Shardiya Navratri 2024 : हिंदू धर्मात सण उत्सवाला अतिशय महत्त्व आहे. गणशोत्सवानंतर वेध लागतात ते नवरात्रीचे. हिंदू धर्मात देवीच्या नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीच्या सणाला सुरुवात (Navratri 2024 Start Date) होते. देशभरात मोठ्या उत्साहात नऊ दिवस देवीच्या विविध रुपांची पूजा होते. महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना करण्यात येते. सर्वपित्री अमावस्येच्या (sarvapitri amavasya 2024) झाल्यानंतर शारदीय नवरात्रीला सुरुवात होते.
यंदा अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील प्रतिपदा तिथी 3 ऑक्टोबरला दुपारी 12.18 मिनिटांपासून शुक्रवारी 4 ऑक्टोबरला पहाटे 2.58 मिनिटांपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 3 ऑक्टोबरला घटस्थापना करायची आहे. नवरात्रीचा हा उत्साह 12 ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजेच दसरा (Dasara 2024 Date) हा सण साजरा करण्यात येणार आहे.
हिंदू पंचागानुसार घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजून 15 मिनिटांपर्यंत ते 8 वाजून 22 मिनिटांपर्यंत असणार आहे.
3 ऑक्टोबर 2024 - घटस्थापना , शैलीपुत्र पूजा
4 ऑक्टोबर 2024 - ब्रम्हचारिणी पूजा
5 ऑक्टोबर 2024 - चंद्रघंटा पूजा
6 ऑक्टोबर 2024 - कुष्मांडा पूजा
7 ऑक्टोबर 2024 - स्कंदामाता पूजा
8 ऑक्टोबर 2024 - कात्यायनी पूजा
9 ऑक्टोबर 2024 - कालरात्री पूजा
10 ऑक्टोबर 2024 - सिद्धिदात्री पूजा
11 ऑक्टोबर 2024 - महागौरी पूजा
12 ऑक्टोबर 2024 -विजयादशमी पूजा
1. सर्वप्रथम मातीचे भांडे घ्या. त्यात तीन थरांमध्ये माती घाला आणि 9 प्रकारचे धान्य मातीत टाका आणि त्यात थोडं पाणी घाला.
2. आता एक कलश घ्या. त्यावर स्वस्तिक बनवा. मग मौली किंवा कलावा बांधून ठेवा. यानंतर कलश गंगाजल आणि स्वच्छ पाण्याने भरा.
3. त्यात एक पूर्ण सुपारी, फुलं आणि दुर्वा घाला. तसंच अत्तर, पंचरत्न आणि नाणे देखील टाका.
4. कलशाच्या आत आंब्याची पानं लावा. कलशच्या झाकणावर तांदूळ ठेवा.
5. देवीचं स्मरण करताना कलशाचं झाकण लावा. आता एक नारळ घ्या आणि त्यावर कलवा बांधा. कलशवर स्वस्तिक चिन्ह बनवा.
6. कुंकवाने नारळावर टिळक लावा आणि नारळ कलशावर ठेवा.
7. कलशावर नारळासोबत तुम्ही काही फुलेही ठेवू शकता.
8. दुर्गा देवीच्या स्वागतासाठी हा कलश मंदिरात स्थापन करा.
9. दिवा लावा आणि त्याची पूजा करा.
10. पहिल्या दिवशी विडाच्या पानाची माळ अर्पण करतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)