27 Sep 2024, 19:31 वाजता
राखीव पाच जागांसह खुल्या प्रवर्गातील 5 अशा सर्व 10 जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी
Mumbai Senate Election Result : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या 10 जागांवर युवासेनेचा झेंडा. यापैकी राखीव प्रवर्गातील पाचही जागा युवासेनेनं जिंकल्या आहेत. पाचही उमेदवारांनी सुमारे 4 हजार मतांनी विजय मिळवत, ABVPचा दारुण पराभव केलाय.
महिला गटातून युवासेनेच्या स्नेहा गवळी यांनी ABVPच्या रेणुका ठाकूर यांना धूळ चारली. SC गटातून युवासेनेच्या शीतल देवरुखकर शेठ यांनी राजेंद्र सायगावकर यांना मात दिली. OBC प्रवर्गातून युवासेनेचे मयुर पांचाळ विजयी झाले, त्यांनी राकेश भुजबळ यांचा पराभव केला. STतून धनराज कोहचडे यांनी ABVPच्या निशा सावरा यांना हरवलं. निशा सावरा या माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या कन्या आहेत. NTमधून शशिकांत झोरे यांनी अजिंक्य जाधव यांना आस्मान दाखवलं. तसंच खुल्या प्रवर्गातील 5 अशा सर्व 10 पैकी 10 जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी... ABVPचा दारुण पराभव.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Sep 2024, 17:18 वाजता
फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली
Mantralay office Vandalism : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली असून तिच्यावर यापूर्वीही गुन्हा दाखल असून ती मानसिक रुग्ण असल्याचं पोलिसांनी सांगितलंय...त्याचबरोबर मंत्रालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Sep 2024, 17:10 वाजता
मुंबई विद्यापीठ सिनेटच्या पाचही जागा युवासेनेने जिंकल्या- वरुण सरदेसाई
Varun Sardesai On Senate Election Result : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे.. युवासेनेचे उमेदवार मयुर पांचाळ विजयी झाले आहेत.. युवासेनेचे मयुर पांचाळ ओबीसी प्रवर्गातून विजयी झाले आहेत.. राखीव प्रवर्गातल्या पाचही जागा युवासेनेनं जिंकल्याचा दावा, ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई यांनी केलाय.. आमच्या उमेदवारांना प्रत्येकी 5 हजार मतं मिळाली असल्याचं, सरदेसाईंनी सांगितलंय. तर अभाविपच्या उमेदवारांना आठशे ते एक हजार मतं मिळाल्याचं ते म्हणाले.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Sep 2024, 15:12 वाजता
लाडकी बहीण किती रागात यावरुन दिसतं - वडेट्टीवार
Vijay Wadettiwar : लाडकी बहीण किती रागात आहे हे यावरून दिसत असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणालेत...त्याचबरोबर आज पाटी काढलीये उद्या हीच पाटी लाडकी बहीण डोक्यात घालेलं अशी टीकाही वडेट्टीवारांनी केलीये...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या तोडफोडीप्रकरणी वडेट्टीवारांनी ही प्रतिक्रिया दिलीये...
27 Sep 2024, 15:09 वाजता
घटनेमागचं कारण समजून घेतलं पाहिजे - फडणवीस
Devedra Fadanvis : एखादी बहीण चिडली असेल किंवा कुणी पाठवलं असेल तर ते समजून घेऊ...त्याचबरोबर घटनेची चौकशी करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत...तर विरोधकांवरही त्यांनी निशाणा साधलाय..
27 Sep 2024, 13:43 वाजता
मंत्रालयात फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड
Mantralay : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेनं तोडफोड केल्याची घटना समोर आलीय. अज्ञात महिलेनं ही तडोफोड केलीय. तोडफोडीनंतर या महिलेनं घोषणाबाजीही केली. महिलेनं मंत्रालयाचा पास न काढता सचिव गेटनं मंत्रालयात प्रवेश केला होता. या घटनेची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतलीय. दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून खुलासा आलाय. ही घटना काल संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास घडलीय आणि यावेळी महिला पोलीस उपस्थित नसल्यानं महिलेला पकडू शकलो नाही, असा खुलासा उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलाय. याप्रकरणी कालच तक्रार दाखल करण्यात आलीय. सध्या महिलेची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे.
बातमी पाहा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड
27 Sep 2024, 13:22 वाजता
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 4 नराधमांवर गुन्हा दाखल
Pune Crime : पुण्याच्या एका महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय... गुड टच, बॅड टच याबाबत जनजागृती दरम्यान, पोलिसांच्या समुपदेशन यामुळे हा प्रकार उघडकीस आलाय... याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय... पोलिसांनी 2 आरोपींना अटक केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Sep 2024, 13:19 वाजता
मनोज जरांगेंचा बोलवता धनी वेगळा - नरेंद्र पाटील
Narendra Patil On Manoj Jarange : भाजप सत्तेवर असतानाच मराठा समाजाला न्याय मिळालाय,तरीही जरांगे फडणवीसांवर टीका करत असतील तर त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे,अशी टीका अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Sep 2024, 13:16 वाजता
अक्षय शिंदेच्या वडिलांचं शाह, फडणवीसांना पत्र
Akshay Shinde : अक्षय शिंदेच्या वडिलांची संरक्षणाची मागणी केलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवून अक्षयच्या वडिलांनी ही मागणी केलीय. संपूर्ण कुटुंबीय आणि वकिलाला धमक्या मिळत आहेत. त्यामुळे पोलीस संरक्षण द्यावं, अशी मागणी अक्षय शिंदेंच्या वडिलांनी केलीय. अक्षय शिंदेचा खून राजकीय फायद्यासाठी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी या पत्रातून केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Sep 2024, 13:01 वाजता
फडणवीसांनी औरंगजेबावर चित्रपट काढावा - संजय राऊत
Sanjay Raut On Devendra Fadanvis : धर्मवीर चित्रपटावरून खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचा समाचार घेतलाय.फडणवीसांना धर्मवीर काय माहीत आहेत? धर्मवीरांवर चित्रपट काढण्याऐवजी त्यांनी राज्य लुटण्यासाठी येणा-या नव्या औरंगजेबवर चित्रपट काढावा, असा खोचक टोला राऊतांनी फडणवीसांना लगावलाय. धर्मवीर तीनची पटकथा लिहाणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं. यावर राऊतांनी टीका केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -