Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 04 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

4 Jan 2025, 20:31 वाजता

नाशिक जिल्हा रुग्णालयातून अवघ्या 5 दिवसांच्या बाळाची चोरी

 

Nashik Child Theft : नाशिक जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार.. रुग्णालयातून उत्तरप्रदेशातील महिलेचं बाळ पळवलं.. अवघ्या पाच दिवसाचं बाळ अज्ञात  महिलेने चोरून नेल्याने जिल्हा रुग्णालयात खळबळ.. वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा रुग्णालयात तपासासाठी दाखल..  बाळ पळवणारी महिला सीसीटीव्हीत चित्रित.. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्ह्याची तक्रार दाखल करणार.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

4 Jan 2025, 17:10 वाजता

संतोष देशमुख हत्येतील आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी

 

Beed Santosh Deshmukh Case : बीड देशमुख हत्याकांड प्रकरणातील दोन्ही पक्षांचे युक्तिवाद संपला असून, हत्येप्रकरणी आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी.. तिन्ही आरोपींना 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी.. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणेला पोलीस कोठडी.. केज न्यायालयानं आरोपींना सुनावली पोलीस कोठडी. आरोपींची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची सरकारी वकिलांनी केलेली मागणी.

 

4 Jan 2025, 16:35 वाजता

मुंबईत वांद्रा येथे ज्ञानेश्वरनगरमधील झोपडपट्टीत भीषण आग

 

Mumbai Fire : मुंबईत वांद्रे परिसरात भीषण आग.. ज्ञानेश्वरनगरमधील झोपडपट्टीत आग.. 10 ते 15 झोपड्यांना भीषण आग.. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Jan 2025, 16:32 वाजता

मुंबईत वांद्रा येथे ज्ञानेश्वरनगरमधील झोपडपट्टीत भीषण आग

 

Mumbai Fire : मुंबईत वांद्रे परिसरात भीषण आग.. ज्ञानेश्वरनगरमधील झोपडपट्टीत आग.. 10 ते 15 झोपड्यांना भीषण आग.. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

4 Jan 2025, 16:13 वाजता

संतोष देशमुख हत्येतील आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी द्या- सरकारी वकील

 

Beed Santosh Deshmukh Case : बीड देशमुख हत्याकांड प्रकरणातील दोन्ही पक्षांचे युक्तिवाद संपला असून, थोड्याच वेळात केज न्यायालयाकचडून निर्णय दिला जाईल. आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेची 15 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. कंपनीत जाऊन दमदाटी केली जाते, तसंच धमकावलं जातं. यामुळे बीड जिल्ह्यात उद्योग येणं कठीण झाल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असून, सर्व आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करायची असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

4 Jan 2025, 14:52 वाजता

बीड बदनाम केलं, आता पुणे बदनाम करायचंय- जरांगे

 

Manoj Jarange : 'बीड बदनाम केलं, आता पुणे बदनाम करायचंय'...मनोज जरांगेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल...बदनाम करण्यात मंत्र्यांचा हात-मनोज जरांगे...आरोपींना फरार करण्यात आले-मनोज जरांगे

4 Jan 2025, 13:46 वाजता

उद्धव ठाकरेंना खासगी कंपनीची सुरक्षा

 

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना खासगी कंपनीची सुरक्षा व्यवस्था...उद्योगपतीकडून ठाकरेंना सुरक्षा व्यवस्था..पोलिसांसोबत खासगी सुरक्षा व्यवस्थाही तैनात... ठाकरे कुटुंबालाही खासगी सुरक्षा व्यवस्था

4 Jan 2025, 13:06 वाजता

चौकशी ऑन कॅमेरा करावी- अंजली दमानिया

 

Anjali Damania on Santosh Deshmukh murder Case : दोन आरोपींना अटक झाली- दमानिया...सूत्रधार कोण समोर येणार- दमानिय...चौकशी ऑन कॅमेरा करावी अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया दिलीये

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

4 Jan 2025, 12:49 वाजता

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण, विशाल गवळीसह पत्नीला 18 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

 

Kalyan : कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण.....मुख्य आरोपी विशाल गवळी आणि साक्षी गवळी यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. 18 तारखेपर्यंत दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलीय. कल्याण सत्र न्यायालायने ही न्यायालयीन कोठडी सुनावलीय. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी नऊ दिवसांच्या पोलीस कोठडीत सर्वं काही निष्पन्न झाल त्यामुळे न्यायालयान कोठडी मिळावी अशी मागणी करण्यात आलीय होती. 
 

4 Jan 2025, 12:31 वाजता

'वाल्मिक 28 डिसेंबरपर्यंत पुण्यात होता',आमदार संदीप क्षीरसागरांचा आरोप

 

Sandeep Kshirsagar on  Santosh Deshmukh murder Case : वाल्मिक 28 डिसेंबरपर्यंत पुण्यात होता असा आऱोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय..वाल्मिकचं सीसीटीव्ही काढा- संदीप क्षीरसागर...वाल्मिक 28 डिसेंबरपर्यंत पुण्यात होता- संदीप क्षीरसागर...'हॉस्पिटलमध्ये कोण कोण भेटलं सीसीटीव्ही काढा'... पुण्यातील हॉस्पिटलमध्ये वाल्मिकला कोण कोण भेटलं त्याचं सीसीटीव्ही तपासण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलीय...धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा त्यांनी केलीय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-