22 Oct 2024, 11:31 वाजता
1 नोव्हेंबरला राज्यातील रेशन दुकानदार संपावर जाणार
Ration Shopkeepers Strike : राज्यातील संपूर्ण रेशन दुकानदार येत्या १ नोव्हेंबरपासून संपावर जाणारेत. वितरण दर वाढवून देण्याच्या मागणीसाठी रेशन दुकानदारांनी संप पुकारलाय. राज्य सरकारकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप स्वस्त धान्य दुकानदार संघटनेनं केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Oct 2024, 10:34 वाजता
26 ऑक्टोबरला युगेंद्र पवार अर्ज भरणार?
Yugendra Pawar : युगेंद्र पवार बारामतीतून लढणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळतेय. युगेंद्र पवार हे 26 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचीही माहिती मिळतेय. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अजित पवारच लढणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातंय. तर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पावरांचं नाव समोर येत आहे. त्यामुळे बारामतीतून अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जातेय.
22 Oct 2024, 10:09 वाजता
आमदार राजहंस सिंहांचं राजकीय पुनर्वसन?
Rajhans Singh : भाजप आमदार राजहंस सिंह शिवसेनेकडून दिंडोशीतून तर राहुल कनाल कलिनातून निवडणूक लढणार असल्याची शक्यता सूत्रानं दिलीय...शिवसेनेचे सोशल मीडिया राज्य प्रमुख राहुल कनाल कालिना विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार संजय पोतनीसांना विरोधात लढण्याची शक्यताये. राहुल कनाल श्रीकांत शिंदेंचे जवळचे मानले जातात.
22 Oct 2024, 09:54 वाजता
बारामतीच्या उमेदवाराची आज शरद पवार घोषणा करणार?
Baramati Assembly Elections 2024 : बारामतीच्या उमेदवाराची आज शरद पवार घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारी कुणाला मिळणार याकडं सर्व राज्याचं लक्ष लागून आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अजित पवारच लढणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातंय. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पावरांच्या नावाची चर्चा सुरूये. त्यांनी जनसंपर्कावर भर दिलाय. त्यामुळे बारामतीतून अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जातेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Oct 2024, 09:06 वाजता
शिवसेना UBTकडून 53 जणांची नावं निश्चित?
Shivsena UBT : शिवसेना UBT पक्षाकडून 53 उमेदवारांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची सूत्रांची माहिती...तिढा नसलेल्या जागांवर संबंधित उमेदवाराला तयारीचे आदेश- सूत्र... शिवसेना UBTपक्ष 96-98 जागा लढण्याची सूत्रांची माहिती... एकापेक्षा जास्त इच्छुक असणा-या मतदारसंघात उमेदवारांचा सर्वे
22 Oct 2024, 08:31 वाजता
विधानसभेसाठी आजपासून भरता येणार अर्ज
Maharashtra Vidhansabha Election 2024 : आजपासून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.. अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे.. २९ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. राज्यातील निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झालीय.. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून 6 दिवस मिळणार आहे.. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.. त्यामुळे नेते आणि अपक्षांची आजपासून अर्ज भरण्याची लगबग सुरू होणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Oct 2024, 08:05 वाजता
शेकापच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार
Shekap : शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांची आज यादी जाहीर होणारेय. शेकापचे नेते जयंत पाटील अलिबागमधील शेतकरी भवनातून उमेदवारांची घोषणा करणारेत. रायगड जिल्ह्यातील 4 आणि सांगोल्यासह साधारण 8 जागांवर शेकाप लढण्याची शक्यताय. उद्धव ठाकरेंनी सांगोल्यातून दिपक साळुंखेंना उमेदवारी दिलीये. त्यामुळे जयंत पाटील नाराज असल्याचं समजतंय. त्यामुळे जयंत पाटील महाविकास आघाडीतून बाहेर पडतात की आणखी काही वेगळा निर्णय घेतात याकडे सर्वांच लक्ष आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Oct 2024, 07:41 वाजता
राज पुरोहित घेणार आज देवेंद्र फडणवीसांची भेट
Raj Purohit will meet Devendra Fadnavis today : भाजपचे कुलाब्याचे आमदार राज पुरोहित आज फडणवीसांची भेट घेणार...आज सकाळी 11 वाजता भेटण्याची फडणवीसांकडून वेळ...सागर बंगल्यावर फडणवीस आणि पुरोहितांमध्ये होणार चर्चा... राज पुरोहित मविआच्या वाटेवर असल्याची चर्चा
22 Oct 2024, 07:38 वाजता
मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक
Mahavikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होणारेय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शरद पवार, उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बैठकीत सहभागी होणार नाहीत. त्यांच्या ऐवजी जागांच्या वाटाघाटीची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात आजच्या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरेंशी चर्चा करतील. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीनं थोरातांवर ही जबाबदारी सोपवलीये. दरम्यान आज महाविकास आघाडीची उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यताये.
बातमीचा व्हिडीओ पाहा-