Shiv Sena Symbol LIVE Updates : सत्तासंघर्षाची सुनावणी संपली, सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला

Shiv Sena Symbol Hearing Updates : महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षाची ( Maharashtra political crisis) सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. शिवसेना (Shiv Sena) पक्ष  शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण (Dhanushyaban) आणि 16 आमदारांच्या पात्रतेचा मुद्द्याबाबत सुप्रीम कोर्टात फैसला काय होणार याची उत्सुकता आहे. 

Shiv Sena Symbol LIVE Updates : सत्तासंघर्षाची सुनावणी संपली, सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला

Shiv Sena Symbol Row Hearing Updates : महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षाची  ( Maharashtra political crisis) सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे.  ( Maharashtra political News) शिवसेना (Shiv Sena) पक्ष  शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण (Dhanushyaban)आणि 16 आमदारांच्या पात्रतेचा मुद्द्याबाबत सुप्रीम कोर्टात फैसला काय होणार याची उत्सुकता आहे.  (Shiv Sena Symbol)  

16 Feb 2023, 13:51 वाजता

Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates :  शिंदे आणि ठाकरे गटाचे युक्तीवाद संपले. सुप्रीम कोर्टानं निर्णय राखीव ठेवला.

16 Feb 2023, 13:47 वाजता

Shiv Sena Symbol Row Hearing Updates : आजची सुनावणी संपली, सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला 

16 Feb 2023, 13:18 वाजता

Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates :  सरकार आणि विरोधकांमध्ये बुद्धिबळाचा खेळ सुरू होता. दोघांनाही एकमेकांच्या चाली माहिती होत्या, कोर्टाने काढला चिमटा. 
 

16 Feb 2023, 13:18 वाजता

Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates :  नबाम रेबिया प्रकरण या खटल्याला लागू होऊ शकत नाही, कपिल सिब्बल यांचा कोर्टात दावा. आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये म्हणून अविश्वास प्रस्ताव आणला, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार मोडीत काढण्याचा प्रकार

16 Feb 2023, 13:16 वाजता

Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates :  आमदार विलीन झाले, तरी मूळ पक्ष तसाच राहतो, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. राजस्थानच्या केसचा दिला दाखला.
- सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीपचे आमदारांकडून उल्लंघन. त्यांनी भाजप उमेदवाराला मतदान केले, सिब्बल यांचा युक्तिवाद.
- दहाव्या सूचीचा वापर सरकार पाडण्यासाठी होऊ नये, सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद.
- दहाव्या सूचीत बहुमताला महत्त्व असा काही नियम नाही, कपिल सिब्बल यांचा न्यायालयात युक्तिवाद.
- शिंदे गटाचे आमदार 34 असले, तरी त्यांच्यासमोर विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही. सिब्बल यांचा दावा.
- महाराष्ट्राच्या केसचा परिणाम भविष्यावर होणार, कपिल सिब्बल यांचा न्यायालयात युक्तिवाद.

16 Feb 2023, 13:03 वाजता

Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates :  ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून लोकसभेच्या नियमाचे सर्वोच्च न्यायालयात वाचन सुरु. लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार पाडले, कपिल सिब्बल यांचा न्यायालयात युक्तिवाद. 
- गुवाहटीत बसून महाराष्ट्र सरकारसंदर्भात निर्णय होऊ शकत नाही, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद.
- आमदार विलीन झाले, तरी मूळ पक्ष तसाच राहतो, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. राजस्थानच्या केसचा दिला दाखला.

16 Feb 2023, 12:50 वाजता

Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates :  आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये म्हणून अविश्वास प्रस्ताव आणला. नबाम राबिया प्रकरण लागू होऊ शकत नाही.  शिंदे गटाचे आमदार 34 असले तरी त्यांच्याकडे विलीकरणा शिवाय पर्याय नाहीत, असा जोरदार युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला. कपिल सिब्बल यांच्याकडून लोकसभेच्या नियंमांचे वाचन सुरु झाले.

16 Feb 2023, 12:24 वाजता

Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षांचे अधिकार उपाध्यक्षांकडे गेले  - ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल

16 Feb 2023, 11:59 वाजता

Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारने बहुमत चाचणीला सामोरं जायला हवं होतं, शिंदे गटाकडून जेठमलानींचा युक्तिवाद. मध्यप्रदेशातील सत्तासंघर्षाचाही दाखला

16 Feb 2023, 11:54 वाजता

Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : CJI : नबाम रेबियाचा संदर्भ का घेऊ नये असे तुम्हाला वाटते? जेठमलानी - 28 जून रोजी राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट करण्याचे आदेश दिले. स्पीकर पूर्वग्रह दूषित होते, अधिकाराचा  अपात्रतेच्या वापर केला गेला.