Maharashtra Election LIVE Updates: भाजपा आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर पोलिसांसोबत भिडले

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates: महाराष्ट्रात आज विधानसभेसाठी मतदान पार पडत आहेत. जाणून घेऊया राज्यातील घडामोडींचा आढावा. 

 Maharashtra Election LIVE Updates: भाजपा आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर पोलिसांसोबत भिडले

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates: महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहेत. राज्यात एकूण 288 मतदारसंघ आहेत. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होत आहे. आज राज्यातील सर्व घडामोडींचा धावता आढावा घेऊया. 

20 Nov 2024, 15:37 वाजता

महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 45.53 मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान सुरु आहे. 

20 Nov 2024, 13:37 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: राज्यात मतदानाचा वेग मंदावला; 1 वाजेपर्यंत फक्त 'इतकेच' टक्के मतदान

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान सुरू आहे. राज्यात सकाळी 1 वाजेपर्यंत  32.18% मतदान झालं आहे.  सर्वात कमी मतदान जळगाव जिल्ह्यात झाले आहे.

20 Nov 2024, 13:20 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: लातूर जिल्ह्यातील 'त्या' गावाचा मतदानावर बहिष्कार

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील टेंभुर्णी या गावातील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचा प्रकार समोर आला आहे. 923 मतदारांनी गावातील प्रश्नासाठी मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगण्यात आले आहे. मागील अनेक वर्षापासून या गावात समशानभूमीचा प्रश्न प्रलंबित आहे. समशानभूमीचा विषय मार्गी लागावा यासाठी अनेक वेळेस आंदोलने आणि निवेदने देण्यात आली. मात्र अद्याप त्यावर तोडगा निघाला नाही. यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

20 Nov 2024, 12:51 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE:  फुलाची शिरोली इथं भगव्या टोप्यांवरून तणाव

मतदान करण्यासाठी मतदारांनी भगवी टोपी घातल्याने पोलिसांनी हटकलं. भगव्या टोपीला विरोध केल्याने कार्यकर्त्यांनी गोल टोपी आणि हिजब घालून येणाऱ्या मतदारांना विरोध करण्याची केली मागणी. शिरोली इथल्या मतदान केंद्रावर मतदारांनी मोठ्या प्रमाणात भगव्या टोप्या घालून केला प्रशासनाचा निषेध. कोणत्याही परिस्थितीत भगवी टोपी घालूनच मतदान करण्याचा मतदारांनी घेतला पवित्रा

20 Nov 2024, 12:32 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE:  चंद्रपुरात भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले मतदान

चंद्रपुरात भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मतदान केले. चंद्रपूर शहरातील सिटी माध्यमिक शाळेत सहकुटुंब मतदान करत त्यांनी कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढविला. मुनगंटीवार स्वतः बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. 

20 Nov 2024, 12:31 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE:  मावळ तालुक्यात महिलांच्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पिंक पोलिंग स्टेशन

मावळ तालुक्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यातीलच मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात महिलांच्या मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पिंक पोलिंग स्टेशन तयार करण्यात आले आहे. या पिंक पोलिंग स्टेशनमध्ये सर्व महिला कर्मचारी कार्यरत असून पिंक कलरची थीम ठेवण्यात आली आहे. तसेच मतदानासाठी देखील या पिंक पोलिंग स्टेशनला महिलांना प्राधान्य देण्यात येत आहे. 

20 Nov 2024, 11:42 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: आदिती तटकरे यांची मतदान केंद्रांना भेट

श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार आदिती तटकरे आज सकाळीच घराबाहेर पडल्या. त्यानी आपल्या मतदार संघातील मतदान केंद्राना भेटी देत मतदारांशी संवाद साधला

20 Nov 2024, 11:31 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14% मतदान; सर्वात कमी मतदान... 

राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14% मतदान झालं आहे. कोणत्या जिल्ह्यात किती मतदान झाले याची आकडेवारी खालीलप्रमाणे

1) अहिल्यादेवी नगर (अहमदनगर) - 18.24%
2) अकोला - 16.35%
3) अमरावती -17.45 % 
4) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - 18.98 %
5) बीड - 17.41 %
6) भंडारा - 19.44 %  
7) बुलढाणा - 19.23 %  
8)चंद्रपूर - 21.50 %  
9) धुळे- 20.11 % 
10) गडचिरोली - 30.00 %  
11) गोंदिया -  23.32% 
12) हिंगोली - 19.20 %
13) जळगाव - 15.62%
14) जालना- 2129%
15) कोल्हापूर - 20.59 % 
16) लातूर - 18.55 % 
17) मुंबई शहर - 15.78% 
18) मुंबई उपनगर- 17.99% 
19) नागपूर- 18.90 % 
20) नांदेड- 13.67 % 
21) नंदुरबार - 21.60 % 
22) नाशिक - 18.71 % 
23) धाराशिव (उस्मानाबाद) - 17.07 % 
24) पालघर- 19.40 %
25) परभणी - 18.49 %
26) पुणे- 15.64 % 
27) रायगड- 20.40 % 
28) रत्‍नागिरी-22.93 % 
29) सांगली -18.55 % 
30)सातारा-18.72 % 
31) सिंधुदूर्ग- 20.19 % 
32) सोलापूर - 15.64 % 
33) ठाणे- 16.63 % 
34)वर्धा - 18.86 % 
35)वाशिम - 16.22% 
36) यवतमाळ-  19.38 % 

20 Nov 2024, 11:12 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब केले मतदान

 

20 Nov 2024, 10:54 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि आई सरिता फडणवीस यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला