4 Jan 2025, 11:48 वाजता
पकडलेले आरोपी प्यादे, मुख्य आरोपी आका- सुरेश धस
Suresh Dhas on Santosh Deshmukh Case : 'पकडलेले आरोपी प्यादे, मुख्य आरोपी आका'...आरोपींच्या अटकनेनंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया...आरोपींना अटक केल्याने LCBचं अभिनंदन...आरोपींच्या अटकनेनंतर आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया
बातमीचा व्हिडीओ पाहा-
4 Jan 2025, 11:34 वाजता
पिंपरी चिंचवडमध्ये पिझ्झामध्ये आढळला चाकूचा तुकडा
Pimpri Chinchwad : ऑनलाईन पिझ्झा मागवताना सावधान...पिझ्झामध्ये आढळला चाकूचा तुकडा..पिंपरी चिंचवडच्या भोसरीमधील घटना..ऑर्डर केलेल्या पिझ्झामध्ये चाकूचा तुकडा'
बातमीचा व्हिडीओ पाहा-
4 Jan 2025, 10:12 वाजता
भाजपचा पुन्हा एकदा बविआला धक्का
Vasai : भाजपने पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीला धक्का दिलाय. भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वसईतील अनेक पदाधिका-यांनी आज भाजपत प्रवेश केलाय. बविआचे तिन्ही आमदार पाडल्यानंतर आता वसई-विरार महापालिकेकडे भाजपचं विशेष लक्ष आहे.
4 Jan 2025, 09:57 वाजता
महायुतीत पालकमंत्रिपदाचा तिढा कायम-सूत्र
Maharashtra Politics : महायुतीत पालकमंत्रिपदाचा तिढा कायम-सूत्र...पालकमंत्रिपदासाठी अद्यापही रस्सीखेच-सूत्र...नाशिकमध्ये भाजप, शिवसेनेत स्पर्धा... तर सोलापूरसाठी भाजपसोबतच राष्ट्रवादीदेखील इच्छुक...रायगड व कोल्हापूरसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेत चढाओढ
4 Jan 2025, 09:12 वाजता
संतोष देशमुख हत्येप्रकरणी तिघांपैकी 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात- सूत्र
Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणी फरार तीन आरोपीं पैकी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..हत्येप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला ताब्यात घेतल्याची माहिती...तर सरपंच संतोष देशमुख यांचे लोकेशन देणारा... आणखी एकां संशयीताला ताब्यांत..एकूण तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे...हत्येच्या 25 दिवसानंतर दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती...अजूनही एक आरोपी फरार असल्याची माहिती
4 Jan 2025, 08:40 वाजता
भंडाऱ्यात अंगणात खेळताना चार वर्षाचा मुलगा बेपत्ता
Bhandara : तुमसर तालुक्यातील चिखला गावाच्या 52 कॉलनीतल्या एका घरात अंगणात खेळताना चार वर्षाचा मुलगा बेपत्ता झालाय. गेल्या तीन दिवसांपासून त्याचा शोध सुरू आहे. श्वास पथकालाही पाचारण करण्यात आलं. मात्र अद्याप या चिमुकल्याचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही. चिमुकल्याचं अपहरण किंवा हिंस्र प्राण्याने शिकार तर केली नसावी, या शक्यतेतून वनविभाग आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केलीय. मात्र वनविभाग आणि पोलीस योग्य तशी शोधमोहीम करत नसून एकमेकांवर जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे उद्या पोलीस स्टेशन आणि वनविभागाच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणार असल्याचं गावक-यांनी सांगितलंय.
4 Jan 2025, 08:01 वाजता
प्लास्टिक बंदीबाबत आता कडक कारवाई होणार
Strict Action Will Be Taken Regarding Plastic Ban : प्लास्टिकचा वापर केल्यास आता विक्रेत्यांसह मुंबईकरांकडूनही दंड वसूल केला जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बीएमसी प्लास्टिक बंदीबाबत कारवाई करणार आहे. प्लास्टिक बंदीबाबतच्या आवश्यक सूचना पालिकेला देण्यात आल्या असून विक्रेता आणि खरेदीदार असा कोणताही भेदभाव केला जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आता मुंबईकरांच्या हातात दिसल्यास ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणारेय.
4 Jan 2025, 07:37 वाजता
कल्याणमधील मुलीवर अत्याचार-हत्या प्रकरण, विशाल गवळीला आज कोर्टात हजर करणार
Kalyan Crime : कल्याणमधल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या विशाल गवळीला आज पुन्हा कल्याण कोर्टात हजर केलं जाणार आहे. विशाल गवळीसोबत त्याची पत्नी साक्षी गवळीबाबतही आज कोर्टात सुनावणी होणार आहे. विशालच्या गुन्ह्यात त्याची पत्नी साक्षी गवळी हिचाही सहभाग होता त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. आज त्यां दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने न्यायालय आता काय शिक्षा सुनावते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
4 Jan 2025, 07:32 वाजता
परभणीत आज संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ मोर्चा
Parbhani Morcha For Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीत मोर्चा काढला जाणारेय. जिंतूर रस्त्यावरील नूतन कॉलेजच्या मैदानावरून सर्वधर्मीयांच्या वतीने हा मोर्चा काढला जाणारेय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील या मोर्चात सहभागी होणार आहेत. तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, परभणीचे खासदार संजय जाधव, आमदार सुरेश धस,संदीप क्षीरसागर, राहुल पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होणारेत. सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणारेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-