Manoj Jarange Mumbai Morcha LIVE: आझाद मैदानाबाबत निर्णय उद्या 12 वाजता - मनोज जरांगे

Manoj Jarange Maratha Reservation Morcha Live Updates: मराठा आरक्षणाची हाक देत मनोज जरांगे पाटील त्यांच्या लाखोंच्या संख्येनं एकवटलेल्या मराठा बांधवांसह मुंबईत दाखतल होत आरक्षणाचं आंदोलन आणखी ज्वलंत करणार आहेत.   

Manoj Jarange Mumbai Morcha LIVE: आझाद मैदानाबाबत निर्णय उद्या 12 वाजता - मनोज जरांगे

Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: मराठा आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, आतापर्यंत समाजाची फसवणूक झाली पण इथून पुढं तसं होऊ देणार नाही अशा निर्धाराच्या शब्दांसह मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा मोर्चा आता मुंबईत दाखल होत आहे. मजल दरमजल करत लाखोंच्या संख्येनं एवटलेले हे मराठा आंदोलक मुंबई गाठत इथं आरक्षणाची मागणी उचलून धरणार आहेत. 

26 Jan 2024, 12:49 वाजता

Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates:रिकाम्या हातानं परत जायचं नाही- जरांगे 

देशातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आपला शब्द सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचं म्हणत मनोज जरांगे यांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. 'सरकारनं आता काही कागदपत्र दिली असून, त्यावर आपण चर्चा करणार आहोत. रिकाम्या हातानं परत जायचं नाही, फार फार तर काय...  तिथं मुंबईत जायला उशीर होईल पण झालेली चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं', असं जरांगे म्हणाले. 

26 Jan 2024, 11:49 वाजता

Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: जरांगे- मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा 

मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अखेर बोलणं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोघांमध्ये दहा ते पंधरा मिनिटात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, यादरम्यान आंदोलन मागे घेण्यात यावं असं राज्य सरकारकडून जरांगेंना सांगण्यात आलं आहे. त्यासंदर्भात शासनाचे अनेक निर्णय जरांगे पाटील यांना दाखवण्यात आले आहेत. चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती आहे. 

26 Jan 2024, 11:29 वाजता

Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: आरक्षण मिळावं अशी आमची भूमिका - अजित पवार 

मराठा आरक्षण अजित पवार म्हणाले की, "राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांच्या आंदोलनात लक्ष घालत आहेत. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी भांगे जरांगे यांच्यासोबत चर्चा करत आहेत. आरक्षण मिळावं अशी आमची भूमिका आहे".

26 Jan 2024, 10:26 वाजता

Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: वाहतुकीत बदल 

वाशी बस स्थानक परिसरात मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार असल्यामुळे वाशी बस स्थानक मध्ये येणाऱ्या सर्व गाड्या सायन पनवेल मार्गे अपडाऊन फिरवण्यात आलेले आहेत.कोपरखैरणे कडून वाशी कडे येणाऱ्या गाड्या पाम बीच मार्गे फिरवण्यात आलेल्या आहेत. 

26 Jan 2024, 09:18 वाजता

Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: जरांगेंच्या भेटीला सरकारचं शिष्टमंडळ 

मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेनं येण्याचा निर्धार करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालं असून, आता या चर्चेतून काही तोडगा निघतो का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. सामाजिक न्याय मंत्री सचिव सुमंत भांगे, मंगेश चिवटे यांचा शिष्टमंडळात समावेश.

26 Jan 2024, 09:02 वाजता

Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: आझाद मैदानात काय परिस्थिती? 

मुंबईतील आझाद मैदानावर जरांगेंसाठी उभारण्यात येणारं स्टेजचं काम थांबवण्याच्या मुंबई पोलिसांच्या सूचना. पोलिसांच्या नोटीशीविरोधात मराठा समन्वयकांची हायकोर्टात धाव.

26 Jan 2024, 09:01 वाजता

Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: मनोज जरांगेंना मुंबईत 'नो एन्ट्री'?

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आणि लाखो मराठा समर्थकांचं वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलंय.. हे भगवं वादळ मुंबईत धडकल्यास राजधानी मुंबई ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळंच मुंबई पोलिसांनी जरांगेंना नोटीस पाठवून, आझाद मैदान तसंच शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यास परवानगी नाकारलीय. 
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सकल मराठा समाज आंदोलक आपल्या वाहनांसह मुंबईत आल्यास त्याचा विपरित परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे. त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे,अशी भीती मुंबई पोलिसांनी नोटिशीत व्यक्त केलीय. खारघरमधील इंटनॅशनल कॉर्पोरेशन पार्क आंदोलनासाठी संयुक्तिक राहिल, असंही या नोटिशीत पोलिसांनी सुचवलंय.

26 Jan 2024, 08:28 वाजता

Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक 

सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. कुणबी दाखल्यांच्या नोंदी मिळवण्याचं काम सुरू असल्याचं ते म्हणाले. तसंच जरांगेंना आंदोलन थांबवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. OBCना दिल्या जाणा-या सोयीसुविधा मराठ्यांना देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

26 Jan 2024, 08:13 वाजता

Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: मराठा समर्थकांची गर्दी 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात येणाऱ्या ध्वज रोहनाच्या ठिकाणी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाज बांधवांची जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले आहेत त्या इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम आहे.

26 Jan 2024, 07:40 वाजता

Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली 

मराठा आंदोलन मोर्चासह मुंबईच्या दिशेनं निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांना ताप आला असल्याची माहिती मराठा समन्वय समितीकडून देण्यात आली आहे.