10 Jan 2025, 20:22 वाजता
वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात पुरता अडकणार?
Walmik Karad : परळीचा बाहुबली वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात.. वाल्मिक कराड आता खंडणी प्रकरणात पुरता अडकण्याची शक्यता निर्माण झालीय. वाल्मिक कराड याने आवादा पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केल्याची माहिती समोर आलीय. त्याची मोबाईल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलीये. त्यामुळं वाल्मिक आता सुटण्याची शक्यता कमी झालीये. वाल्मिकचा पाय किती खोलात गेलाय.
10 Jan 2025, 19:11 वाजता
भिवंडीत भंगाराच्या गोदामातील आगीवर नियंत्रण
Bhiwandi Fire : भिवंडीच्या ओवळी गावाजवळील एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीमध्ये भंगाराची चार ते पाच गोदामं जळून खाक झालेत. गोदामात मोठ्या प्रमाणात पेपरचे रोल असल्यानं गोदामातील आग भडकली आणि गोदामं जळून खाक झालं. आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी गोदाम मालकांचे लाखोंचं नुकसान झालंय... अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
10 Jan 2025, 18:21 वाजता
मनोज जरांगे रुग्णालयात दाखल
Manoj Jarange Admitted to Hospital : मराठा आंदोलक मनोज जरांगेंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे... जरांगेंना भोवळ आल्यामुळे संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Jan 2025, 17:55 वाजता
आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी
Vishnu Chate sent to Judicial custody : बीड संतोष देशमुख खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. विष्णू चाटेची 4 दिवसांची कोठडी आज संपली. त्यामुळे त्याला केज कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Jan 2025, 16:12 वाजता
सर्व जातीच्या सफाई कामगारांना घरं मिळणार.. औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय
Safai Kamgar will get Houses : सर्व जातीच्या सफाई कामगारांना वारसा हक्काने घरं मिळणार असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा निर्णय दिलाय... लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसांना घरं मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.. म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी ही माहिती दिलीये...तसेच वाल्मिकी, रुखी, मेहतर आणि अनुसूचित जाती वगळता इतर जातींना वारसा हक्काने नोकरी देण्यास स्थगिती देण्यात आली आहे...त्याचबरोबर मराठा, ओबीसी आणि इतर जातींच्या वारसांना हक्काची घरे मिळणार असल्याचा मोठा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Jan 2025, 14:01 वाजता
जळगावमध्ये गोळीबाराच्या घटना वाढल्या
Bhusawal Firing : गोळीबाराच्या घटनेनं जळगाव जिल्हा हादरलाय.. जळगाव जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी गोळीबार झालाय. चाळीसगावनंतर आता भुसावळमध्ये तरुणावर गोळीबार करण्यात आला.. चहाच्या दुकानात या तरुणावर आरोपीनं 5 राऊंड फायर केले.. यात एक तरुण गंभीर जखमी झालाय. त्याला रुग्णआलयात दाखल करण्यात आलं असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Jan 2025, 13:33 वाजता
राज्यात दारु महागण्याची शक्यता
State Liquor Price : राज्यात दारु महागण्याची शक्यता आहे.. राज्य उत्पादन शुक्ल विभाकाकडून महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी दारुवरील कर वाढवण्याचा विचार सरकार करत आहे.. यासाठी गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आलीये. ही समिती मद्य निर्मिती धोरण, उत्पादन शुल्क आणि कर संकलन वाढीचा अभ्यास करुन अहवाल सादर करणार आहे. त्यासाठी या समितीला दोन महिन्यांची मुदत देण्यात आलीये.
10 Jan 2025, 13:26 वाजता
नांदेडच्या बिलोलीमध्ये बापलेकाचा करुण अंत
Nanded Suicide : कपडे, वह्या आणि पुस्तकांसाठी पैसे न मिळाल्यानं दहावीत शिकणा-या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केलीय. मुलाच्या मृत्यूचं दु:ख सहन न झाल्यानं वडिलानं मुलाचा मृतदेह खाली उतरवून त्याच दोरीनं गळफास घेतलीय. -हदय पिळवटणारी ही घटना बिलोलीच्या मिनकी या गावात घडलीय. ओमकार पैलवार हा उदगीरच्या शाळेत शिकत होता. सुट्या असल्याने तो गावी आला होता. कपडे आणि वह्या-पुस्तकं घेण्यासाठी त्यानं वडिलांकडे हट्ट केला. पण दोन एकर शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांकडे पैसे नव्हते. दोन दिवसात घेऊन देतो म्हणून वडील त्याला समजावून सांगत होते. पैसे न मिळाल्यानं मुलांनं शेतात जाऊन गळफास घेतला. या घटनेमुळं गावावर शोककळा पसरलीय.
बातमी पाहा - वह्या, पुस्तकं न मिळाल्याने दहावीच्या विद्यार्थ्यानं स्वतःला संपवलं; तिथेच बापाने सोडला जीव
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Jan 2025, 13:21 वाजता
मुलींच्या शिक्षणबाबत सुप्रीम कोर्टाचं मत
Girl Education : मुलीला तिच्या शिक्षणासाठी वडिलांकडून आर्थिक सहाय्य मिळवण्याचा कायदेशीर हक्क आहे, असं स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टानं दिलीय. न्यायमूर्ती सूर्या कांत आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने 2 जानेवारीला एका विवाहित वादाच्या प्रकरणात असं म्हटलंय. एक दाम्पत्याची मुलगी आयर्लंडमध्ये शिक्षण घेत होती. मुलीने तिच्या वडिलांकडून 43 लाख रुपये घेतले. मात्र हे पैसे पोटगीचा भाग होता. मुलीला तिच्या शिक्षणाचा हक्क आहे आणि यासाठी वडिलांना तिच्या शिक्षणासाठी निधी पुरवण्यास बंधनकारक ठरवता येईल
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Jan 2025, 12:39 वाजता
पुण्यात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही?
Pune : पुण्यात जामिनावर सुटलेल्या एका गुंडाची चक्क रॅली काढण्यात आली.. दहशत पसरवण्यासाठी या रॅलीचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हारयल करण्यात आला.. ही रॅली म्हणजे अक्षरशः हैदोस होता. त्याचे समर्थक मर्डर करायचाय मर्डर करायचा अशा घोषणा देत होते.. त्यामुळे पुण्यामध्ये पोलिसांचा काही वचक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय.. दरम्यान हा व्हिडियो सोशल मिडावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी 9 जणांना अटक केलीय... मात्र पोलिसांची ही कारवाई म्हणजे वरातीमागून घोडे अशीच म्हणता येईल.. या घटनेच्या आदल्या दिवशी पोलीस आयुक्तांनी एका जाहीर कार्यक्रमात पुण्यातील गुंडांना दम भरला होता. मात्र त्याचाही या गुंडांवर काहीच परिणाम झालेला दिसत नाहीये.. त्यामुळे गुंडांना पोलिसांचा वचक उरला नाही असं चित्र सध्या पुण्यात दिसतंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -