10 Jan 2025, 11:18 वाजता
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा मविआला घरचा आहेर
Vijay Wadettiwar : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मविआला घरचा आहेर दिलाय.. जागावाटपात घातलेल्या घोळाचा फटका बसल्याचं वडेट्टीवार म्हणालेत.. जागावाटपचा घोळ दोन दिवसात संपला असता तर प्रचार आणि प्लॅनिंगसाठी वेळ मिळाला असता असं वडेट्टीवार म्हणालेत. अप्रत्यक्षपणे त्यांनी नाना पटोले आणि संजय राऊतांना यासाठी जबाबदार धरलंय... तर राऊतानीही यावर उत्तर देताना काँग्रेसवर खापर फोडलंय.. यामुळे काँग्रेस आणि शिवसेना UBTयांच्यातील या आरोप प्रत्यारोपांवरुन मविआत वादाची ठिणगी पडलीये..
10 Jan 2025, 11:16 वाजता
अमोल कोल्हेंचा शिवसेना UBT आणि काँग्रेसला टोला
Amol Kolhe On Shivsena UBT & Congress : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अमोल कोल्हेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसवर टीका केलीये. काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही.. शिवसेना UBT अजून झोपेतून जागी व्हायला तयार नाही असा हल्लाबोल कोल्हेंनी केलाय.....
10 Jan 2025, 10:01 वाजता
मुंबईतील प्रदूषणावरुन हायकोर्टानं राज्य सरकारला सुनावलं
Mumbai Pollution : मुंबईत वाढत्या प्रदूषणाचा प्रश्नावरून हायकोर्टने प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि राज्य सरकारला फटकारलंय. मुंबईची हवा अत्यंत वाईट झालेली असून सरकारला याचे जराही गांभीर्य नाही प्रदूषण नियंत्रणाबाबत आम्ही वारंवार आदेश देऊनही सरकार अजून झोपलेलेच आहे अशा शब्दात न्यायमूर्ती यांनी प्रशासनावरती ताशे ओढलेत.. बांधकामं प्रदूषण वाढवणारी वाहनं आणि बेक-यांमधून निघणा-या धुरानं मुंबई गुदमरलीये. याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय.. याबबात खंडपीठाने चिंता व्यक्त केलीये.. तसंच मुंबईची परिस्थीती दिल्लीसारखी होऊ देऊ नका असं ठणकावलंय.
10 Jan 2025, 09:33 वाजता
भंडाऱ्यात एकाच नंबर प्लेटच्या 2 स्कूल बस
Bhandara Same Number Plate Vehicle : भंडारा शहरात धक्कादायक वास्तव समोर आले एकाच नंबरच्या दोन स्कूल व्हॅन आपल्याला पाहायला मिळतंय... मात्र गेली अनेक महिन्यांपासून ह्या दोन्ही प्रायव्हेट स्कूल व्हॅन लहान चिमुकल्या मुलांना घेऊन रस्त्यावर धावत आहेत. मात्र शहरात दोन गाड्या एकच नंबर प्लेटच्या धावत असताना आरटीओ विभाग आरटीओ विभागाला याची माहिती नव्हती.. इतकच नाही तर या दोन्ही गॅस किट वर चालत असून संस्थाचालक खुलेआमपणे या प्रायव्हेट स्कूल व्हॅन मध्ये घरगुती गॅस भरला जातोय.. . हा सगळा प्रकार भंडारा शहरातील एसआरसी कॉन्व्हेंट स्कूल मध्ये खुलेआम सुरू आहे. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे. लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरू असताना प्रशासन आणि आरटीओ विभागाचं दुर्लक्ष आहे...
10 Jan 2025, 08:53 वाजता
सरकार नवं वाहन खरेदी धोरण आणणार?
New Vehicle Regulation : वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभाग विचार करीत आहे. जपानच्या धर्तीवर राज्यात एक नवीन धोरण राबवलं जाणारेय. वाढती वाहतूक कोंडी, रस्ते अपघात, वाहन उभे करण्यासाठी जागेचा अभाव, इंधनाचा अमर्याद वापर यावर निर्बंध आणण्यासाठी वाहन खरेदीवरच नियंत्रण आणण्याचा विचार सुरू आहे. यासाठी 100 दिवसांचा आराखडादेखील तयार करण्यात आलाय. या आराखड्यामध्ये नवीन धोरणाचा समावेश केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Jan 2025, 07:53 वाजता
उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद
Uddhav Thackeray Press Conference : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेणारेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्यातील पूर्ण झालेल्या कामाची माहिती पत्रकार परिषदेतून देणारेत. दुपारी साडेचार वाजता दादरच्या शिवाजी पार्क इथं पत्रकार परिषद घेणारेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे सचिव सुभाष देसाई हे या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणारेत. उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत राजकीय परिस्थितीवर भाष्य करणार का, याकडंही सर्वांचं लक्ष लागून आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Jan 2025, 07:49 वाजता
जालन्यात मराठा समाजाचा मोर्चा
Jalna Maratha Samaj Protest : संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आज जालन्यात मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे.. सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरूवात होणार आहे.. छत्रपती संभाजी महाराज उद्यानापासून मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयातपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.. जालन्यातली या मोर्चात हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहे.. संतोष देशमुख यांचं कुटुंबीयही मोर्चात सहभागी होणार आहे तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे, सुरेश धस,संदीप क्षीरसागरही मोर्चात सहभागी होणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -