29 Dec 2024, 17:34 वाजता
सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल मिळाले- अंजली दमानियांचं खळबळजनक ट्विट
Anjali Damania Tweet : सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरण दिवसेंदिवस तापतंय... मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सर्वपक्षी नेत्यांनी एकमुखी मागणी केलीय.. त्यानंतर आता अंजली दमानियांनी थेट बीडमध्ये धरणं आंदोलन सुरू केलंय. या प्रकरणात सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल मिळाले असल्याचं खळबळजनक ट्विट अंजली दमानिया यांनी केलंय.. मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात येतोय त्यामध्ये सरपंच संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ असल्याचं ट्विट दमानिया यांनी केलंय.. सरपंच हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी दमानिया यांनी लावून धरलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
29 Dec 2024, 14:21 वाजता
विधानसभा निकालाबाबत उत्तम जानकरांचा मोठा दावा
Uttam Jankar On Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार 20 हजार मतांनी पराभव झालाय, असा दावा आमदार उत्तम जानकरांनी केलाय. राष्ट्रवादीचे 12 आमदार निवडून आलेत. तर महायुतीचे एकूण 107 आमदार निवडून आल्याचा दावा जानकरांनी केलाय. चार महिन्यांच्या आत हे सरकार उद्ध्वस्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
29 Dec 2024, 13:56 वाजता
रुपाली ठोंबरेंसह 8 जणांवर गुन्हा दाखल
Rupali Thombare : रुपाली ठोंबरेंना आमदार जितेंद्र आव्हाडांच्या नावानं एक व्हाट्सअप चॅट व्हायरल करणं महागात पडलंय. रुपाली ठोंबरेंसह 8 जणांवर बीडमध्ये गुन्हा दाखल झालंय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते मोहसिन शेख यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडमधील मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांचा फोटो आणि मोबाईल क्रमांक वापरून बनावट व्हाट्सअप चॅट व्हायरल केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
29 Dec 2024, 13:08 वाजता
आरोपी हर्षकुमारचं पोलिसांना सात पानी पत्र
Sambhajinagar : संभाजीनगरमधील क्रीडा संकुल घोटाळा राज्यात गाजत असताना आता आरोपी हर्षकुमारच्या लेटरबॉम्बनं खळबळ उडालीय....क्रीडा संकुल घोटाळा आपण केला नाही तर आपल्याला करायला लावला असा दावा आरोपी हर्षकुमानं केलाय.. तसं लेटरच त्यानं लिहिलंय.. क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरून निधी लंपास केला. पैसे कढण्यासाठी संजय सबनीस यांनी जिवे मारण्याची धमकी दिली होती असा आरोप हर्षकुमारनं केलाय. संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यातून 21. 59 कोटींचा घोटाळा करण्यात आला.. पैसे घेऊन आरोपी हर्षकुमार क्षीरसागरनं फरार झालाय.. त्यानं पत्र लिहून चौकशीला तयार असल्याचं म्हलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
29 Dec 2024, 12:25 वाजता
हर्षकुमार क्षीरसागरच्या मैत्रिणीला अटक
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा करून पसार झालेल्या हर्षकुमार क्षीरसागरच्या मैत्रिणीला अटक करण्यात आलीय. अर्पिता असं या मैत्रिणीचं नाव आहे. नवी मुंबईच्या कोपरखैरणेमधून बेड्या ठोकल्यात. यामुळे हर्षकुमारच्या घोटाळ्याच्या रकमेबाबत मोठा उलगडा होण्याची शक्यताये. हर्षकुमारनं अवघ्या 11 महिन्यांत 21.59 कोटींचा घोटाळा करून कोट्यवधींचे फ्लॅट्स, महागड्या गाड्या खरेदी केल्यात. त्यांनी मैत्रीण अर्पितालादेखील या घोटाळ्याचा भागीदार केलं होतं. अर्पिताच्या नावानेच दीड कोटी रुपयांचा लक्झरियस फ्लॅट खरेदी केला होता. महत्त्वाचं म्हणजे हा फ्लॅट खरेदी करताना ते दोघे हजर आणि हा फ्लॅट रोखीने विकत द्यावा अशी गळ ही मंडळी बिल्डरला घालत असल्याचं समोर आलंय. बी. ए. च्या तिस-या वर्गात शिकणारी अर्पिता कोपरखैरणे भागात दोन खोल्यांच्या घरात राहत असल्याचीदेखील माहिती समोर आलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
29 Dec 2024, 11:57 वाजता
नागपुरात 2 चिमुकल्या मुलींचा विनयभंग
Nagpur Crime : नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील दिघोरा गावात एका नराधमानं दोन चिमुकल्यांचा विनयभंग केलाय.. या दोन्ही मुली घरासमोर खेळत होता.. त्यावेळी नराधमानं त्यांना खेळणं देण्याचं आमिष दाखवून घरीनेलं आणि त्यांचा विनयभंग केला.. मुलींनी घरी सगळा प्रकार सांगीतल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धावघेतली.. त्यानंतर पोलिसांनी या नराधमाला अटक केली..
29 Dec 2024, 11:50 वाजता
नंदुरबारच्या सातपुड्यात अवैध दारुसाठा जप्त
Nandurbar Liquor Seized : नंदुरबारच्या सातपुड्याच्या दुर्गम भागातील सावऱ्या डिगर येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई करत, अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. पोलिसांना अवैधरीत्या साठा करून ठेवळ्याची माहिती मिळाली होती, या माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या करावीत चार लाखाचा मद्यसाठा जप्त मरण्यात आला आहे. यात विदेशी मद्य आणि बियर चा समावेश आहे. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकांची कारवाई ही कारवी केली आहे. गुजरात राज्यात तस्करीसाठी ह मद्यसाठा करून ठेवल्याचा अंदाज असून, नवं वर्षच्या स्वागतासाठी त्याचा उपयोग केला जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गुजरात च्या सीमावरती भागात जिल्हा पोलीस दलाची करडी नजर असून, जिल्ह्यात अवैध मद्य विक्रीच्या विरोधात येणाऱ्या कळत ही मोहीम सर्च राहणार आहे
29 Dec 2024, 11:05 वाजता
इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली
Alandi Indrayani River : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.. इंद्रायणी नदी आळंदीमध्ये पुन्हा एकदा फेसाळली आहे. आतापर्यंत असंख्य वेळा आश्वासन देऊन ही सरकार, स्थानिक प्रशासन यांच्याकडून आळंदी मध्ये इंद्रायणी प्रदूषण रोखण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय...! या प्रदूषणासाठी जबाबदार असलेल्या कंपन्यांवर केवळ कारवाईचा फार्स केला जात असून इंद्रायणी नदी मध्ये केमिकल युक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कसलीही कारवाई होत नसल्याच यातून पुन्हा अधोरेखित होतंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
29 Dec 2024, 10:51 वाजता
सोलापुरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Solapur Crime : सोलापुरात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झालाय.. बारामतीमधून बार्शीकडे येणा-या बसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय.. आरोपीनं अल्पवयीन मुलीला मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवत तिचा विनयभंग केला.. हा प्रकार मुलीच्या पालकांना कळताच त्यांनी बार्शी पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला..
29 Dec 2024, 10:12 वाजता
भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं सूचक विधान
Sudhir Mungantiwar : आयुष्यात काही काळ धुके येतात मात्र ते कायम नसतात, असं विधान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. चंद्रपुरातील घुग्गुस या शहरात त्यांचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी त्यांनी एक सूचक विधान केलंय. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा होती. मंत्रिपद का दिलं नाही, असा सवालही मुनगंटीवारांच्या समर्थकांनी केला होता. सत्कार कार्यक्रमात त्यांनी एक किस्साही उपस्थितांना सांगितला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -