PM Modi in Maharashtra LIVE : 'अटल सेतूमुळे गोवादेखील मुंबईच्या जवळ येणार'

PM Modi in Nashik Mumbai Maharashtra LIVE Updates: शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, नाशिकमधून त्यांचा हा दौरा सुरु होणार आहे. ज्यानंतर मुंबईतील नवा सी लिंक अर्थात शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचं लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडणार आहे.    

PM Modi in Maharashtra LIVE : 'अटल सेतूमुळे गोवादेखील मुंबईच्या जवळ येणार'

PM Modi in Nashik Mumbai Maharashtra LIVE Updates: आगामी लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर सध्या सत्ताधारी भाजप पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा विविध कार्यक्रम आणि प्रस्तावित प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर लोकार्पण सोहळ्यांना हजेरी लावताना दिसत आहेत. जास्तीत जास्त नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याला ते प्राधान्य देत आहेत. याच धर्तीवर मोदींचा महाराष्ट्र दौरा सुरु होत आहे. नाशिकमधून त्यांचा हा दौरा सुरु होणार असून, इथं पंतप्रधान मोदींचे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. 

मोदींचा नियोजित नाशिक दौरा सकाळी सव्वा अकरा वाजता सुरु होणार होता. मात्र पंतप्रधान सकाळी सव्वा दहा वाजताच नाशिकमध्ये दाखल होतील. नाशिकमध्ये पंतप्रधान रोड शो करणारेत. त्यानंतर ते काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि गोदातिरावर महाआरती करतील. त्यानंतर मोदींकडून या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उदघाटन होईल. नाशिकनंतर मोदी मुंबईकडे रवाना होतील. त्यांच्या या संपूर्ण दौऱ्याचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर 

12 Jan 2024, 12:00 वाजता

PM Modi in Maharashtra LIVE : पंतप्रधान तपोवन मैदानाकडे रवाना 

काळाराम मंदिरात भेट दिल्यानंतर आणि रामकुंडावर आरती, पूजन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तपोवन मैदानाकडे रवाना. इथं होणार त्यांची सभा 

12 Jan 2024, 11:25 वाजता

PM Modi in Maharashtra LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात दाखल

नाशिकमध्ये झालेल्या उत्साहपूर्ण स्वागताचा स्वीकार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात दाखल झाले. त्यांनी काळाराम मंदिरात दर्शन आणि आरती केली असून, पुढील 23 मिनिट काळाराम मंदिरात असणार ते दर्शन घेणार आहेत. 

12 Jan 2024, 11:11 वाजता

PM Modi in Maharashtra LIVE : पंतप्रधानांच्या रोड शोला सुरुवात... 

नाशिक ढोल- ताशांचा गजर, पुष्पवृष्टी आणि पारंपरिक नृत्य सादर करत हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. यावेळी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसह ते एका रोड शोमध्येही सहभागील झाले. जिथं नागरिकांना हात उंचावर त्यांनी अभिवादन केलं आणि त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला. 

12 Jan 2024, 11:01 वाजता

PM Modi in Maharashtra LIVE : तीन पावली नृत्यानं पंतप्रधानांचं स्वागत 

पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर ते सभास्थळी येण्याआधी पालकमंत्री दादा भुसे यांनी तीन पावली नृत्य सादर करत पंतप्रधानांचं स्वागत केलं. यावेळी तीन पावली नृत्य सादर करणाऱ्यांचा उत्साह पाहण्याजोगा होता. 

12 Jan 2024, 10:41 वाजता

PM Modi in Maharashtra LIVE : मोदी महाराष्ट्रात दाखल 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ओझर येथील हेलिपॅडवर उतरले असून तिथं राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांचं स्वागत केलं. 

12 Jan 2024, 10:15 वाजता

PM Modi in Maharashtra LIVE : अटल सेतूच्या उदघाटनापूर्वी शिवसेनेचे स्थानिक नेते नाराज 

शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असताना शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांना ऐनवेळी निमंत्रण मिळालं आहे. निमंत्रण पत्रिकेतसुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांचं नाव नसल्याने ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ऐनवेळी निमंत्रण पाठवल्याने आणि निमंत्रण पत्रिकेत नावाचा उल्लेख नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या कार्यक्रमावर ठाकरे गटाच्या वतीने निमंत्रण येऊन सुद्धा कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. खासदार अरविंद सावंत आमदार अजय चौधरी, आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन अहीर हे या भागातील स्थानिक आमदार खासदार आहेत. 

12 Jan 2024, 10:02 वाजता

PM Modi in Maharashtra LIVE : काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान 

नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी पहिलेच पंतप्रधान असून, त्यांच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. या दौऱ्यांमध्ये मोदींवर फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे. या दौऱ्यानिमित्त ऐतिहासिक काळाराम मंदिरात पंतप्रधान मोदी 23 मिनिट पूजा पठण करणार आहेत. यादरम्यान पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असेल. 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा बहुमान नाशिकला मिळाला असून, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. काळाराम मंदिरात मोदी येणार असल्याने नाशिक मधील पदाधिकारी स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. 

12 Jan 2024, 09:15 वाजता

PM Modi in Maharashtra LIVE : 11 दिवसांचा विशेष धार्मिक विधी

इथं पंतप्रधान महाराष्ट्रातीलन नाशिक आणि मुंबई दौऱ्यावर असतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपण अयोध्येतील राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी 11 दिवसांचा विशेष धार्मिक विधी करणार असून त्याचा शुभारंभ नाशिकच्या काळाराम मंदिरापासून करणार असल्याचं सांगितलं. एका ध्वनिफीतीच्या माध्यामातून त्यांनी देशवासियांना हा संदेश दिला. 

12 Jan 2024, 09:12 वाजता

PM Modi in Maharashtra LIVE : महत्वकांक्षी प्रकल्पांचं उद्घाटन 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध महत्वकांक्षी प्रकल्पांचं उद्घाटन आज होणार आहे. यात अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या उरण-खरकोपर रेल्वे मार्गाचाही समावेश आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनानं रेल्वेची टेस्ट ड्राईव्ह घेतली. आजच्या कार्यक्रमासाठी रेल्वे प्रशासनाकडून सगळी तयारीही करण्यात आली आहे. 

12 Jan 2024, 09:01 वाजता

PM Modi in Maharashtra LIVE : पंतप्रधानांचा रोड शो

नाशिकमध्ये पंतप्रधानांचा रोडशो पाहायला मिळणार आहे. काळारामाच्या दर्शनानंतर करणार गोदावरीची महाआरती करतील. ज्यानंतर ते 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त तरुणांशी संवाद साधणार आहेत.