Amol Kolhe: लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्व नेते आपापल्या मतदार संघात जोमाने कामाला लागले आहेत. राजकीय मंचावरुन आव्हान-प्रतिआव्हान, वाद-प्रतिवाद होतंच असतात. पण लग्नमंडपात मिश्लिक कोपरखळी मारण्याची संधीदेखील कोणी सोडत नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे एका लग्नाला उपस्थित होते. त्यांनी लग्न मंडपात केलेल्या भाषणाची क्लिप सध्या व्हायरल होतेय. या क्लिपमध्ये अमोल कोल्हे काय म्हणाले? कोणाला उद्देशून म्हणाले? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
आमदार दिलीप मोहितेंच्या पुतणीचा विवाह सोहळा शिरुर येथे संपन्न झाला. अमोल कोल्हे यांना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले होते. यावेळी अमोल कोल्हेंना यायला थोडा उशीर झाला. जेव्हा त्यांना बोलण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या खास शैलीत बॅटींग करण्याची संधी काही सोडली नाही. कोल्हे शुभाशीर्वाद देत होते. त्यावेळी लग्नाला यायला उशीर झाला, असं एकाने त्यांना विचारलं. हाच धागा धरून कोल्हेनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
पुर्वनियोजित कार्यक्रमांमुळे यायला विलंब झाला. आजकाल आल्या आल्या गेटवर कोणीतरी विचारलं, हातात घड्याळ असून उशीर का झाला. घड्याळ निघून गेल्यानं, वेळ काय जुळेना झाली. पण वधू-वराच्या आयुष्यात सुखाची-समाधानाची तुतारी वाजावी, असं मी म्हटल्याचे कोल्हेंनी सांगितलं. असे बोलताना अमोल कोल्हेंनी कळत नकळत मोहितेंना कोपरखळी लगावली. कोल्हेच्या विधानाला मोहितेंनी स्मितहास्य करत प्रतिसादही दिल्याचे पाहायला मिळाले.
Shirur | 'घड्याळ निघून गेल्यानं वेळ जुळेना...', अमोल कोल्हेंची लग्नमंडपात आमदार दिलीप मोहितेंना कोपरखळी#AmolKolhe #DilipMohitePatil #NCP pic.twitter.com/HZq7kGNbaY
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 31, 2024
वधुवरांना आई जगदंबा सर्व सुख देवो. जे जे सुख असेल सगळ देवो. महाराष्ट्रातल्या माता भगिनी लेकींना मातृत्व, नेतृत्व, कर्तुत्वाचा वसा वारसा लाभलेला असतो. मातृत्व असतं ते राष्ट्रमाता जिजाऊंसारखं, कर्तुत्व असतं ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंसारखं आणि नेतृत्व असतं पुण्यश्लोक अहिल्याबाईंसारखं. असा मातृत्व, नेतृत्व कर्तुत्वाचा वसा लाभलेली मोहिते पाटील कुटुंबाची सुकन्या श्रुतिका शिंदे पाटील कुटुंबाचा भाग होतेय, असे म्हणत त्यांनी दोन्ही परिवाराला शुभेच्छा दिल्या.
अमोल कोल्हे हे महाविकास आघाडीचे शिरुर मतदार संघातील उमेदवार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे 2 गट पडल्याने येथे चांगली चुरस पाहायला मिळणार आहे.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.