बारामती : बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवारांचा हा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. सुप्रिया सुळेंच्या विरोधात येथे सक्षम उमेदवार नाही. गेल्या पाच वर्षात सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघात दांडगा जनसंपर्क तयार केला आहे. १३ एप्रिलला येथे मतदान होणार आहे. येथे राष्ट्रवादीकडून पुन्हा सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने नवनाथ पडळकर यांना उमेदवारी दिली आहे.
कांचन कुल यांचे पती राहुल कुल हे दौंडचे आमदार आहेत. याच मतदारसंघात सुप्रिया सुळे २०१४ च्या निवडणुकीत २५ हजार मतांनी पिछाडीवर होत्या. कांचन कुल यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांना आणखी कांटे की टक्कर मिळणार आहे.
२०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी महादेव जानकर यांचा पराभव केला होता. पण महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना कांटे की टक्कर दिली होती. २०१४ मध्ये सुप्रिया सुळे यांनी महादेव जानकर यांचा 80 हजार मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
सुप्रिया सुळे | राष्ट्रवादी | 521562 |
महादेव जानकर | राष्ट्रीय समाज पक्ष | 451843 |
दिपक पायगुडे | आप | 26396 |
विनायक चौधरी | बसपा | 24908 |
- | नोटा | 14216 |