Maharashtra Breaking News LIVE: राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांनी राजकीय दौरे सुरू केले आहेत. राज्यासह देश-विदेशातील इतर घडामोडींचा आढावा जाणून घेऊया.
20 Aug 2024, 13:29 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास SIT करणार
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत.
20 Aug 2024, 13:02 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर अत्याचार प्रकरणः संतप्त पालकांकडून पोलिसांवर दगडफेक
बदलापूर अत्याचार प्रकरणात पालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज सकाळपासून शाळेच्या गेटवर ठिय्या मांडला होता. तर संतप्त पालकांनी रेल रोको केला. आता या प्रकरणी, संतप्त पालकांनी दगडफेक केली आहे. तर, पोलिसांनीही पालकांवर सौम्य लाठीचार्ज केला आहे.
20 Aug 2024, 12:46 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर अत्याचार प्रकरणात 'त्या' शाळेला कारणे दाखवा नोटिस
बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई कामगाराने दोन चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. यातील आरोपी अटक असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई झालेली आहे. शाळेने संबंधितांना निलंबित केले आहे. आता ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून संबंधित शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे
20 Aug 2024, 12:45 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल
बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई कामगाराने दोन चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. यातील आरोपी अटक असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई झालेली आहे. शाळेने संबंधितांना निलंबित केले आहे. आता या प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली आहे.
20 Aug 2024, 12:19 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: शाळेत तक्रारपेटी बसवण्यात येणार; केसरकरांची घोषणा
बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर राज्यात तणावस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी शाळेत तक्रारपेटी बसवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
20 Aug 2024, 11:35 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: कळवा, बदलापूर प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश
20 Aug 2024, 11:35 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर प्रकरणी 2 तासात आरोपीला अटक; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
20 Aug 2024, 11:17 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर शहरातून पूल आंदोलकांनी बंद पाडला
बदलापूर शहरातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाण पूल संतप्त नागरिकांनी बंद केला
20 Aug 2024, 11:05 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर अत्याचार प्रकरणी संतप्त नागरिकांचा रेल रोको, वाहतूक ठप्प
बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर बलात्कार प्रकरणी पालकांनी संतप्त भूमिका घेतली आहे. शाळेच्या गेटजवळ ठिय्या आंदोलनानंतर आता बदलापूरकरांनी बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन केले आहे.
20 Aug 2024, 10:47 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: महायुती हा शब्द गोंडस: संजय राऊतांचा टोला
अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तीन पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही महायुती हा शब्द गोंडस आहे. ती युती नसून संघर्ष. रोज त्यांच्या मारामाऱ्या दिसत नाहीत पण चालू आहे