30 Oct 2023, 21:55 वाजता
हालचालींना वेग
मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री फडणवीसांची चर्चा होणार आहे. या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा केली जाणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची बैठक होतेय.
30 Oct 2023, 20:55 वाजता
बीडमध्ये संचारबंदी लागू
बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभुमिवर बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी बीड जिल्हा मुख्यालय आणि सर्व तालुका मुख्यालयाच्या 5 कि.मी. परिसरात तसेच राष्ट्रीय महामार्गावर पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू केलीय. जनतेने या काळात रस्त्यावर उतरू नये असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.
30 Oct 2023, 19:33 वाजता
मराठा आरक्षणाच्या पाठिंबासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. बीडचे गेवराई येथील आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
30 Oct 2023, 18:43 वाजता
शांतता राखण्याचं आव्हान
मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय, बीडमध्ये याचे तीव्र पडसाद पाहिला मिळताय. नेत्यांच्या कार्यलयावर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आल्याच्या घटना घडल्यात. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे. हिंसक आंदोलन थांबवा नाही तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसंच सत्ताधाऱ्यांनीच जाळपोळ केल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे.
30 Oct 2023, 18:00 वाजता
बीड
बीडमध्ये मराठा समाजाचा उद्रेक थांबण्याचं नाव घेत नाहीए. बीडमध्ये मराठा आंदोलकांनी एनसीपी भवन जाळल्यानंतर आता भाजप नेत जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय पेटवलं आहे.
30 Oct 2023, 17:31 वाजता
आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी भवन फोडत पेटवून दिलं. राष्ट्रवादी भवनला आग लावली. आगीत राष्ट्रवादी भवन जळून खाक झाले आहे.
30 Oct 2023, 16:37 वाजता
छगन भूजबळांच्या घराची सुरक्षा वाढवली
मराठा आंदोलन पेटलं असताना आता मंत्री छगन भूजबळ यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भूजबळांनी मराठा आरक्षणावर सरती भूमिका घेतली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केल्याचं पहायला मिळतंय.
30 Oct 2023, 16:17 वाजता
यवतमाळ येथे एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं आहे. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत.
30 Oct 2023, 14:56 वाजता
मराठवाड्यात बसवर दगडफेक
मराठवाड्यात एकूण बारा बसवर दगडफेक करण्यात आली. धाराशीवमध्ये 6 , जालन्यात 4 आणि नांदेड, परभणीत 2 बस फोडण्यात आल्या. बसतोडफोडीच्या पार्श्वभमीवर एकूण 3 हजार 331 बस फेऱ्या रद्द झाल्या. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतायत
30 Oct 2023, 14:56 वाजता
बीडमध्ये कार्यालयांना कुलुप लावलं
बीडमधल्या आष्टी इथे तहसीलसह सर्व कार्यालयाला मराठा आंदोलकांनी कुलूप लावलं..यावेळी आंदोलकांनी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचा-यांना आतमध्ये डांबून ठेवलं..जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत अशीच आंदोलन होतील,असा इशारा आंदोलकांनी दिला