Maharashtra Breaking News LIVE : मुंबई महायुतीच्या जागांचा तिढा सुटला? कोणाला किती जागा पाहा

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 दिवाळीनंतर 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखेची घोषणा होऊनही अद्याप कोणत्याही पक्षाने आपली उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. जागावाटपाचा तिढा अद्याप महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो त्यात दिसून येतोय. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडीचा थोडक्यात आढावा एका क्लिकवर पाहा LIVE UPDATES... 

Maharashtra Breaking News LIVE : मुंबई महायुतीच्या जागांचा तिढा सुटला? कोणाला किती जागा पाहा

19 Oct 2024, 12:13 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार गुवाहाटीला 

कामाख्या देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला जाणार आहेत. कामाख्या देवीचं दर्शन घेऊन एकनाथ शिंदे प्रचार सुरू करणार आहे. आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं.

 

19 Oct 2024, 10:45 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : महायुतीचा मुंबई जागा वाटपाचा तिढा सुटला? कोणाला किती जागा पाहा

महायुतीचा मुंबई जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबई शहरातील 36 विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक मतदारसंघ भाजपला मिळणार. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारसंघ मिळणार. मुंबईतील 36  विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे जागावाटप असे असण्याची शक्यता.

HEDAR: मुंबईतील 36  विधानसभा मतदारसंघाचे महायुती जागावाटप

१) भाजप 18

२) शिवसेना 16

३) राष्ट्रवादी काँग्रेस 2 

19 Oct 2024, 10:35 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे रत्नागिरीचे ते उमेदवार ठरले?

रत्नागिरी जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निश्चित झाले, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. रत्नागिरी मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवाराबाबत मात्र सस्पेन्स कायम आहे. दापोली विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार संजय कदम, गुहागरमधून आमदार भास्कर जाधव, राजापूरमधून आमदार राजन साळवी हे तीन उमेदवार निश्चित झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. राजन साळवी, भास्कर जाधव 24 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याच बोलं जातंय. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात उदय सामंत यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार कोण असणार हे मात्र अद्याप निश्चित नाही. 

19 Oct 2024, 10:21 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : शंभूराज देसाई यांच्याकडून पाटण मतदारसंघात गाठीभेटी सुरु

साताऱ्यातील मंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघात गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलीय. पाटणमध्ये घेतलेल्या बैठकीत महायुतीकडून तयार केलेलं रिपोर्ट कार्ड जनतेसमोर प्रकाशित करण्यात आलं. तसंच ज्यांची विकासाची कामे झाली आहेत. ती जनता आमच्या सोबत राहतील,  असा विश्वास यावेळी देसाईंनी व्यक्त केलाय. 

 

19 Oct 2024, 10:08 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : सोलापूर शहर मध्यच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच

सोलापूर शहरातील एका मतदारसंघावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांनी दावा ठोकलाय. शिवसेनेकडून सोलापूर शहरमध्यसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत हे इच्छुक आहेत.. तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही इच्छुक उमेदवारांची मोठी यादी आहे.. त्यामुळे आता हा मतदारसंघ महायुतीत कुणाच्या पारड्यात पडणार याकडे सा-यांच लक्ष लागलंय. 

 

19 Oct 2024, 10:07 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : रत्नागिरीच्या राजापूर विधानसभा मतदारसंघात पोस्टर वॉर 

रत्नागिरीच्या राजापूर विधानसभा मतदारसंघात सोशल मीडियावर कार्यकत्यांमध्ये पोस्टर वॉर सुरू आहे. किरण सामंतांच्या पोस्टरला राजन साळवी समर्थकांकडून उत्तर देण्यात आलंय. राजापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राजन साळवी आणि उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्याच लढत होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये पोस्टर वॉर रंगलंय. 

 

19 Oct 2024, 09:39 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : रायगडमधील काँग्रेस सक्रिय 

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर रायगडमधील काँग्रेस सक्रिय झालीये... पक्ष निरीक्षकांनी अलिबागमधील काँग्रेस भवनात बैठक घेतली.. कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. त्यांना प्रशिक्षण दिलं...तर महाविकास आघाडीने काढलेल्या गद्दारांचा पंचनामा या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आलं...

19 Oct 2024, 09:37 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : धुळ्यातील ग्रामीण मतदार संघाच्या जागेवरुन महासंग्राम 

धुळ्यातील ग्रामीण मतदार संघासाठी भाजपकडून बाळासाहेब भदाणे आणि राम भदाणे इच्छुक आहेत...  मात्र  माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरेंनी उडी घेतल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय... खासदारकीला पडल्यानंतर  भामरे  पुन्हा धुळे ग्रामीण मतदारसंघासाठी  इच्छुक असल्याची चर्चा रंगलीय...  

 

19 Oct 2024, 09:08 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : शरद पवार पक्षाच्या संसदीय मंडळाची आज बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या संसदीय मंडळाची आज मुंबईत बैठक होणारेय. या बैठकीला हर्षवर्धन पाटीलही उपस्थित राहण्याची शक्यताये. नुकतीच तुतारी हाती घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटलांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीय. त्यांची संसदीय मंडळात नियुक्ती करण्यात आलीय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवारांनी हर्षवर्धन पाटलांना पत्राद्वारे कळविले आहे. या संसदीय मंडळाची आज मुंबईत बैठक पार पडणारेय.

 

19 Oct 2024, 09:07 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मविआत अद्यापही 28 जागांवर तिढा- सूत्र

मविआत अद्यापही 28 विधानसभा जागेवरून वाद सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. महाविकास आघाडीमध्ये 250 पेक्षा जास्त जागांवर एकमत झालं आहे. तर 28 जागांवरून पेच निर्माण झाला आहे. मुंबई आणि विदर्भातील जागांवरून तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनेही दावा केला आहे. मुंबईतील तीन जागांचा तिढा कायम आहे. यात वर्सोवा, भायखळा आणि धारावी या मतदारसंघांचा मुद्दा आहे. या मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे. वर्सोवा, भायखळा आणि घाटकोपर पश्चिम या मतदारसंघांवर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला आहे.