13 Nov 2024, 13:38 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: लोकसभेला मोदी शहांची भाषणे ऐकून लोकांमध्ये अस्वस्थता होतीः शरद पवार
लोकसभेला मोदी शहांची भाषणे ऐकून लोकांमध्ये अस्वस्थता होती. नेमकं यांच्या मनात काय हे कळत नव्हतं. या लोकसभेत मात्र यावेळी तुम्ही प्रचंड ताकतीन आमच्या मागे उभे राहिले. 48 पैकी 31 लोक निवडून आले, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
13 Nov 2024, 12:49 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महायुतीच्या दोन्ही उमेदवारामध्ये पडली ठिणगी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे यांनी भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर तिकीट कसं आणलं याचे आपल्याकडे पुरावे आहेत. त्यांचे वरिष्ठ काही बोलत नाहीत त्यामुळे आपणही बोलणार नाही दोन-तीन दिवसांमध्ये हे सगळे पुरावे आपण समोर आणू, असं वक्तव्य सुरेश धस यांनी केले आहे. मैत्रीपूर्ण लढत असं म्हणत असले तरी ही लढत शत्रु पूर्ण असल्याचं सुरेश धस म्हणालेत
13 Nov 2024, 12:16 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याचा राहुल लोणीकरांना फटका
जालना जिल्ह्यातील परतूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकरांचे पूत्र राहुल लोणीकरांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. मंठा तालुक्यातील उस्वद येथे राहुल लोणीकर प्रचाराला गेले असता काही मराठा आंदोलक त्याठिकाणी आले.. आणि बबनराव लोणीकर यांनी मराठा समाजाविषयी केलेल्या वक्तव्याचा जाब विचारला. मात्र मराठा आंदोलकांना राहुल लोणीकरांनी व्यवस्थित उत्तर न देता त्यांचं ऐकून घेतलं नाही. त्याचबरोबर तुम्हाला जो लिहून देईल त्याला बिनधास्त मतदान करा असंही राहुल लोणीकर यांनी मराठा आंदोलकांना म्हंटलं आहे. त्यामुळं राहुल लोणीकर हे आडमुठेपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला असून जरांगे पाटलांच्या सूचनेनुसार मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात येणार्यांना पाडणार असं या आंदोलकांनी म्हंटलं आहे.
13 Nov 2024, 12:08 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे राज्यातील ऊस हंगाम लांबण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकीच्या धामधूमिमुळे राज्यातील ऊस हंगाम लांबण्याची शक्यता आहे. 15 नोव्हेंबर पासून राज्यातील ऊस हंगाम सुरू होणार असला तरी प्रत्यक्ष उसाचे गाळप विधानसभा निवडणुकीच्या पडघमानंतरच सुरू होण्याची शक्यता आहे. साखर कारखान्याचे संबंधित नेते, चेअरमन, एमडी आणि कामगार हे निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त असल्याने निवडणूक निकालानंतर प्रत्यक्षात बहुतांशी साखर कारखान्याचे धुरांडे पेटण्याची शक्यता आहे.
13 Nov 2024, 12:08 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्त्वे
सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत
1 कोणतेही घर कारणे दाखवा नोटीसशिवाय पाडू नये. किमान 15 दिवसांचा अवधी द्यावा
2 नोटीस नोंदणीकृत पोस्टाने पाठवावी, ती घराबाहेर चिकटवावी.
3 सूचनेमध्ये नियमांचे उल्लंघन कसे झाले याचा स्पष्ट उल्लेख असावा.
4 प्राधिकरणाने जमीनमालकाला सुनावणीची संधी दिली पाहिजे.
5 पाडण्याच्या प्रक्रियेची व्हिडिओग्राफी असावी.
6 डिमोलिशन रिपोर्ट डिजिटल पोर्टलवर अपलोड करावा
13 Nov 2024, 10:36 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: नाशिकमध्ये बागेश्वर धाम वीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमास विरोध
बागेश्वर धाम धिरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पोलीस आयुक्तांना निवेदन. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा हा कार्यक्रम असल्याचं अंनिसचा दावा
13 Nov 2024, 10:35 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: जोगेश्वरी राड्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
जोगेश्वरी येथे मध्यरात्री झालेल्या राड्याप्रकरणी ठाकरे व शिंदेंच्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
13 Nov 2024, 09:09 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महायुतीच्या उमेदवारासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांचा रोड शो
शिरूर हवेली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्या प्रचारार्थ अभिनेते सयाजी शिंदे यांचा उरुळी कांचन येथे रोडशो पार पडला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कटके यांनी मतदारांशी संवाद साधला
13 Nov 2024, 09:09 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: लोकसभेनंतर विधानसभेतही राणांविरोधात पुन्हा बच्चू कडूंनी ठोकले दंड
शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार प्रीती बंड यांना बच्चू कडूंच बळ. येत्या 17 तारखेला बच्चू कडू आणि नयना कडू घेणार प्रीती बंड यांच्यासाठी भव्य जाहीर सभा. कडू दाम्पत्याच्या एन्ट्रीने बडनेरा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार आहेत. बडनेरा मतदार संघात बच्चू कडू एन्ट्री करत असल्याने रवी राणांचं टेन्शन वाढणार.
13 Nov 2024, 08:31 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: मुंबईत दोन्ही शिवसेनेत राडा, मध्यरात्री दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक
जोगेश्वरीत दोन्ही शिवसेनेत राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लबमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप होता. पैसे वाटप रोखण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मातोश्री क्लबमधून दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे.