Maharashtra Breaking News LIVE : सिनेटच्या पाचही जागा युवासेनेने जिंकल्या- वरुण सरदेसाई

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 26 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : सिनेटच्या पाचही जागा युवासेनेने जिंकल्या- वरुण सरदेसाई

27 Sep 2024, 12:07 वाजता

हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार नाही - सुधीर मुनगंटीवार

 

Sudhir Mungantiwar On Harshwardhan Patil : हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार नाहीत, त्यांच्याशी बोलणं झालंय, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केलाय. पाटील भाजपचे आहेत आणि भाजपमध्येच राहणार असा दावाही त्यांनी केलाय. त्यांच्याशी पुन्हा फोनवर बोलणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Sep 2024, 12:03 वाजता

अमित शाहांचे महाराष्ट्रावर हल्ले - संजय राऊत

 

Sanjay Raut : अमित शाहांच्या महाराष्ट्र दौ-यावर खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केला. शाहांनी तंबू ठोकला तरीही राज्यात भाजप विजयी होणार नाही, अशा शब्दांत राऊतांनी शाहांवर निशाणा साधलाय. ते महाराष्ट्रावर सतत हल्ले करतायेत, असा आरोपही राऊतांनी केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Sep 2024, 11:06 वाजता

दादांच्या राष्ट्रवादीची मतं कमी मिळालीत - फडणवीस

 

Devendra Fadanvis : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मते लोकसभेत भाजपला कमी प्रमाणात मिळाली. त्यामुळे भाजपची लोकसभेतील कामगिरी चांगली झाली नसल्याचं मोठं विधान फडणवीस यांनी केलंय.. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी अजित पवारांच्या पक्षाची मतं भाजला मिळत नसल्याचं सांगितलं..  मात्र भाजपची मतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळतात.. पण आम्हाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं मिळत नसल्याचंही फडणवीस म्हणालेत.. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मतं मात्र भापजपकडे वळत असल्याचंही फडणवीस म्हणालेत.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Sep 2024, 11:04 वाजता

मी आधुनिक अभिमन्यू - देवेंद्र फडणवीस

 

Devendra Fadanvis : एकतर तू राहशील किंवा मी राहिल असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. त्याला आता फडणवीसांनी  उत्तर दिलंय.. कुणी कुणालाही संपवू शकत नाही. कुणी कुठेही जाणार नाही. मी अधुनिक अभिनन्यू आहे. मला चक्रव्युहात शिरणंही ठाऊक आहे आणि तो भेदून बाहेर कसं यायचं हे देखील माहीत आहे. तो चक्रव्यूह भेदून दाखवेन असं फडणवीस म्हणालेत.. ठाकरेंनी मला राजकीयदृष्ट्या संपवून दाखवावं असं आवाहनही त्यांनी दिलंय... एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसानी ठाकरेंना उत्तर दिलंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Sep 2024, 10:13 वाजता

साईबाबांना 18 लाखांचा सोन्याचा मुकूट

 

Shirdi Sai Baba : शिर्डीच्या साईबाबांना 18 लाखांचा सोन्याचा मुकूट अर्पण करण्यात आलाय. तेलंगाणाच्या साईभक्त सी. भाग्यलक्ष्मी या भाविक महिलेनं हा मुकूट अर्पण केलाय. या मुकुटाचं वजन 258 ग्रॅम आहे. यावर सुंदर नक्षीकाम कोरण्यात आलंय. या मुकुटाची किंमत 18 लाख रुपये आहे.साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकरांकडं हा मुकूट सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर संस्थानच्या वतीने देणगीदार साईभक्त महिलेचा सत्कार करण्यात आला. 

27 Sep 2024, 10:12 वाजता

साताऱ्यातील माण, वाई आणि कराड दक्षिणवर काँग्रेसचा दावा 

 

Satara Congress : सातारा जिल्ह्यातील माण, वाई आणि कराड दक्षिणवर काँग्रेसनं दावा ठोकलाय. राष्ट्रीय काँग्रेसच्या केंद्रीय निरीक्षकांनी सातारा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांनी माण, वाई आणि कराड दक्षिण मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याची जोरदार मागणी केली. यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा वाढणारेय. जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढलेली असल्याच्या दावा पदाधिकाऱ्यांनी केलाय. पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिण मतदारसंघाचे विद्यमान आमदार असल्याने कराड दक्षिण मतदारसंघ हा काँग्रेसकडेच राहील. मात्र माण आणि वाई मतदारसंघही मिळावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

27 Sep 2024, 09:15 वाजता

राज्यात पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज

 

Rain Update : उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं दिलाय.. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला होता.. मात्र उद्यापासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मात्र उत्तर कोकण, मुंबई, ठाणे, पालघर तसंच उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहील असा इशारा हवामान खात्यानं दिलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Sep 2024, 09:06 वाजता

अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

 

Sambhajinagar Abdul Satttar : संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तारांच्या मेडिकल कॉलेजविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलीय.  सिल्लोडमधील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी 300 खाटांचं हॉस्पिटल असल्याचं खोटं शपथपत्र सादर केल्याचा आरोप सत्तारांवर करण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी औरंगाबाद खंडपीठात त्याविरोधात याचिका दाखल केलीय.  ऋषिकेश मेडिकल कॉलेजसह त्यांच्या इतर कॉलेजची नोंदणी रद्द करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आलीय.कोर्टानं सत्तारांची संस्था, राज्य सरकार, मेडिकल कौन्सिल, वैद्यकीय संचालक आणि आयुष मंत्रालयला नोटिसा बजावल्यात. ही याचिका जनहित याचिका म्हणून खंडपीठानं स्वीकारलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Sep 2024, 08:32 वाजता

डॉ. अजित रानडेंना हायकोर्टाचा दिलासा कायम

 

Dr. Ajit Ranade : अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर अजित रानडेंना हायकोर्टानं दिलासा कायम ठेवलाय. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी केलेली नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाला दिलेली तात्पुरती स्थगिती हायकोर्टानं 7 ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवली. तसेच रानडेंना कुलगुरूपदावरून हटवण्याच्या निर्णयानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार प्राध्यापक दीपक शाहांकडं सोपवण्यात आलाय. शाहांना संस्थेच्या प्रशासकीय कामकाजाबाबतचे निर्णय घेण्याची मुभा राहील, असेही निर्देश कोर्टानं दिलेत. या प्रकरणी पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Sep 2024, 08:29 वाजता

दक्षिण सोलापुरात भाजपमध्ये अंतर्गत वाद

 

South Solapur BJP : दक्षिण सोलापूरचे भाजपाचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य आणि आमदार सुभाष देशमुख यांच्यातील वाद चिघळला. वैद्य यांना पाठिंबा दिलेल्या 7 माजी नगरसेवक आणि माजी उपमहापौरावर कारवाई करण्याची मागणी आमदार सुभाष देशमुखांच्या समर्थकांनी केलीय. देशमुखांच्या समर्थकांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली. वैद्य हे दक्षिण सोलापूरमधून इच्छुक आहेत. त्यांनी जोरदार तयारीही सुरू केलीय. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच दक्षिण सोलापूरचे भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांची डोकेदुखी वाढलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -