Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 22 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

22 Oct 2024, 20:06 वाजता

शिवसेनेकडून 48 मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक

 

Maharashtra Assembly Election 2024 :  शिवसेना शिंदेंकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 48 मतदार संघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलीये..या 48 मतदार संघातील निरीक्षकांवर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे काम आणि समन्वयकांची जबाबदारी देण्यात आली आहे.
तसेच निरीक्षकांवर मतदार संघातील प्रत्येक बुथ आणि उमेदवारांना निवडून आणण्याची विशेष जबाबदारी देण्यात येणार आहे.

22 Oct 2024, 19:36 वाजता

महायुतीत शिवसेनेचं घोडं 25 जागांवर अडलं?

 

Maharashtra Assembly Election 2024 :  महायुतीत शिवसेनेचं घोडं 25 जागांवर अडल्याची सूत्रांची माहिती... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात चर्चा झाली.. भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 60 नावांची यादी बैठकीत मांडल्याची सूत्रांची माहिती.. विद्यमान आमदारांना तिकीट देण्यावर सकारात्मक चर्चा.. उर्वरित 25 जागांचा प्रस्ताव शिवसेनेकडून मांडण्यात आल्याचं समजतंय.. स्थानिक पातळीवर पक्षीय बलाबल, जातीय राजकारण या जागांवर तिन्ही पक्षातील प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळतेय.

22 Oct 2024, 17:41 वाजता

राष्ट्रवादी SP पक्षाकडून जितेंद्र आव्हाडांना  AB फॉर्म

 

Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तिढा नसलेल्या जागांवर AB फॉर्म द्यायला सुरुवात.. जितेंद्र आव्हाडांना राष्ट्रवादी(SP) एबी फॉर्म वाटप.. कळवा-मुंब्रा मतदारसंघातून आव्हाडांना उमेदवारी.. आव्हाड 24 तारखेला अर्ज दाखल करणार.. शरद पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

22 Oct 2024, 16:58 वाजता

शिवसेना UBT पक्षाकडून राजन साळवी, वैभव नाईकांना AB फॉर्म

 

Maharashtra Assembly Election 2024 : आजपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एबी फॉर्म देण्यासाठी सुरुवात झाली असून ज्या जागावर तिढा नाही त्या मतदार संघातील उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.. राजापूर लांजा मतदारसंघांचे विद्यमान आमदार राजन साळवी यांनी आज मातोश्रीमधून स्वीकारला एबी फॉर्म.. राजन साळवी 24 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर कुडाळचे आमदार वैभव नाईक मतदारसंघात असल्याने त्यांच्या प्रतिनिधीने घेतला एबी फॉर्म.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

22 Oct 2024, 14:14 वाजता

संदीप नाईकांच्या हाती तुतारी

 

Sandip Naik : संदीप नाईकांनी हाती तुतारी घेतलीये...25 नगरसेवकांसह त्यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश केलाय...जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालाय...नवी मुंबईतील मेळाव्यात त्यांनी पक्ष प्रवेश केलाय...
 

22 Oct 2024, 13:43 वाजता

लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा निवडणुकीची ऑफर

 

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा निवडणुकीची ऑफर...उत्तर भारतीय विकास सेना या पक्षानं दिली ऑफर...लॉरेन्स बिश्नोईत भगतसिंग दिसत असल्याचा उल्लेख... बाबा सिद्दीकींच्या हत्येत लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग...सुनील शुक्लांची लॉरेन्स बिश्नोईला ऑफर

22 Oct 2024, 13:03 वाजता

निलेश राणे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार

 

Nilesh Rane : माजी खासदार नीलेश राणे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत... मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थित निलेश राणे यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहितीय.. मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातील सहकारी ही पक्ष प्रवेशासाठी येणार असल्याचं नीलेश राणे यांनी यावेळी म्हटलंय..

22 Oct 2024, 12:37 वाजता

संदीप नाईक तुतारी हाती घेणार?

 

Sandip Naik : नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलच तापलंय. संदीप नाईक बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. वाशीमध्ये त्यांनी बैठक घेऊन निर्णय जाहीर केलाय. ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याची शक्यता आहे.  नवी मुंबई शहरावर अन्याय होत असेल तर मला निर्णय घ्यावा लागेल....नवी मुंबईच्या विकासासाठी मी माझा वैयक्तिक निर्णय घेणार आहे....कार्यकर्त्यांनी आयोजित केलेला निर्धार मेळावा आहे. कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल.

22 Oct 2024, 12:17 वाजता

...डोंगर, दऱ्या बघण्यासाठी कायमचं घरी पाठवणार- रोहित पवार

 

Rohit Pawar : पुणे कार कॅशप्रकरणी रोहित पवारांचं ट्विट केलंय. रोहित पवारांनी आपल्या ट्विटर अकांऊटवर पैशांचा व्हिडिओ पोस्ट करून शहाजी बापूंवर निशाणा साधलाय. महाराष्ट्राशी गद्दारी करणा-या खोकेबाजांना इथली जनता ओके करून डोंगर, द-या बघण्यासाठी कायमचं घरी पाठवणार, अशी टीका रोहित पवारांनी केलीय. तसंच एक गाडी सापडली मात्र अजून चार गाड्या कुठे आहेत?, असा सवालही केलाय.

22 Oct 2024, 11:33 वाजता

झाडी-डोंगरातून 10 कोटीची रक्कम सुखरूप सांगोल्यात पोहोचली- संजय राऊत

 

Sanjay Raut on Shahajibapu Patil : झाडी-डोंगरातून 10 कोटीची रक्कम सुखरूप सांगोल्यात पोहोचली, असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. 15 कोटींची रक्कम सांगल्याकडं जात होती. पण कार्यकर्त्यांनी ती रक्कम पकडली. मात्र पोलिसांनी केवळ 5 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली. पैसे सोडवण्यासाठी पोलिसांना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून फोन आला होता. फोन आल्यानंतर पैसे सोडून देण्यात आले, असा गंभीर आरोप राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता केलाय.