लोकसभा निवडणूक २०१९ : अकोला मतदारसंघातील 'रणसंग्राम'

लोकसभा निवडणुकीसाठी अकोला मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यामध्ये १८ एप्रिलला मतदान होणार आहे.

Updated: Mar 26, 2019, 11:33 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : अकोला मतदारसंघातील 'रणसंग्राम' title=

अकोला : लोकसभा निवडणुकीसाठी अकोला मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यामध्ये १८ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता.

या निवडणुकीत अकोला मतदारसंघात भाजपकडून संजय धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संजय धोत्रे यांचा सामना काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्याशी असणार आहे.

२०१४ निवडणुकीचे निकाल

२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये अकोल्यातून भाजपच्या संजय धोत्रे यांनी काँग्रेसच्या हिदायत पटेल यांचा २,०३,११६ मतांनी पराभव केला होता.

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

उमेदवार

पक्ष

मिळालेली मतं

संजय धोत्रे भाजप ४,५६,४७२
हिदायत पटेल काँग्रेस २,५३,३५६
प्रकाश आंबेडर भारिप बहुुजन महासंघ २,३८,७७६
अजय हिंगणकर आप ८,०७६
भाई कांबळे बसपा ७,८५८

रणसंग्राम | अकोला | काय आहे मतदारांच्या मनात?