Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 01 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

1 Oct 2024, 09:47 वाजता

चुकीच्या सर्व्हेमुळे भावना गवळीचा बळी - भावना गवळी

 

Washim Bhavana Gawali : निवडणुकीतील चुकीच्या सर्व्हेमुळे बळी गेल्याची खदखद स्वत:भावना गवळींनी व्यक्त केलीये.. उमेदवारी सर्वे तुमच्या बाजूनं नाही असं कारण देत महायुतीकडून लोकसभेचं तिकीट कापण्यात आलं अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.. वाशिमच्या नंधाना येथील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या... यावेळी त्यांच्या सोबत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे देखील होते.. आता कुणाचा बळी जाऊ देऊ नका.. मतदारसंघाची खरी परिस्थिती वरिष्ठांना कळवा अशी विनंती यावेळी त्यांनी सदाभाऊ खोत यांना केली.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

1 Oct 2024, 09:36 वाजता

व्यावसायिक गॅस सिलेंडर दरात वाढ

 

Commercial Gas Cylinder Price Hike : ऐन सणासुदीत व्यावसायिक सिलेंडर गॅस महागलाय. व्यावसायिक सिलेंडर गॅसच्या दरात 48 रुपयांची वाढ झालीये. त्यामुळे व्यावसायिक सिलेंडर गॅसचे दर 1900 रुपयांवर पोहचलंय. हे नवे दर आजपासून लागू होतायेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

1 Oct 2024, 09:14 वाजता

मजुराच्या मुलाला सुप्रीम न्याय

 

Delhi Supreme Court : प्रवेश शुल्क भरण्यास उशीर झाल्यानं एका मजुराच्या मुलाला आयआयटी धनबाद इथं प्रवेश नाकारण्यता आला होता.. मात्र सुप्रीम कोर्टानं त्याची दखल घेऊन विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचे आदेश दिलेत.. गुणवत्ता आणि प्रतीभा वाया जाऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टानं विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचे आदेश दिलेत. केवळ 17 हजार 500 रुपये शुल्क भरण्यास विलंब झाल्यानं विद्यार्थ्याला प्रवेश नाकारण्यात आला होता.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

1 Oct 2024, 08:35 वाजता

भाजपकडून 150 जागांवर लढण्याची तयारी?

 

BJP : विधानसभा निवडणुकीत भाजपनं 150 जागांवर लढण्याची तयारी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. यासाठी 150 मतदारसंघातील उमेदवारांचा आढावा घेण्यासाठी निरीक्षक पाठवले जाणार आहेत... विशेष म्हणजे कार्यकर्ते आणि पदाधिका-यांकडून उमदेवारांची नावं मागवली जाणार आहेत.. प्रत्येक मतदारसंघात किती नेते निवडणूक लढवण्यासाठी सक्षम आहेत याचीही चाचपणी भाजपकडून केली जाणार आहे. संभाव्य उमेदवारांची नावं तसंच निवडणुकीत होणारी संभाव्य बंडखोरी याचाही आढावा भाजपकडून घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

1 Oct 2024, 07:51 वाजता

राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

 

Delhi Supreme Court : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.. अजित पवारांकडून घड्याळ चिन्ह काढून घ्या अशी याचिका शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलीये.. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्देशांचं अजित पवारांचा पक्ष पालन करत नसल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलंय. त्यामुळे त्यांच्या पक्षाकडून घड्याळ चिन्ह काढून घ्यावं अशी मागणी शरद पवारांनी केलीये. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नवं चिन्ह मिळणार का याकडे सा-याचं लक्ष लागलंय.. 

1 Oct 2024, 07:49 वाजता

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात 5 ऑक्टोबरला बदलणार

 

Central Railway Time Table : मुंबईत मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात ५ ऑक्टोबरपासून  बदल करण्यात येणार आहे. या नवीन वेळापत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून अप आणि डाऊन २० जलद लोकल फेऱ्या दादरवरून धावणारेत. सीएसएमटी, दादर स्थानकातील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी सीएसएमटीऐवजी २० अप आणि डाऊन लोकल दादरवरून धावतील असा निर्णय घेण्यात आलाय. या बदलामुळे सध्या लोकलला होणारा विलंब टाळता येईल असा विश्वास रेल्वे अधिका-यांनी व्यक्त केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -