Breaking News Live : फणडवीसांना ही शेवटची संधी - जरांगे

दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Breaking News Live : फणडवीसांना ही शेवटची संधी - जरांगे

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

22 Sep 2024, 10:41 वाजता

मराठा आरक्षणामुळे धनगर आरक्षणाला धक्का नाही - जरांगे
काल मराठा समाजाच्या मुलांना मारहाण - जरांगे
फणडवीसांना ही शेवटची संधी - जरांगे
शाळा, दवाखान्यात जाण्याचे रस्त बंद केले - जरांगे
भुजबळ, फडणवीस राज्य चालवतात का? - जरांगे 

22 Sep 2024, 08:54 वाजता

बारामतीतून शरद पवार LIVE 

10 दिवसांत जागा वाटप पूर्ण करणार - शरद पवार 
आम्ही तीन पत्र एकत्र निवडणूक लढणार - शरद पवार 
इच्छुक उमेदवारांचा अभ्यास सुरु आहे - शरद पवार 
जागा वाटपाचा निर्णय झाला की उमेदवार ठरवू 

22 Sep 2024, 08:46 वाजता

बारामतीत सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आलेत. शहरात अनेक ठिकाणी सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री असे मोठं मोठे बॅनर लावण्यात आलेत. तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार असे बॅनर झळकले आहे. त्यामुळे सुळे आणि युगेंद्र यांच्या बॅनरची आता राज्यात चर्चा होत आहे. 

22 Sep 2024, 08:45 वाजता

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाली आहे.  27 आणि 28 सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक राज्याच्या दौ-यावर जाणार आहे. महिन्या अखेरीस निवडणुकीच्या घोषणेची शक्यता आहे. 

 

22 Sep 2024, 08:44 वाजता

अजित पवार पक्षाची जनसन्मान यात्रा आज मोहोळ, माढ्यात आहे. अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ बंदची हाक देण्यात आली आहे. 

22 Sep 2024, 08:43 वाजता

मराठा आंदोलकांकडून आज जालना आणि परभणी जिल्हा बंदची हाक; तर वडीगोद्रीतून अंतरवालीकडं जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद ठेवण्यात आलं आहे.  मराठा-ओबीसी वाद टाळण्यासाठी निर्णय.