Maharashtra Breaking News LIVE : शिवसेना UBT पक्षाचे 31 उमेदवार ठरले? 2 आमदारांची उमेदवारी धोक्यात

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 दिवाळीनंतर 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखेची घोषणा होऊनही अद्याप कोणत्याही पक्षाने आपली उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. जागावाटपाचा तिढा अद्याप महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो त्यात दिसून येतोय. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडीचा थोडक्यात आढावा एका क्लिकवर पाहा LIVE UPDATES... 

Maharashtra Breaking News LIVE : शिवसेना UBT पक्षाचे 31 उमेदवार ठरले? 2 आमदारांची उमेदवारी धोक्यात

19 Oct 2024, 09:37 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : धुळ्यातील ग्रामीण मतदार संघाच्या जागेवरुन महासंग्राम 

धुळ्यातील ग्रामीण मतदार संघासाठी भाजपकडून बाळासाहेब भदाणे आणि राम भदाणे इच्छुक आहेत...  मात्र  माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरेंनी उडी घेतल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय... खासदारकीला पडल्यानंतर  भामरे  पुन्हा धुळे ग्रामीण मतदारसंघासाठी  इच्छुक असल्याची चर्चा रंगलीय...  

 

19 Oct 2024, 09:08 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : शरद पवार पक्षाच्या संसदीय मंडळाची आज बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या संसदीय मंडळाची आज मुंबईत बैठक होणारेय. या बैठकीला हर्षवर्धन पाटीलही उपस्थित राहण्याची शक्यताये. नुकतीच तुतारी हाती घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटलांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीय. त्यांची संसदीय मंडळात नियुक्ती करण्यात आलीय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवारांनी हर्षवर्धन पाटलांना पत्राद्वारे कळविले आहे. या संसदीय मंडळाची आज मुंबईत बैठक पार पडणारेय.

 

19 Oct 2024, 09:07 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मविआत अद्यापही 28 जागांवर तिढा- सूत्र

मविआत अद्यापही 28 विधानसभा जागेवरून वाद सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. महाविकास आघाडीमध्ये 250 पेक्षा जास्त जागांवर एकमत झालं आहे. तर 28 जागांवरून पेच निर्माण झाला आहे. मुंबई आणि विदर्भातील जागांवरून तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनेही दावा केला आहे. मुंबईतील तीन जागांचा तिढा कायम आहे. यात वर्सोवा, भायखळा आणि धारावी या मतदारसंघांचा मुद्दा आहे. या मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे. वर्सोवा, भायखळा आणि घाटकोपर पश्चिम या मतदारसंघांवर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला आहे.

 

19 Oct 2024, 09:05 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : महायुतीचं जागावाटप फायनल - सूत्र 

महायुतीचं जागावाटप फायनल झाल्याची माहिती सूत्रांनी झी 24 तासला दिलीय. दिल्लीत अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत विधानसभेचं जागावाटप फायनल झाल्याची माहिती आहे.. दिल्लीत अमित शाहांसोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची रात्री उशीरा बैठक झालीय.. लवकरच आता राज्यात जोरदार प्रचार करण्यात येणार आहे..