Prajakta Tanpure : प्राजक्त तनपुरेंची PMLA कोर्टात हजेरी

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 20 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Prajakta Tanpure : प्राजक्त तनपुरेंची PMLA कोर्टात हजेरी

20 Sep 2024, 18:51 वाजता

प्राजक्त तनपुरेंविरोधात ईडीकडून चार्जशीट दाखल, 15 दिवसांनंतर पुढील सुनावणी

 

Prajakta Tanpure : शरद पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरेंची PMLA कोर्टात रुटीन सुनावणी झाली...राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री प्रकरणी ईडीच्या विशेष कोर्टात याप्रकरणी रुटीन सुनावणी सुरूये...याप्रकरणी ईडीने चार्जशीट दाखल केलं असून PMLA कोर्टात सुनावणी सुरू झालीये...यावेळी तनपुरे उपस्थित होते...आता पुढील सुनावणी 15 दिवसांनंतर होणारे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

20 Sep 2024, 17:35 वाजता

रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोस्टल रोड वाहतुकीसाठी बंद 

 

Mumbai Coastal Road : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे.. उद्यापासून कोस्टल रोड सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला असणार आहे.  तर रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत रोड वाहतुकीसाठी बंद असणार आहे. गणेशोत्सवात रोड 24 तास खुला करण्यात आला होता. त्यानंतर आता सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत रोड वाहतुकीसाठी खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

20 Sep 2024, 16:16 वाजता

जरांगेंची प्रकृती खालावली, डॉक्टरांकडून सतत तपासणी, मात्र जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

 

Manoj Jarange Health Issue : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे.. प्रकृती खालावत चालली असतानाही जरांगेंकडून उपचार घेण्यास नकार देण्यात येत आहे.आज जरांगें पाटलांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.. डॉक्टरांकडून सतत तपासणी सुरू आहे.. मात्र, जरागेंनी उपचार घेण्यास नकार दिलाय.. जरांगेना चालता येत नसल्याचं बघून उपस्थित महिलांना अश्रू अनावर झाले होते.

 

 

20 Sep 2024, 14:17 वाजता

विधानसभेसाठी अजित पवारांचं मुस्लीम कार्ड?

 

Ajit Pawar : अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला सर्वाधिक जागा देणार असल्याची माहिती सुत्रांकडून झी २४ तासला मिळालीय. ⁠जागा वाटपात मिळणाऱ्या एकूण जागांपैकी १० टक्के जागांवर मुस्लीम उमेदवार देणार असून अल्पसंख्याक उमेदवार देऊन मताधिक्य बळकट करण्याची तयारी अजित पवार पक्षांची सुरु आहे. मुंबईत चार आणि MMR रिजनमध्ये  १ अश्या पाच जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून  मुस्लिम उमेदवार दिसणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. मुंबईत जास्तीत जास्त मुस्लीम उमेदवार देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात येणारेय. साधारणत: बीड शहर, मालेगाव, धुळे आणि जळगाव अशा विधानसभा मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून  मुस्लिम उमेदवार असणारेय. 

20 Sep 2024, 13:48 वाजता

तिसरी आघाडी सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी - संजय राऊत

 

Sanjay Raut On Third Front : तिस-या आघाडीवरुनही खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय. तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते...तिसरी आघाडी तयार करून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवता येईल  यासाठी काम करतात असं राऊत म्हणालेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Sep 2024, 13:30 वाजता

मनसे कार्यकर्त्यांचं अमित ठाकरेंना पत्र

 

Nashik : अमित ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक नाशिक पूर्व मतदारसंघातून लढवावी, अशी मागणी मनसे कार्यकर्त्यानं केलीय. नाशिकचे मनसैनिक प्रसाद सानप यांनी थेट अमित ठाकरेंना पत्र लिहिलंय. त्यांनी या पत्रातून अमित ठाकरेंना नाशिक पूर्वमधून निवडणूक लढण्याची साद घातलीय. अमित ठाकरेंना केवळ उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि विजयीपत्र घेण्यासाठी नाशिकला यावं लागेल, असा विश्वास या कार्यकर्त्यांनं व्यक्त केलाय. 

20 Sep 2024, 12:31 वाजता

पुरंदर मतदारसंघात मविआत वादाची ठिणगी?

 

Purandar constituency : पुरंदर मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये पुन्हा वादाची ठिकणी पडण्याची शक्यता आहे.. पुरंदरवरुन काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.. पुरंदरमध्ये सध्या काँग्रेसचे संजय जगताप हे विद्यमान आमदार आहेत. मात्र या मतदारसंघावर शरद पवारांच्या राष्ट्रावादीनं दावा सांगीतला असून माजी जिल्हाधिकारी संभाजी झेंडे यांनी या मतदारसंघातून लढण्याची तयारी दाखवलीये.. उमेदवारीसाठी त्यांनी सुप्रिया सुळे आणि पवारांचीही  भेट घेतलीये.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Sep 2024, 11:33 वाजता

मुंबईतील 6 जागांवर मविआत रस्सीखेच?

 

MVA : मुंबईतील 6 जागांवर मविआमध्ये रस्सीखेच सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. कुर्ला वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिम या तीन विधानसभा मतदार संघांवर काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीनं दावा केलाय.. तर भायखळा, जोगेश्वरी पूर्व आणि माहीम या तीन मतदार संघांवर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे.. त्यामुळे या 6 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Sep 2024, 11:02 वाजता

खासदार संजय राऊतांचा काँग्रेसवर हल्लाबोल

 

Sanjay Raut : संजय राऊतांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. काँग्रेसच्या जागा वाढण्यात ठाकरे पक्षाचा मोठा वाटा असल्याचं राऊतांनी म्हटलंय. इतकंच नाही तर  आत्मविश्वास वाढला म्हणून काँग्रेस एकटं लढणार का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय. 

20 Sep 2024, 10:29 वाजता

खासदार नरेश म्हस्केंची राहुल गांधींवर टीका

 

Naresh Mhaske : शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्क यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींना पत्र लिहलंय. या पत्रात  त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केलीय. आरक्षण रद्द करण्याची भाषा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? कोण तुम्ही? तुमची बौध्दिक उंची काय? कर्तृत्त्व काय? असे सवाल क खासदार नरेश म्हस्केंनी काँग्रेस खासदार राहुल गांधींकडे उपस्थित केलेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा -