Maharashtra Breaking News LIVE :बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांनी राजकीय दौरे सुरू केले आहेत. राज्यासह देश-विदेशातील इतर घडामोडींचा आढावा जाणून घेऊया.   

Maharashtra Breaking News LIVE :बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांनी राजकीय दौरे सुरू केले आहेत. राज्यासह देश-विदेशातील इतर घडामोडींचा आढावा जाणून घेऊया. 

 

 

20 Aug 2024, 21:08 वाजता

बदलापूर अत्याचार दुर्घटना प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली होणार तपास

20 Aug 2024, 20:00 वाजता

अखेर बदलापूर स्थानकावरुन लोकल रवाना, 10 तासांनी लोकल कर्जतच्या दिशेने रवाना

20 Aug 2024, 19:19 वाजता

कर्जत आणि कल्याण रेल्वे स्थानकावरून बदलापूरच्या दिशेने बदलापूरच्या दिशेने इंजिन  टेस्टिंग पाठवणार आहे,  इंजिन पास झाल्यानंतर लोकल सेवा सुरू होणार

 

20 Aug 2024, 18:53 वाजता

भाजपाकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी

- भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी
- धैर्यशील पाटील यांनी 2023 मध्ये शेकाप मधून भाजप मध्ये प्रवेश केला
- 2014 ला पेण मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. 
-  2019 च्या विधानसभा  निवडणुकीत झाला होता पराभव

20 Aug 2024, 17:52 वाजता

बदलापूरमध्ये पोलिसांकडून आंदोलक प्रवाशांवर लाठीचार्ज सुुरु, प्रवाशांकडून पोलिसांवर दगडफेक

20 Aug 2024, 16:52 वाजता

बदलापूर प्रकरणी दोन अधिकाऱ्यांसह हेडकॉन्स्टेबलचं निलंबन, फडणवीसांचे आदेश

बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना आदेश दिले आहेत. 

20 Aug 2024, 16:11 वाजता

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात दोन वेळा महाराष्ट्र दौऱ्यावर

25 ऑगस्टला लखपती दीदी कार्यक्रमाला पंतप्रधान यांची हजेरी

30 ऑगस्ट ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसरा महाराष्ट्र दौरा

वाढवण बंदर भूमिपूजनाचा कार्यक्रम 30 तारखेला होणार

20 Aug 2024, 15:39 वाजता

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बदलापूरला रवाना

सरकारचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजन घटनास्थळी भेट देणार

थोड्याच वेळात पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार

पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासोबत संवाद साधणार

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गिरीश महाजन मैदानात

आंदोलनकर्त्यांसोबतही गिरीश महाजन करणार चर्चा

20 Aug 2024, 15:25 वाजता

पुणे - पोर्शे कार अपघात प्रकरणी ससूनमधून दोघांना अटक 

दोघांना आज कोर्टात हजर केलं आहे

रक्त चाचणी फेरफार प्रकरणात या दोघांना अटक करण्यात आली आहे

20 Aug 2024, 14:01 वाजता

घटनांचा राजकारणासाठी वापर- ठाकरे 

देशाच्या अनेक भागांत अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत. मात्र, काही राज्यात अशा घटना घडल्या तर त्याचा राजकारणासाठी वापर केला जातो, असा नवा ट्रेंड सुरू झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.