Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 01 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

1 Jul 2024, 12:59 वाजता

येऊरमध्ये अवैध बारवर कारवाईला सुरुवात

 

Thane Mahaplika Action : येऊरमध्ये अवैध बारची बातमी झी 24 तासवर दाखवताच कारवाईला वेग आलाय...ठाणे महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आलीय...जितेंद्र आव्हाड यांनी येऊरमध्ये अवैध बार सुरू असल्याचा आरोप केला होता...त्यानंतर या कारवाईला वेग आलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

1 Jul 2024, 11:39 वाजता

पुण्यात झिकाचा धोका वाढला

 

Pune Zika Virus : एरंडवणे भागातील एका गर्भवतीला झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आलंय. या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय. मात्र, तिच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जाणारे. शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या आता 5 वर गेलीय. आरोग्य विभागानं नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

1 Jul 2024, 11:03 वाजता

ताडोबात 30 सप्टेंबरपर्यंत नो एंट्री

 

Tadoba : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर भागात आजपासून पर्यटन बंद करण्यात आलंय. दरवर्षी 1 जुलैपासून 30 सप्टेंबरपर्यंत पावसामुळे पर्यटन बंद ठेवलं जातं. वन्यजीवांच्या प्रजनन काळात कुठलाही व्यत्यय येऊ नये, तसंच पावसामुळे रस्ता वाहनं जाण्याच्या स्थितीत नसल्याने प्रकल्पाचं गाभा क्षेत्र बंद ठेवलं जातं. शेवटच्या दिवशी सोनम वाघीण आणि तिच्या 3 बछड्यांनी पर्यटकांना दर्शन दिलं. वन्यजीव छायाचित्रकार श्रीपाद पिंपळापुरे यांनी आपल्या कॅमेरात ही दृश्यं चित्रित केली

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

1 Jul 2024, 10:45 वाजता

Pune Car Accident Update : पुणे कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर येतेय...आरोपीच्या सुटकेविरोधात पुणे पोलीस सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहेत...पुणे पोलीस हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहेत..राज्य सरकारने त्यासाठी परवानगी दिली असून पुणे पोलीस लवकरच सुप्रीम कोर्टात त्यासाठी याचिका दाखल करणार आहेत...त्याचबरोबर या अल्पवयीन मुलाकडून घडलेला गुन्हा गंभीर असल्याने त्याच्यावर सज्ञान म्हणून खटला चालवण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत...सुप्रीम कोर्टाने पुणे पोलिसांची मागणी मान्य केल्यास त्या अल्पवयीन मुलाची पुन्हा बाल निरीक्षणगृहात रवानगी होऊ शकते...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

1 Jul 2024, 09:29 वाजता

पावसानं दडी मारल्यानं जून महिना कोरडाच

 

Monsoon Update : यंदा मान्सून लवकरच दाखल झाल्याने देशभरात उत्साहाचे वातावरण होते...मात्र, पावसाच्या पहिल्याच महिन्यात जूनमध्ये त्याच्या प्रवासात खंड पडल्याने या उत्साहावर पाणी फिरलंय...पाऊसतुटीमुळे चिंता निर्माण झालीय...जून महिन्यात पूर्ण देशात सरासरीपेक्षा 11 टक्के कमी पाऊस झालाय...जूनमध्ये या महिन्याच्या दीर्घकालीन सरासरीच्या 93 ते108 टक्के पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात होती...मात्र, पावसाने ओढ दिल्याने सर्व भिस्त जुलै आणि ऑगस्टवरच आहे...जूनमधील पाऊसमानानुसार देशातील 49 टक्के जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे...राज्यात जूनमधील सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी मुंबईत मात्र, सुमारे 35 टक्के तूट आहे...त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट कायम आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

1 Jul 2024, 09:14 वाजता

एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले

 

Lonavala Bhushi Dam : भुशी डॅम बॅक वॉटरफॉल घटनेतील आणखी एक व्हिडिओ समोर आलाय...धबधब्यात 10 जण अडकल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसतंय...धबधब्यात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने सगळेजण एकमेकांना पकडून आपला जीव वाचण्याचा प्रयत्न करत होते...बाहेरील काही नागरिकांनीही यांना वाचवण्याचा प्रयत्न केला...मात्र, पाण्याच्या प्रवाहासमोर हे सगळे टीकू शकले नाहीत...त्यामुळे सगळेजण वाहून गेले...यात पाच जणांना वाचवण्यात यश आलं...मात्र, 5 जण वाहून गेले...यातील तिघांचा मृतदेह हाती लागलाय...तर दोघांचा शोध सुरू आहे...भारतीय नौदलाच्या गोताखोरांच्या पथकाकडून शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे...आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, दोघांचा शोध सुरू आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

1 Jul 2024, 09:03 वाजता

संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार?

 

Sansad Adhiveshan : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही NEETवरून गोंधळाची स्थिती कायम राहण्याची शक्यताय. NEET पेपरफुटी प्रकरणासह महागाई आणि इतर प्रश्न विरोधकांच्या अजेंड्यावर असणारेत. त्यामुळे आज विरोधक सरकारला धारेवर धरणाची शक्यताय. तर विरोधकांना उत्तर देण्यासाठी सत्ताधा-यांनीही रणनीती आखलीय. त्यामुळे आज दोन्ही सभागृह वादळी ठरण्याची शक्यताय. विरोधी पक्षनेते राहुल गांधीही आज संसदेत आवाज उठवतील. तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

1 Jul 2024, 09:01 वाजता

देशात 3 नवे फौजदारी कायदे

 

India New Law : भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याची भाषा मोठ्या प्रमाणात बदलणारेय. आजपासून 3 ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे हद्दपार होणारेत. त्याजागी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे 3 नवे कायदे अमलात येतायत. यापुढे सर्व फौजदारी गुन्हे नोंदवण्यापासून ते त्यांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया नव्या संहितांनुसार राबविली जाणारेय. नव्या कायद्यांत तीन वर्षांच्या कालावधीत संपूर्ण न्यायप्रक्रिया पूर्ण करण्याची तरतूद आहे. कायद्याच्या 35 कलमांमध्ये न्यायप्रक्रियेसाठी वेळेचं बंधन दिलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

1 Jul 2024, 08:51 वाजता

व्यावसायिक गॅस सिलेंडर दरात 30 रुपयांनी कपात

 

Commercial Gas Cylinder : व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आलीय. 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये 30 रुपयांनी स्वस्त झालाय. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

1 Jul 2024, 08:24 वाजता

शिक्षक, पदवीधर मतदारसंघाचा आज निकाल

 

Teacher And Graduate Constituency Election : विधान परिषदेच्या 4 जागांचा आज निकाल लागणाराय...शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे...मुंबई, कोकण मतदारसंघात अनिल परब, किरण शेलार, डावखरेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय...तर नाशिकमध्ये संदीप गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये कोण बाजी मारणार? याचीच उत्सुकता सर्वांना आहे...सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झालीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा -