29 Dec 2024, 10:07 वाजता
रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Raigad Crime : रायगडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय.. मुरूडच्या कोर्लई गावात ही घटना घडलीये.. सात वर्षांची ही मुलगी भावासोबत कोर्लई समुद्र किनारी गेली होती. .त्यावेळी आरोपीनं तिला बोटीवर नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला.. या प्रकरणी आरोपीविरोधात रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या घटनेनंतर कोर्लई गावात संतापाचं वातावरण आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
29 Dec 2024, 09:41 वाजता
मुंबईत हवेचा दर्जा खराब
Mumbai Air Pollution : मुंबईत हवेचा दर्जा दिवसेंदिवस खराब होत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रदूषण प्रचंड वाढले असताना आता दररोज विषारी धुरक्याची चादरही पसरलीय. बोरिवली, मालाड, माझगाव, कुलाबा, वरळी आणि भायखळ्यामध्ये हवेचा 'एक्यूआय' 250 च्यावर नोंदवलाय. त्यामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाचे आजार बळावण्यास सुरुवात झालीय. त्यामुळे नागरिकांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
29 Dec 2024, 08:41 वाजता
पुण्यात CNGच्या दरात 1 रुपये 10 पैशांची वाढ
Pune CNG Price Hike : पुण्यात CNG च्या दरात वाढ झालीयं... पर्यावरणपूरक आणि तुलनेने स्वस्त असणा-या CNG गॅसच्या दरात प्रतिकिलो 1 रुपये 10 पैशांची वाढ करण्यात आलीयं... 28 डिसेंबर पासून हे दर लागू करण्यात आलेत. आहेत... त्यामुळे नव्या दरानुसार CNG 89 रुपये किलोने मिळणारेय.... दरात वाढ झाल्याने वाहन चालकांनाही आर्थिक फटका सहन करावा लागणारेय...
29 Dec 2024, 08:11 वाजता
नवी मुंबई एअरपोर्टवर व्यावसायिक विमानाचं लँडिंग
Navi Mumbai Air Port : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे... दुपारी 12 वाजता पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे.. व्यावसायिक विमानाचे लँडिंग. रन वे, सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्वाची कामे पूर्ण झालीय.. 31 मार्च 2025 विमानतळ सुरू होण्याची डेडलाईन चुकणार नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलीय. महिन्याभरापूर्वी करण्यात आलेली लँडिंग टेस्ट यशस्वी झाल्यानंतर आता व्यावसायिक विमानाचे लँडिंग होणार आहे .
बातमीचा व्हिडीओ पाहा -
29 Dec 2024, 08:05 वाजता
दक्षिण कोरियात विमानाचा अपघात, 28 प्रवाशांचा मृत्यू
South Korea Plane Crash : दक्षिण कोरियामध्ये एका विमाचा अपघात झालाय.. मुआन एअरपोर्टवर ही दुर्घटना घडलीये... या विमान अपघातामध्ये 28 प्रवाशांचा मृत्यू झालाय.. हे विमान बँकॉकवरुन दक्षिण कोरियामध्ये आलं होतं.. या विमानामध्ये 175 प्रवासी होते.. लँडिंग गिअर फेल झाल्यामुळे एअरपोर्टवर हे विमान कोसळलं त्यानंतर विमानाच्या पुढच्या भागाला भीषण आग लागली.. यात 28 प्रवाशांचा मृत्यू झाला..
बातमी पाहा - साऊथ कोरियात मोठी दुर्घटना; लॅडिंग करताना विमानाचे दोन तुकडे, 28 जणांचा जागीच मृत्यू