13 Nov 2024, 20:42 वाजता
एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओविसी यांना सोलापूर पोलिसांनी नोटीस दिली आहे. सोलापूर मध्य विधानसभा मतदार संघाचे उमेदवार फारुख शाब्दी यांच्या प्रचारसभेला आलेल्या ओविसी यांना मंचावरच नोटीस देण्यात आली.ओविसी यांनी आपल्या भाषणात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही, प्रक्शोभक भाषण करू नये अशी पोलिसांची नोटीस आहे. भारतीय नागरिक संहिता कलम 168 प्रमाणे पोलिसांनी नोटीस दिली.
13 Nov 2024, 18:44 वाजता
हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार आहेत. तर ठाकरे कडून डॉक्टर संतोष टारफे यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. आज कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील वाकोडी परिसरात उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार डॉ. संतोष टारफे प्रचारा निमित्त गेले असता तेथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या वाहनावर दगडफेक करून तोडफोड केल्याचा केल्याची माहिती मिळत आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करावा यासाठी माजी खासदार शिवाजी माने, स्वतः उमेदवार डॉ. संतोष टारफे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गोपू पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसले आहेत
13 Nov 2024, 18:38 वाजता
आचारसंहितेनंतर कोल्हापूर परिक्षेत्रात तब्बल 20 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 6 कोटी 64 लाख रोख रक्कम, 2 कोटी 83 लाख रुपयांची दारू, 22 लाख 24 हजार किमतीचा 113 किलो गांजा, 7 कोटी 57 लाख रुपये किमतीचे 9 किलो सोने 60 किलो चांदी, 1 कोटी 87 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण मध्ये 23 अवैध अग्निशस्त्र, 36 काडतूसे हस्तगत करण्यात आली आहे. आदर्श निवडणूक आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी कोल्हापूर परिक्षेत्रात एकूण 10 दखलपात्र आणि 15 अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे.
13 Nov 2024, 17:37 वाजता
पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.
13 Nov 2024, 17:37 वाजता
पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.
13 Nov 2024, 16:02 वाजता
जालना तालुक्यातील वाघ्रुळ चेकपोस्टवर पोलिसांनी 3 लाख 82 हजार 170 रुपयांची रोख रक्कम जप्त केलीये. विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज झाले असून शहरातील चोही बाजूने नाकाबंदी करण्यात येत आहे. दुपारी 12:00 वाजेच्या सुमारास वाघ्रूळ जहागीर येथील नाकाबंदी दरम्यान एसएसटी पथकाने एका चार चाकी वाहनातून नेण्यात येत असलेली 3 लाख 82 हजार 170 रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. दरम्यान पोलिसा़कडून चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरु आहे.
13 Nov 2024, 13:47 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: शरद पवारांचा फोटो वापरू नका, कोर्टाचे अजित पवारांच्या पक्षाला निर्देश
शरद पवारांचा फोटो वापरू नका, कोर्टाचे अजित पवार यांच्या पक्षाला स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
13 Nov 2024, 13:46 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: 'माझ्या कोकणचं अदाणीकरण होऊ देणार नाही'
टिमलो आणि हे महाशय जागा शोधत होते कशासाठी? अदाणी साठी त्याचे दलाल बनवून तुम्ही आम्हाला फसवतात. सरकार येणार म्हणजे येणार सरकार आल की मी अदानीच्या घशातील मुंबई काढून घेणार. माझ्या कोकणचं अदाणीकरण होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
13 Nov 2024, 13:41 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: छत्रपतींचा पुतळा म्हणजे ईव्हीएम मशीन नाही; ठाकरेंची महायुतीवर टीका
छत्रपतींचा पुतळा म्हणजे ईव्हीएम मशीन नाही. साडेतीनशे वर्ष किल्ला उभा आहे आणि आमचे दाढीवाले म्हणतात वाऱ्यामुळे पडला. केसरकर म्हणतात वाईटातून काही तरी चांगल होईल. त्यात काय चांगल होईल? केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गात चांगल होईल, अशी टीका उद्धव ठाकरेंनी महायुतीवर केली आहे.
13 Nov 2024, 13:39 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: काश्मीर हे भारताचे आहे, 370 काढून चांगले केलेः अमित शाह
काश्मीर हे भारताचे आहे, 370 काढून चांगले केले, राहुल बाबा, इंदिरा गांधी आल्या तेही 370 परत येणार नाही. काश्मीर अभिन्ग अंग, ते कोणी वेगळे करू शकत नाही. आता मी गृहमंत्री, त्यामुळे काश्मीरमध्ये कोणाच्या केसाला धक्का लागणार नाही, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.