PM Modi's Big Announcement : मुंबई दौऱ्यात पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

PM Modi's Big Announcement : मुंबई दौऱ्यात पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

13 Jul 2024, 21:42 वाजता

महाराष्ट्राला जागतिक आर्थिक केंद्र बनवणार.. पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

 

PM Modi's Big Announcement : लोकसभा निकालानंतर पंतप्रधान मोदींचा पहिलाच मुंबई दौरा.. महाराष्ट्राला जागतिक आर्थिक केंद्र बनवणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मुंबईत केली.. पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मोदी आज पहिल्यांदाच मुंबईत आले होते.. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते यावेळी 29 हजार 400 कोटींच्या नव्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली.. मुंबई शहर वेगवान होण्यास या प्रकल्पांमुळे फायदा होणार असल्याचं मोदींनी यावेळी म्हटलंय.. नरेंद्र मोदींनी मुंबईतल्या आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

13 Jul 2024, 18:01 वाजता

लोकसभा निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिलाच मुंबई दौरा

 

PM Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत.. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौ-यात महायुती विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाणार असल्याची शक्यता आहे. लोकसभा निकालानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. त्यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन होणाराय. राज्यपाल रमेश बैस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मंचावर आगमन झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर येताच उपस्थितांच्या मोदी.. मोदी.. घोषणा.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

13 Jul 2024, 14:13 वाजता

'मराठ्यांचा रोष सरकारला परवडणारा नाही', मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

 

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय...विरोधकांचं कारण सरकारने आम्हाला सांगू नये...विरोधकांचं कारण सांगून आरक्षण द्यायचं नाहीये का? असा सवाल जरांगेंनी सरकारला विचारलाय...अजूनही वेळ गेलेला नाही, आमच्या हक्काचं आरक्षण द्या...मराठ्यांचा रोष सरकारला परवडणारा नाही...आरक्षण दिलं नाही तर 288 आमदार 100 टक्के पाडणार असा इशारा जरांगेंनी दिलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

13 Jul 2024, 13:32 वाजता

'भाजपने काँग्रेससारख्या चुका करू नयेत', नितीन गडकरींचं पक्षाबाबत विधान

 

Nitin Gadkari On BJP : भाजपने काँग्रेससारख्या चुका करू नयेत, काँग्रेस करत होती तेच आपण करत राहिलो तर फायदा नाही असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी गोव्यामध्ये केलंय...भाजप एक वेगळ्या विचारसरणीचा पक्ष असून, त्यामुळेच तो वारंवार जनतेचा विश्वास जिंकत आहे...मात्र, ज्यामुळे लोकांनी काँग्रेसला सत्तेबाहेर काढलं, त्याच चुका आपण करत राहिलो तर काँग्रेसला सत्तेतून जाण्यात आणि आपण सत्तेत येण्याला काही अर्थ राहत नाही...काँग्रेसच्या चुकांमुळेच भाजपला निवडून दिलंय असं गडकरी म्हणालेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

13 Jul 2024, 13:15 वाजता

'काल आमदारांचा भाव 20 ते 25 कोटी', संजय राऊतांचा आरोप

 

Sanjay Raut : कालच्या विधान परिषद निवडणुकीत आमदारांचा भाव 20 ते 25 कोटी इतका होता...आमदारांना 2 एकर जमीन आणि पैशांचं वाटप केलं...ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती असा आरोप राऊतांनी केलाय...तर संजय राऊत हे फेक नरेटिव्हचे बादशहा आहे...अशी टीका शेलारांनी राऊतांवर केलीय...तर महाराष्ट्राची जनता राऊतांकडे करमणूक म्हणून बघते असा टोला केसरकरांनी लगावलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

13 Jul 2024, 12:38 वाजता

'विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार झाला', जयंत पाटील यांचं वक्तव्य

 

Jayant Patil : विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडाबाजार झाला...असं कधीही राजकारण पाहिलेलं नाही...आत्मचिंतन करून पराभवावर बोलेन असं  जयंत पाटील म्हणाले.... राष्ट्रवादी शरद पवार गटाचं एक मत फुटलं...काँग्रेसने दुस-या पसंतीची मतं सारखी दिली नाही....जयंत पाटलांची काँग्रेसवर नाराजी...

13 Jul 2024, 12:14 वाजता

 पंढरपुरात शालेय पोषण आहारात मृत बेडूक

 

Pandharpur : पंढरपुरात शालेय पोषण आहारात चक्क मेलेला बेडूक सापडलाय... पंढरपूरच्या कासेगावातील भुसेनगर इथं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.. अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात मृत बेडूक सापडल्यानं संतप्त पालकांनी प्रशासकीय अधिका-यांना जाब विचारलाय.. पोषण आहारात मृत साप, पक्षी, उंदीर आढलून आल्यानंतर आता मृत बेडूक आढळल्यानं हा आहार चिमुकल्यांच्या जीवावर उठलाय का असा सवाल पालकांनी केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

13 Jul 2024, 11:37 वाजता

राज्यात कांद्याचा मुद्दा पुन्हा पेटणार?

 

Onion : महाराष्ट्रात कांद्याचा मुद्दा पुन्हा पेटणार असल्याचं दिसतंय. कांदा उत्पादक शेतकरी संघटना आयातीवरून आक्रमक झालीय. आधीच नाफेडच्या खरेदीवरून शेतक-यांमध्ये नाराजी आहे. त्यात आता आयातीची भर पडलीय. अफगाणिस्तानवरून कांदा आयात केला जात असल्यानं भाव पडण्याची शेतक-यांना भीती आहे. अफगाणिस्तानवरून जवळपास 200 टन कांदा आयात केलाय. लोकसभेला कांद्याचा फटका बसलाय तसाच विधानसभेला बसणार नाही याची दखल घ्या असा इशारा शेतक-यांनी दिलाय. निर्यातीसाठी किमान निर्यात शुल्क ही जाचक अटही रद्द करण्याची मागणी करण्यात आली. आयात करून कांद्याचे दर पडले तर राज्यभर रास्ता रोको आणि रेल रोको करण्याचा इशारा देण्यात आलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

13 Jul 2024, 11:09 वाजता

'शरद पवारांनी जयंत पाटलांना पाडलं'​ सदाभाऊ खोतांचा आरोप

 

Sadabhau Khot on Jayant Patil : शरद पवारांनी शेकापच्या जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीका विधानपरिषदेवर निवडून आलेल्या सदाभाऊ खोतांनी केलीय. राज्यात शेकाप संपवण्याचं काम शरद पवारांनी केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. तर शरद पवारांनी जयंत पाटलांना निवडून आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न केल्याचा पलटवार संजय राऊतांनी केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

13 Jul 2024, 10:43 वाजता

'गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी ही निवडणूक',संजय राऊतांची टीका

 

Sanjay Raut : विधान परिषद निवडणूक निकालावरून राऊतांनी शिंदे आणि अजित पवार गटावर निशाणा साधलाय...शिंदे गट आणि अजित पवार गट हे विजयाचा कसला उन्माद करतायत...हे दोन्ही गट गद्दार आहेत...गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी ही निवडणूक होती...त्यात आश्चर्य काय असा निशाणा राऊतांनी साधलाय...