लोकसभा निवडणूक २०१९: अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम

 २३ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.

Updated: Apr 4, 2019, 01:21 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९: अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम title=

अहमदनगर : नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर भारतीय जनता पक्षाने डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे. नगरमध्ये आता या २ युवा नेत्यांमध्ये सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीने डॉ. सुजय विखे यांच्यासाठी जागा न सोडल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. संग्राम जगताप दोन वेळा नगरचे महापौर होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे अनिल राठोड यांचा पराभव केला होता. वंचित बहुजन आघाडीकडून सुधाकर आव्हाड मैदानात आहेत. २३ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.

२०१४ चा निकाल

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या दिलीपकुमार गांधी यांनी विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादीच्या राजीव रावळे यांचा २ लाख ९ हजार १२२ मताधिक्यांनी पराभव केला.

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

 

उमेदवार

 पक्ष

 मतदान

दिलीपकुमार गांधी भाजप 605185
राजीव राजाळे राष्ट्रवादी 396063
बबन कोळसेपाटील अपक्ष 12683
किसन काकडे बसपा 8386
नोटा नोटा 7473