प्रेम, ईर्ष्या माणसाला काय करायला लावेल याचा आपण विचारच करु शकत नाही. बहिणी सोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणाला खदानीमध्ये ढकलून देत त्याचा खून केला. ही घटना देहूरोड येथील ट्राय जीजस चर्चा पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी घडली. अजय जोगिंदर लुंकड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी कुणाल चंदू सकट, प्रेम सचिन मोरे,ओंकार उर्फ गणेश रवींद्र पवार या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. देहूरोड येथे असलेल्या ट्राय जीजस चर्च पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खदानीमध्ये एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या ठिकाणी पाहणी करून अजय याचा खून केल्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी तपास केला.
काही वेळात पोलिसांनी तीन जणांना संशयावरून ताब्यात घेतले. अजय लुक्कड याचे एका आरोपीच्या बहिणीसोबत प्रेम संबंध होते. त्या कारणावरून त्या तिघांनी मिळून अजय याला खदानी जवळ बोलवून घेतले. तिथून आरोपींनी अजयला खदाvमध्ये ढकलून दिले. यामध्ये अजयचा मृत्यू झाला. आरोपींना 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहे.