Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 09 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

9 Jan 2025, 21:13 वाजता

आकाचा आकाही अडचणीत येणार.. धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

 

Suresh Dhas on Aaka : पैठणच्या सभेतून सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत... खंडणीसाठी वाल्मिकनं फोन केला असेल तर आकाही अडचणीत येईल असं सुरेश धस यांनी म्हटलंय.. तसेच परळीतील वाढत्या गुन्हेगारीला आकाचा आका जबाबदार असल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे मुंडेंवरच निशाणा साधलाय..तर याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र धनंजय मुंडेंचा बचाव केल्याचं दिसतंय...सीआयडी, पोलीस चौकशीत दोषी आढळले तर धनंजय मुंडेंवर कारवाई करू... असं अजित पवारांनी म्हटलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा -

9 Jan 2025, 19:37 वाजता

मुन्नी हा राष्ट्रवादीतील पुरुष नेता- सुरेश धस

 

Suresh Dhas & Ajit Pawar on Munni : पैठणमधील सभेनंतर बीड हत्याकांडाचा संदर्भ देत, भाजप आमदार सुरेश धस यांनी मुन्नीचा पुनरुच्चार केला. यावर बोलताना सुरेश धस यांनी ही मुन्नी राष्ट्रवादी पक्षातली असल्याचं सांगितलं. सोबतच मुन्नी असा आपण उल्लेख केला असला तरी ही मुन्नी राष्ट्रवादी पक्षातील पुरुष नेता असल्याचा खुलासा सुरेश धस यांनी केला. यावर अजित पवरांना विचारलं असता, त्यांनी याबाबत धस यांनाच विचारा असं उत्तर दिलं. 

 

9 Jan 2025, 18:09 वाजता

बेळगावात कानडी संघटनेची अरेरावी

 

Belgaon Kanadi Andolan : मराठी भाषिक बेळगावात कानडी संघटनेची अरेरावी पाहायला मिळाली. कानडी संघटनेनं बेळगाव महापालिकेत घुसून गोंधळ घातला.. बेळगाव महापालिका बरखास्त करण्याची मागणी त्यांनी केली. बेळगावात 'जय महाराष्ट्र' म्हटलाने कानडींना पोटशूळ उठल्याचं पाहायला मिळालं.. जय महाराष्ट्र म्हटल्याने शिवेंद्रराजेंविरोधात कानडी संघटनेनं घोषणाबाजी केली. 

 

9 Jan 2025, 17:18 वाजता

राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्तीची याचिका फेटाळली

 

Case of Governor-appointed MLA : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणात महायुती सरकारला मोठा दिलासा..  राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्तीची याचिका फेटाळली.. मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका.. सुनील मोदी यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली.

 

9 Jan 2025, 16:16 वाजता

पाप झाकायला धनंजय मुंडेंकडून ओबीसीचा आधार - मनोज जरांगे

 

Jarange on Dhananjay Munde : मनोज जरांगे यांनी पैठणमधल्या सभेतून धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. आपण कोणत्याच जातीला दुखावलं नाही. उलट आपलं पाप झाकण्यासाठी आता धनंजय मुंडे ओबीसीचा आधार घेत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. खून, पाप करणार तुम्ही आणि नंतर बचावसाठी ओबीसीला ओढणार का असा सवाल यावेळी जरांगेंनी केला. तर 25 जानेवारीच्या मराठा आरक्षणासाठी उपोषणानंतर धनंजय मुंडेंना कायदेशीर लढा देणार असल्याचंही यावेली जरांगे म्हणाले.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

9 Jan 2025, 16:04 वाजता

परळीचे पोलीस आकाच्या इशाऱ्यावर सगळं गोळा करतात- सुरेश धस

 

Suresh Dhas : संभाजीनगरच्या पैठणमध्ये आयोजित आक्रोश मोर्चामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीड हत्याकांडप्रकरणी पुन्हा एकदा आक्रमक आघाडी उघडली. परळीचे पोलीस आकाच्या इशा-यावर सगळं गोळा करतात. यांच्या हप्त्यामुळे अनेक कंपनया सोडून गेल्याचा आरोप धस यांनी केला. तसंच याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असून, वाल्मिक कराडनं मोठी संपत्ती जमवली आहे आणि आता हे सगळे प्रकरण ईडीच्या दरबारात गेल्याचं धस यांनी सांगितलं. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

9 Jan 2025, 13:51 वाजता

मंत्रालयात आलेली अलिशान लँबॉर्गिनी कार स्काय लाईन कमर्शियल ट्रस्टची? 

 

Mumbai Mantralay : बुधवारी मंत्रालयात अलिशान लँबॉर्गिनी कार आल्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या.... ही कार स्काय लाईन कमर्शियल ट्रस्टची असल्याची माहिती आहे. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी या कारमधून कोणी तरी  आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे  सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर तासंतास वाट बघावी लागते मात्र या अलिशान  कारला काल चेक न करताच मंत्रालयात थेट सोडण्यात आलं. विशेष म्हणजे या कारच्या काचा या काळ्या रंगाच्या होत्या. त्यामुळे कारमध्ये कोण होत याची अधिकची माहिती मिळू शकली नाही. मात्र ही अलिशान कार मंत्र्यांचा ताफा ज्या ठिकाणी उभा राहतो त्या ठिकाणी थांबल्याने सर्वांच्या नजरा या अलिशान कारकडे होत्या....

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

9 Jan 2025, 13:32 वाजता

बुलढाण्यातील पाण्यात नायट्रेटसारखा विषारी घटक

 

Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट हाती येत आहे... बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आलाय.. तर पाण्याची टीडीएसची पातळीही मोठ्या प्रमाणात वाढलीये.. पाण्याच्या तपासणीत ही धक्कादायक बाब उघडकीस आलीये... गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरतंय.. खारपाण पट्ट्यातील या गावात पिण्याची पाण्याची वेगळी सोय केलेली आहे, मात्र वापरण्याच्या पाण्यात नाइट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य देखील नसल्याचं धक्कादायक वात्सव समोर आल आहे... पाणी तपासणीचा अहवाल झी 24 तासच्या हाती लागलंय

9 Jan 2025, 12:21 वाजता

चाळीसगावमध्ये अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार

 

Jalgaon Firing : जळगावच्या चाळीसगावात अज्ञात व्यक्तीनं दगडफेक करून हवेत गोळीबार केला. बाळू मोरे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी सुमित भोसलेच्या घरासमोर हा गोळीबार झाला. दहशतीसाठी पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीच्या घराची झडती घेतली आणि हत्यारं तसंच जिवंत काडतुसं जप्त केली.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

9 Jan 2025, 12:16 वाजता

मालेगावातील बाल रुग्णालयात रुग्णांची गर्दी

 

Malegaon : मालेगावातील बाल रुग्णालयांमध्ये रूग्णांची गर्दी झालीय.. वातावरणातल्या बदलामुळे  सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झालीये. दूषित पाण्यामुळेही मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. HMP व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढलीय.. दरम्यान, यासाठी यंत्रणा सज्ज आहे, असं आरोग्य अधिका-यांनी सांगितलंय. मात्र लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असा सल्लाही वैद्यकीय अधिका-यांनी दिलाय....