PM Modi in Maharashtra LIVE : 'अटल सेतूमुळे गोवादेखील मुंबईच्या जवळ येणार'

PM Modi in Nashik Mumbai Maharashtra LIVE Updates: शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, नाशिकमधून त्यांचा हा दौरा सुरु होणार आहे. ज्यानंतर मुंबईतील नवा सी लिंक अर्थात शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचं लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडणार आहे.    

PM Modi in Maharashtra LIVE : 'अटल सेतूमुळे गोवादेखील मुंबईच्या जवळ येणार'

PM Modi in Nashik Mumbai Maharashtra LIVE Updates: आगामी लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर सध्या सत्ताधारी भाजप पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा विविध कार्यक्रम आणि प्रस्तावित प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर लोकार्पण सोहळ्यांना हजेरी लावताना दिसत आहेत. जास्तीत जास्त नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याला ते प्राधान्य देत आहेत. याच धर्तीवर मोदींचा महाराष्ट्र दौरा सुरु होत आहे. नाशिकमधून त्यांचा हा दौरा सुरु होणार असून, इथं पंतप्रधान मोदींचे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. 

मोदींचा नियोजित नाशिक दौरा सकाळी सव्वा अकरा वाजता सुरु होणार होता. मात्र पंतप्रधान सकाळी सव्वा दहा वाजताच नाशिकमध्ये दाखल होतील. नाशिकमध्ये पंतप्रधान रोड शो करणारेत. त्यानंतर ते काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि गोदातिरावर महाआरती करतील. त्यानंतर मोदींकडून या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उदघाटन होईल. नाशिकनंतर मोदी मुंबईकडे रवाना होतील. त्यांच्या या संपूर्ण दौऱ्याचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर 

12 Jan 2024, 16:39 वाजता

PM Modi in Maharashtra LIVE : 'अटल सेतू'चा व्हिडीओ 

12 Jan 2024, 16:09 वाजता

PM Modi in Maharashtra LIVE : पंतप्रधानांना दिली अटल सेतूची सविस्तर माहिती... 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुप्रतिक्षित आणि मैलाचा दगड ठरलेल्या अटल सेतूचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी, 12 जानेवारी 2024 रोजी पार पडला. मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्याच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल उपस्थित होते. यावेळी अभियंत्यांनी या सेतूबाबतची माहिती पंतप्रधानांना दिल्याचं पाहायला मिळालं. 

12 Jan 2024, 16:05 वाजता

PM Modi in Maharashtra LIVE : काय आहेत अटल सेतूची वैशिष्ट्ये? 

  • देशातील सर्वात मोठा 22 किमी लांब सागरी सेतू
  • मुंबई ते नवी मुंबई 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत शक्य
  • 22 किमीच्या सागरी सेतूवरून प्रवासासाठी 250 रुपये टोल
  • मुंबईतून नवी मुंबई, पुणे, कोकणाकडे लवकर जाता येणार
  • अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित
  • सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे
  • वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने कॅमेऱ्यात कैद होणार
  • समुद्रातील लाटा आणि भूंकपाचा विचार करून सेतू तयार करण्यात आला आहे. 

12 Jan 2024, 16:00 वाजता

PM Modi in Maharashtra LIVE : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 'अटल सेतू'चं लोकार्पण 

देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचं अर्थात अटल सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे. तब्बल 22 किमीच्या या सागरी सेतूवरून आता मुंबई ते नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांवर आला आहे. 

12 Jan 2024, 15:42 वाजता

PM Modi in Maharashtra LIVE : पंतप्रधान मोदी यांचा ताफा अटल सेतूच्या दिशेनं रवाना 

कुलाबा येथील आयएनएस शिकरा या नौदल तळावर हेलिकॉप्टरनं उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा मुंबईती नव्या सी लिंकच्या दिशेनं म्हणजेच अटल सेतूच्या दिशेनं रवाना झाला. 

12 Jan 2024, 14:12 वाजता

PM Modi in Maharashtra LIVE : अटल सेतूच्या उद्घाटनावर ठाकरे गटाचा बहिष्कार 

शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचं पंतप्रधान आज लोकार्पण करतील. मात्र त्याआधीच राजकीय नाट्य रंगताना दिसतंय. ठाकरे गटाने या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकलाय. निमंत्रण पत्रिकेत ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांचं नाव नाही. ठाकरे गटाला ऐनवेळी निमंत्रण दिल्याने ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केलीय. खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन अहीर हे या भागातील स्थानिक आमदार खासदार आहेत. यामधील काही जणांना काल रात्री तर काही जणांना आज सकाळी निमंत्रण पत्रिका मिळाल्याची माहिती आहे. मात्र ठाकरे गट मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाहीये. 

12 Jan 2024, 13:55 वाजता

PM Modi in Maharashtra
'चांद्रयान, आदित्य एल-१ चे यश जगासमोर आहे. भारतातील प्रत्येक दुकानसमोर युपीआय आहे. अमृतकाळात देशाला अजून पुढं न्यायचं आहे, असं पीएम मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. सरकारनं १० वर्षात तरूणांना विविध संधी दिल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी तयार केली आहे. माझा तरूणांवर सर्वाधिक विश्वास आहे असंही मोदी म्हणाले.

 

12 Jan 2024, 13:38 वाजता

PM Modi in Maharashtra
देशाच्या सर्व मंदिर आणि तीर्थक्षेत्रावर स्वच्छता मोहिम राबवा असं आवाहन पीएम मोदी यांनी आपल्या भाषणात केलं. काळाराम मंदिरात येण्याची आणि सफाई करण्याची संधी मिळाली, असंही पीएम मोदींनी सांगितलं. तसंच आज भारताची अर्थव्यवस्थात जगातील टॉप 5 मध्ये आहे. तरुणांमुळे अर्थव्यवस्थेत मोठी सुधारणा झाली. भारत हे उत्पादनाचं हब झालंय.महाराष्ट्राच्या भूमीला मनापासून नमन करत असल्याचंही मोदींनी सांगितलं.

12 Jan 2024, 13:31 वाजता

PM Modi in Maharashtra : नाशिकमध्ये युवा महोत्सवांच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उद्घाटन करण्यात आलं. आपल्या भाषणाची सुरुवात पीएम मोदी यांनी मराठीत केली. राजमाता जिजाऊंना त्यांनी मराठीत वंदन केलं. भाषणात पीएम मोदी यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख लोकप्रिय सीएम असा केला. हा दिवस युवाशक्तीचा दिवस असल्याचं मोदींना भाषणात सांगितलं

12 Jan 2024, 12:35 वाजता

PM Modi in Maharashtra LIVE : नाशिकच्या तपोवन मैदानात मोठी गर्दी 

नाशिकच्या तपोवन मैदानात प्रचंड गर्दी. सभास्थळी महाराष्ट्र गीत गायनानंतर कार्यक्रमाची सुरुवात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पंतप्रधानांचं स्वागत.