Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार राज्य सरकारवर हक्कभंग आणणार

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 29 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार राज्य सरकारवर हक्कभंग आणणार

29 Jun 2024, 20:48 वाजता

महाराष्ट्र भाजपाची दोन दिवसीय पुण्यात बैठक.बैठकीला गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती राहण्याची शक्यता.बैठकीसाठी भाजपच्या चार हजार पदाधिकाऱ्यांना निमंत्रण.13 जुलै रोजी प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक होणार तर 14 जुलैला विस्तारित कार्यसमितीची बैठक.

29 Jun 2024, 19:52 वाजता

अहमदनगर: माजी आमदार भीमराव धोंडे यांना एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी..

29 Jun 2024, 17:08 वाजता

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून वडेट्टीवार हक्कभंग आणणार

 

Vijay Wadettiwar : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या घोषणेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार राज्य सरकारवर हक्कभंग आणण्याच्या तयारीत आहेत... याबाबत त्यांनी विधानसभेमध्ये अध्यक्षांना निवेदन दिले... निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे लोकप्रिय घोषणा करणं हक्कभंग असल्याचं ते म्हणालेत.

 

29 Jun 2024, 15:09 वाजता

'ठाकरे सरकार पाडल्याचा शिंदे गटाच्या आमदारांना पश्चाताप', भास्कर जाधवांचा टोला

 

Bhaskar Jadhav vs Bharat Gogawale : मुख्यमंत्रिपदाच्या चेह-यावरून मविआला डिवचण्याचा विरोधकांनी प्रयत्न केलाय...सत्ताधा-यांकडून 'किस्सा कुर्सी का' अशी पोस्टरबाजी करण्यात आलीय...या पोस्टरबाजीवरून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला टोला लगावलाय...ठाकरे सरकार पाडल्याचा शिंदे गटाच्या आमदारांना पश्चाताप झालाय त्यामुळे किस्सा खुर्ची का असं शिंदे गटाचे आमदार म्हणतायत असं भास्कर जाधवांनी म्हटलंय...तर उद्धव ठाकरेंना आपली खुर्ची राखता आली नाही...एक खुर्ची 12 भानगडी सुरू असल्याचा टोला गोगावलेंनी लगावलाय...

29 Jun 2024, 14:07 वाजता

'अंधेरी आरटीओत भ्रष्टाचार', विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

 

Vijay Wadettiwar : अंधेरी आरटीओत 1 लाख 4 हजार लायसन्स दिली गेली...त्यापैकी 76 हजार लायसन्स ही अवैध वाहनांची टेस्ट घेवून दिलीयत असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय...एका दुचाकीवर चारचाकी,क्रेन,बसचे लायसन दिले गेले आहेत. क्रेनचे लायसन हे बाईकवर कसे काय होवू शकते. केवळ पैसे देवून लायसन दिली जातायत...125 कोटींचा भ्रष्टाचार एका आरटीओ कार्यालयात झालाय.असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केलाय...तर याप्रकरणी चौकशी करून कारवाईचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिलेयत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

29 Jun 2024, 13:33 वाजता

ज्येष्ठांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

 

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेची घोषणा केलीय. आर्थिक परिस्थिती कमकूवत असणा-या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून तिर्थयात्रेवर जाऊन देवदर्शनचा लाभ घेता येणारेय. आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधीत हा तिर्थयात्रा सुरू करण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली.

29 Jun 2024, 13:07 वाजता

राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक?

 

Sujata Saunik : राज्याच्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची वर्णी लागण्याची शक्यताय...राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर हे उद्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागेवर सौनिक यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सुत्रानं दिली. यासोबतच महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची आणि इक्बाल सिंह चहल यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय. तर प्रथमच महिला अधिकाऱ्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करून ,सरकार महिलांचा सन्मान करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय. 

29 Jun 2024, 12:06 वाजता

'शरद पवारांचे अनेक आमदार संपर्कात', आमदार अमोल मिटकरींचा दावा

 

Amol Mitkari : शरद पवार गटाचे अनेक आमदार संपर्कात आहेत, असा दावा अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी केलाय...आमदार देवगिरी बंगल्यावर येऊन गेल्याचा दावा केल्यानं खळबळ उडालीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

29 Jun 2024, 11:27 वाजता

बीडचे शिंदे गटाचे नेते कुंडलिक खांडेंना अटक, उपजिल्हाप्रमुख मारहाण प्रकरण भोवलं

 

Kundalik Khande Arrested : बीडच्या शिवसेना जिल्हाप्रमुखांना अखेर अटक करण्यात आलीय. 2 महिन्यांपूर्वी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी कुंडलिक खांडे यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं पाटोदा परिसरातून त्यांना अटक केली. गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात ऑडिओ व्हायरल प्रकरणी खांडे चर्चेत होते.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

29 Jun 2024, 11:12 वाजता

बारामतीतील गोळीबारातील रणजित निंबाळकरचा मृत्यू

 

Baramati Firing Update : बारामतीतल्या निंबूत गावात झालेल्या गोळीबारातील तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय.. रणजित निंबाळकर असं मृत तरुणाचं नाव आहे.. शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता.. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शाहजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केलीये.. तर गोळीबारानंतर फरार झालेल्या गौतम काकडेचा पोलीस शोध घेत आहेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा-