लोकसभा निवडणूक २०१९ : लातूर मतदारसंघातील 'रणसंग्राम'

लोकसभा निवडणुकीसाठी लातूर मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यामध्ये १८ एप्रिलला मतदान होणार आहे.

Updated: Mar 28, 2019, 06:14 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : लातूर मतदारसंघातील 'रणसंग्राम' title=

लातूर : लोकसभा निवडणुकीसाठी लातूर मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यामध्ये १८ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीत लातूर मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे. भाजपकडून लातूरमध्ये सुधाकर शृंगारे यांना तर काँग्रेसमधून मच्छींद्रनाथ कामथ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून राम गारकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

२०१४ निवडणुकीचे निकाल

२०१४ साली लातूरमधून भाजपच्या सुनील गायकवड यांनी काँग्रेसच्या दत्तात्रय बनसोडे यांचा २,५३,३९५ मतांनी पराभव केला होता. यावेळी मात्र भाजपने सुनील गायकवाड यांना तिकीट दिलं नाही. 

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

उमेदवार

पक्ष

मिळालेली मतं

सुनील गायकवाड भाजप ६,१६,५०९
दत्तात्रय बनसोडे काँग्रेस ३,६३,११४
दीपक कांबळे बसपा २०,०२९
नोटा   १३,९९६
दीपरत्न निलंगेकर आप ९,८२९

रणसंग्राम | काय आहे लातूरकरांच्या मनात?

रणसंग्राम | लातूरमधून आवाज तरुणांचा

रणसंग्राम | लातूर मतदारसंघातल्या समस्या