Today Breaking News LIVE Updates: राज्यातील व देशातील राजकीय व इतर घडामोडींचा आढावा घेऊया या लाइव्ह अपडेटमधून.
तुकाराम महाराज आणि माऊलींची पालखी आज पुण्यात दाखल होणार आहे. माऊलींच्या पालखीचा आज पुण्यात मुक्काम असणार आहे. लाखो वारकरी सोहळ्यात दाखल.
साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा याची अनुभूती पुणेकर आज घेत आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होत आहे. तुकोबारायांची पालखी आकुर्डीचा मुक्काम उरकून तर ज्ञानोबांची पालखी आळंदीतला मुक्काम उरकून पुण्यनगरीत दाखल होत आहे. या निमित्ताने पुणेकरांनी संत जनांच्या स्वागताची जय्यत तयारी केलीये... राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन दिवसांचा मुक्काम असतो.तुकाराम महाराजांच्या पादुका निवडुंग्या विठोबा मंदिरात तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखी विठोबा मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात येतात. त्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांच्या रांगा लागतात.
30 Jun 2024, 10:13 वाजता
तिस-या कार्यकाळात आजपासून नव्याने सुरू होणार मन की बात...सकाळी ११ वाजता पंतप्रधान साधणार संवाद
30 Jun 2024, 09:46 वाजता
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीला आज पिंपरी चिंचवड मधून पुण्याकडे प्रवास सुरू केला असताना पिंपरी-चिंचवडमध्ये ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांनी ही पुण्याकडे विठू नामाच्या गजरात पुण्याकडे प्रवास सुरू केला.