18 Sep 2024, 18:34 वाजता
जय मालोकार यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट
Akola Jai Malokar Case : आमदार अमोल मिटकरींच्या गाडी तोडफोड प्रकरणानंतर मृत्यू झालेले मनसे पदाधिकारी जय मालोकार यांचा मृत्यूला वेगळं वळण लागलं आहे. जय मालोकार यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला आहे. सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं, मात्र आता याला वेगळं वळण मिळाल्यानं खळबळ उडाली आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
18 Sep 2024, 16:20 वाजता
राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधानाप्रकरणी अनिल बोंडेंविरोधात गुन्हा दाखल
FIR Against Anil Bonde : अमरावतीतील भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात बोंडेंविरोधात गुन्हा दाखल झालाय. राहुल गांधी यांच्या जिभेला चटके द्यावेत असं वादग्रस्त विधान अनिल बोंडे यांनी केलं होतं. त्यामुळे आक्रमक झालेल्या काँग्रेसनं बोंडेंवर कारवाईची मागणी करत, अमरावती पोलीस आयुक्तालयात थेट आयुक्तांच्या दालनात आंदोलन केलं होतं. त्यानंतर बोंडेंवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
18 Sep 2024, 15:55 वाजता
केंद्रीय कॅबिनेटकडून एक देश,एक निवडणूक विधेयकाला मान्यता- वैष्णव
One Nation One Election Report : केंद्रीय कॅबिनेटने एक देश एक निवडणुकीचा प्रस्ताव आज स्वीकारल्याचं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं... निवडणुकीसाठी होणारा खर्च, पोलीस बळाचा वेळ हे सर्व टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणालेत... दोन टप्प्यात हे लागू होणार असल्याचंही ते म्हणालेत... एका टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा तर दुसऱ्या टप्प्यात पहिल्या निवडणुकीनंतर 100 दिवसात ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद यासह इतर निवडणुका होतील असंही वैष्णव म्हणालेत... दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
18 Sep 2024, 14:00 वाजता
'शरद पवार सुप्रिया सुळेंनाच CM करणार', चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा
Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar : शरद पवारांनी सुप्रिया सुळेंनाच मुख्यमंत्री करण्याची योजना आखली असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. इतकंच नाही तर विश्वसनीय सुत्रांकडून मला ही माहिती मिळाली असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं...
18 Sep 2024, 13:39 वाजता
नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळले
Nashik : नाशिक शहरात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीये... आई वडिलांसह मुलीचा मृतदेह आढळून आल्यानं नाशिक शहर हादरलंय... मूळचे गौळणे गावचे मात्र पाथर्डी फाटा परिसरात हे सहाणे कुटुंब राहत होतं.. मात्र मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे..
18 Sep 2024, 13:12 वाजता
नाशिकमधील द्राक्ष बागायतदार अडचणीत
Nashik Grape Growers : व्यापा-यांच्या फसवणुकीमुळे नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायतदार शेतक-यांना तब्बल 500 कोटी रुपयांचं नुकसान झालंय.... गेल्या 2 दशकांपासून हा प्रश्न अद्याप सुटलेला नाहीये.....
18 Sep 2024, 12:38 वाजता
नागपुरात महायुतीत बंडखोरी?
Abbha Pandey : पूर्व नागपुरात भाजपची डोकेदुखी वाढलीये.. भाजपसाठी सुरक्षित मानल्या जाणा-या पूर्व नागपुर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आभा पांडे यांनी दावा केलाय.. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारालाही त्यांनी सुरुवात केलीये.. आता अजित पवारांनी सांगीतलं तरी माघार घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय.. त्यामुळे या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता आहे
बातमीचा व्हिडीओ पाहा-
18 Sep 2024, 12:09 वाजता
'सुप्रिया, रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम', वर्षा गायकवाडांचं वक्तव्य
Varsha Gaikwad : महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली तर आनंद होईल असं मोठं विधान काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केलंय.. मविआत मुख्यमंत्रीपदसाठी अनेक महिला सक्षम आहेत.. सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांच्यासह काँग्रेसमध्येही काही महिला मुख्यमंत्री पदासाठी सक्षम असल्याचा दावाही त्यांनी केलाय..
18 Sep 2024, 11:40 वाजता
उद्या आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता
MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणी आजही सुनावणी होणार नाही...आज देखील प्रकरण नंबर १ ऐकलं जाणार असल्याने यावर सुनावणी होणार नाही..उद्या या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता
18 Sep 2024, 11:09 वाजता
'भाजपचा मुख्यमंत्री होणार असेल तर फडणवीसच', गिरीश महाजनांचं वक्तव्य
Girish Mahajan on Devendra Fadnavis : भाजपचा मुख्यमंत्री होणार असेल तर देवेंद्र फडणवीसच असलील असं गिरीश महाजन म्हणालेत.. आमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी एकच चेहरा आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस.. मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असं महाजन म्हणालेत.. मात्र आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्रजीच आहेत असं ते म्हणालेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा-