टेक ऑफला वैमानिकाचा नकार, उद्योगमंत्री सामंताना करावा लागला समृद्धी मार्गावरुन प्रवास

Uday Samant Pilot Denied: कारण नसताना नकार दिल्याने उद्योगमंत्र्यांना अखेर समृद्धी महामार्गाने मोटारीने संभाजीनगर गाठावे लागले. 

Pravin Dabholkar | Updated: Sep 29, 2024, 01:21 PM IST
टेक ऑफला वैमानिकाचा नकार, उद्योगमंत्री सामंताना करावा लागला समृद्धी मार्गावरुन प्रवास title=
उद्योगमंत्री सामंताना करावा लागला समृद्धी मार्गावरुन प्रवास

Uday Samant Pilot Denied: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या वेगळ्याचं कारण्यामुळे चर्चेत आले आहेत. सामंत हे शुक्रवारी नागपूर, अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी नेते त्यांनी स्थानिक नेत्यांशी भेटीगाठी केल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हा दौरा आटोपून सामंतर परतीच्या प्रवासाला निघाले. पण येथे त्यांना मनस्तापासा सामोरे जावे लागले. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 

नागपूर, अमरावती दौरा आटोपून उद्योगमंत्र्यांना छत्रपती संभाजीनगरला जायचे होते. यासाठी ते अमरावती येथील बेलोरा विमानतळावर पोहोचले. आपल्याला संभाजीनगरला जायचे असल्याचे त्यांनी वैमानिकाला सांगितले. पण वैमानिकाने टेक ऑफ करण्यास नकार दिला. यामुळे पुढे उदय सामंत यांची चांगलीच धावपळ झाली.

वैमानिकाने टेकऑफला का नकार दिला? याचे स्पष्ट कारण समोर आले नाही. पण कारण नसताना नकार दिल्याने उद्योगमंत्र्यांना अखेर समृद्धी महामार्गाने मोटारीने संभाजीनगर गाठावे लागले. 

पायलटविरोधात तक्रार 

उदय सामंत यांनी याप्रकरणी लोणी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. उद्योगमंत्री विमानात बसण्यासाठी जात असताना वैमानिक गगन अरोरा यांनी पूर्वसूचना न देता त्यांचे साहित्य विमानातून बाहेर काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

अखेर मोटारीने प्रवास 

आपल्याला छत्रपती संभाजीनगरला पोहोचणे आवश्यक असून टेक ऑफ करा, अशी विनंती मंत्री सामंत यांनी वैमानिकाला केली परंतु काही नियम सांगत वैमानिकाने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे वैमानिक गगन अरोरा यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले आहे शेवटी मोटारीने उद्योगमंत्री छत्रपती संभाजी नगरला रवाना झाले.