संजय राऊतांचे भाऊ... ती टीका आणि 'बकरी'; काय आहे प्रकरण?

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी प्रचाराचा फोडला आहे. प्रचार करताना विरोधकांवर टीका करणं ही अतिशय सामान्य बाब आहे. पण आमदार सुनील राऊतांना हीच टीका भारी पडली आहे. विक्रोळी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 5, 2024, 12:08 PM IST
संजय राऊतांचे भाऊ... ती टीका आणि 'बकरी'; काय आहे प्रकरण?

संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांच्यावर विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांच्याबद्दल केलेले चुकीचे वक्तव्य चांगलेच भोवले आहे. 

विक्रोळीचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील राऊत यांनी केलेला वक्तव्याच्या विरोधात महायुतीच्या उमेदवार सुवर्णा कारंजे यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच एखाद्या बद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणासंदर्भातील सेक्शन्स या गुन्ह्यात लावण्यात आलेले आहे.

नेमकं काय झालं? 

शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विक्रोळीचे उमेदवार सुनील राऊत यांच्या एका वक्तव्यामुळे आता वाद पेटण्याचे चिन्ह निर्माण झाली आहेत. मुस्लिम समाजाच्या एका कार्यक्रमात सुनील राऊत यांनी म्हटलंय की, ‘जब बकरा बनाना ही था, तो बकरी को मेरे गले मे डाल दी, अभी 20 तारीख को काटेंगे बकरी को’. याचा आशय असा होतो की, माझ्यासमोर कुठलाही आवाहन नव्हतं म्हणून एक बकरी उभी केली आणि निवडणुकीनंतर आपण तिचं डोकं कापू अशा आशयाचा वक्तव्य केलं. ज्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सुवर्णा कारंजे यांनी त्यांच्या या वक्तव्याला आक्षेप घेत कांजुर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. महिलांचा खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप सुवर्णा करंजे यांनी केला आहे.

तिसऱ्यांदा मिळालं तिकिट 

गेले दोन टर्म म्हणजे 10 वर्ष आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांनी तिसऱ्यांदा सुनील राऊत यांना तिकीट दिलं आहे. सुनील राऊत यांनी केलेल्या वक्तव्यात शिंदे गटाच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांचा 'बळीचा बकरा' असा उल्लेख केला आहे. 

अरविंद सावंत यांच्यावरही आरोप 

 शिवसेना पक्षाचे अरविंद सावंत यांच्यावरही त्यांच्या विरोधीत महिला उमेदवाराविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. मुंबादेवी मतदारसंघातील उमेदवार शायना एनसी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे अरविंद सावंतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x