Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 01 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

1 Jul 2024, 22:05 वाजता

 प्रज्ञा राजीव सातवांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

 

Pradnya Satav : प्रज्ञा राजीव सातव यांना काँग्रेसकडून उमेदवारी...विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार जाहीर...माजी आमदार प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी

1 Jul 2024, 20:26 वाजता

'स्वत:ला हिंदू समजणारे हिंसा करता', राहुल गांधींची मोदींवर टीका

 

Rahul Gandhi : हिंदूंवरून संसदेमध्ये खडाजंगी पहायला मिळाली....विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत अहिंसेचा देश असल्याचं म्हणत...पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना जे स्वत:ला हिंदु समजतात ते हिंसा, द्वेष परवणं आणि असत्य गोष्टी करताहेत, असा टोला लगावला...तर संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक बोलणं गंभीर असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर केला...त्याला राहुल गांधींनी पलटवार करताना नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएस संपूर्ण हिंदू समाज नसल्याचं म्हटलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

1 Jul 2024, 19:03 वाजता

मिलिंद नार्वेकरांना विधान परिषदेचं तिकीट 

 

Milind Narvekar : मिलिंद नार्वेकरांना विधान परिषदेचं तिकीट मिळालंय...नार्वेकर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार...उद्या विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरणार

1 Jul 2024, 17:19 वाजता

पेपरफुटीविरोधात कायदा कधी आणणार?-रोहित पवार

 

Rohit Pawar on NEET Exam : राज्यात अनेक परीक्षा भरतीमध्ये पेपरफुटी होत असल्याने गैरप्रकार टाळण्यासाठी पेपरफुटीविरोधात कायदा आणा अशी मागणी रोहित पवारांनी केली...तसंच पेपरफुटीविरोधात कायदा कधी आणणार असा सवाल रोहित पवारांनी विचारला...यावर फडणवीसांनी उत्तर दिलेय...पेपरफुटीबाबत नरेटिव्ह पसवण्याचा प्रयत्न होतोय...पेपरफुटीविरोधात याच अधिवेशनात कायदा आणणार अशी माहिती फडणवीसांनी दिली..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

1 Jul 2024, 16:48 वाजता

'गट 'क'च्या रिक्तपदांची भरती MPSC तर्फे', देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

 

Devendra Fadnavis : राज्य सरकारच्या वतीनं गट कच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया MPSC तर्फे करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय...गट कच्या जागा टप्प्या टप्प्यानं एमपीएससीकडे वर्ग केल्या जाणार आहेत...नोकरभरती परीक्षांमधील गैरप्रकाराचा हा विषय गंभीर आहे...मात्र, अडीच वर्षात पारदर्क्षीपणे 1 लाख नोक-या दिल्याची माहिती फडणवीसांनी दिलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

1 Jul 2024, 16:34 वाजता

'घाटकोपर होर्डिंगप्रकरणी चौकशी करणार का?', आमदार राम कदमांचा सवाल

 

Ram Kadam on Uddhav Thackeray : घाटकोपर होर्डिंग प्रकरणात चौकशी करण्याची वेळ आल्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चौकशी सरकार करणार का? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी केला...तर प्रसिद्धी पाहिजे तर उद्धव ठाकरेंचं नाव घ्या ही महाराष्ट्रातील राजकारण्यांची गरज झाल्याची टीका ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी केलीये..

1 Jul 2024, 15:33 वाजता

विधान परिषदेवर पंकजा मुंडेंना उमेदवारी

 

Pankaja Munde : भाजपनं अखेर पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केलीये...पंकजा मुंडेंसह योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना विधापरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आलीये....

बातमीचा व्हिडीओ पाहा-

1 Jul 2024, 15:04 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: अग्निवीर योजनेचा सरकारला फायदा काय? राहुल गांधींचा सवाल 

अग्निवीर योजनेचा सरकारला फायदा काय? अग्निवीरांना सरकार जवान समजत नाही. अग्निवीराला शहिदाचा दर्जा का नाही? राहुल गांधी यांचा भाजपप्रणित सरकारवर घणाघात. लोकसभेत राहुल गांधी यांच्या वक्तव्यानं गदारोळ. दिशाभूल करू नका म्हणत अमित शाह यांनी प्रत्युत्तर देऊनही राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करणं सुरूच ठेवलं. 

1 Jul 2024, 13:33 वाजता

विधानपरिषदेसाठी भाजपकडून 5 उमेदवार?

 

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांपैकी 5 जागांवर भाजप आपले उमेदवार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यात भाजपकडून एका अपक्ष उमेदवाराला उमेदवारी देण्यात येईल अशी माहिती मिळतेय. महायुतीत घटत पक्ष म्हणून सन्मान दिला पाहिजे अशी भूमिका महादेव जानकर यांनी आधीच मांडलीय. विधान परिषद किंव्हा राज्यसभेत स्थान दिले पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं होतं.मात्र विधान परिषदेसाठी अजून महादेव जानकर यांच्याशी महायुतीनं संपर्क साधलेला नाही अशी माहिती मिळतेय. आज-उद्यामध्ये जाहीर होणा-या विधानपरिषदेच्या उमेदवारांच्या यादीत महादेव जानकरांचं नाव असणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

1 Jul 2024, 13:30 वाजता

विधानपरिषदेच्या जागांवरुन शिंदेंची डोकेदुखी वाढणार

 

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या जागांवरुन एकनाथ शिंदेंची डोकदुखी वाढण्याची शक्यताय...दोन जागांसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी झालीय...संजय मोरे, मनिषा कायंदे, भावना गवळी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने हे विधान परिषदेसाठी इच्छूक आहेत...लोकसभेत उमेदवारी नाकारलेल्यांची विधानपरिषदेत पुनर्वसन करण्याची आग्रही मागणी करण्यात आलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा -