यात रक्षकच बनला भक्षक, पोलिसाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Lonavala Crime : लोणावळ्यात रक्षकच बनला भक्षक...पोलिसाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग...दारुच्या नशेत पोलिसांचे मुलीशी अश्लील चाळे...विसापूर किल्ल्याच्या पायथ्याजवळील घटना
26 Dec 2024, 13:07 वाजता
राजगुरुनगरमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करुन हत्या, आरोपी अटकेत
Rajgurunagar Crime :दुहेरी हत्याकांडाने पुण्यातील राजगुरुनगर हादरलं...2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करुन हत्या...पाण्याच्या टाकीत सापडले चिमुकल्यांचे मृतदेह...24तासात आरोपीला पुण्यातून अटक
26 Dec 2024, 12:31 वाजता
आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट?
MLA Balaji Kinikar : शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आल्याची माहिती आहे....याबाबत ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून २ जणांना ताब्यात घेतलं आहे
बातमीचा व्हिडीओ पाहा-